Market Committee Agrowon
मार्केट इन्टेलिजन्स

Cotton Rate : मानवत बाजार समितीत लिलावाद्वारे कापूस खरेदी सुरु

जिल्ह्यातील कापसाची प्रमुख बाजार पेठ असलेल्या मानवत कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये सोमवारी (ता. १४) जाहीर लिलावाद्वारे कापूस खरेदीस प्रारंभ झाला.

Team Agrowon

परभणी ः जिल्ह्यातील कापसाची प्रमुख बाजार पेठ असलेल्या मानवत कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये (Market Committee) सोमवारी (ता. १४) जाहीर लिलावाद्वारे कापूस खरेदीस (Cotton Procurement) प्रारंभ झाला. खरेदी मुर्हतावर कापसाला प्रतिक्विंटल किमान ८७०० ते कमाल ९५२१ तर सरासरी ९४०० रुपये दर मिळाले.

यंदाच्या (२०२२-२३) कापूस खरेदी हंगाम अंतर्गत मानवत कृषी उत्पन्न बाजार समितीच्या मार्केट यार्डावर जाहीर लिलावाद्वारे कापूस खरेदीचे उद्घाटन बाजार समितीचे सभापती पंकज आंबेगावकर यांच्या हस्ते झाले. यावेळी सहाय्यक निबंधक जयंत पाठक, संचालक माधव नाणेकर, माणिकराव काळे, गिरीष कत्रुवार, ज्ञानेश्वर मोरे पाटील, सतीश बारहाते, नारायण भिसे, माधव नानेकर, माणिकराव काळे, बाबासाहेब अवचार, सोपान वाघमारे, सचिव शिवारायण सारडा आदी उपस्थित होते.

लिलाव खरेदीच्या पहिल्याच दिवशी ११० वाहने बाजार समितीच्या यार्डात दाखल झाली होती. लिलावाच्या प्रारंभी मानाच्या पहिल्या ५ शेतकऱ्यांचा शाल श्रीफळ देऊन सत्कार करण्यात आला. यामध्ये तालुक्यातील तुकाराम होंडे (रुढी), अखिल अन्सारी(उक्कलगाव), अर्जुन तारे (कोल्हा), सिकंदर अत्तार( मानवत), आश्रोबा होगे (नागरजवळा) यांचा समावेश होता. लिलावात जिनिंग व्यापारी गिरीष कत्रुवार, रामनिवास सारडा, जुगलकिशोर काबरा, विजय पोरवाल, भगवानराव गोलाईत सहभागी झाले होते.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Rabi Crop Insurance 2025 : रब्बी हंगामातही पिक विमा योजनेकडे शेतकऱ्यांची पाठ; १० नोव्हेंबरपर्यत ८ हजार ३७९ शेतकऱ्यांचे अर्ज

Onion Price: कांद्याचे भाव घसरले, शेतकऱ्याने हताश होऊन उभ्या पिकावर फिरवला ट्रॅक्टर

US Election 2025: अमेरिकेतील निवडणुकांचे निकाल काय सांगतात?

Cotton Farmer Issue: कापूस उत्पादकांची चहूबाजूंनी कोंडी

Bihar Election 2025: राज्यातील लढतीचे ‘केंद्रीय’ पैलू

SCROLL FOR NEXT