Cotton Agrowon
मार्केट इन्टेलिजन्स

Cotton Prices Crash: कापसाच्या भावात आंतरराष्ट्रीय बाजारात घसरण; बाजारभाव ५ वर्षातील निचांकी पातळीवर

International Market Update: आंतरराष्ट्रीय व्यापारयुद्धाचा फटका कापूस बाजाराला बसला आहे. चीन आणि कॅनडाने अमेरिकेच्या कापूस आयातीवर शुल्क लागू केल्याने कापसाचा दर कोसळला असून तो गेल्या ५ वर्षातील निचांकी पातळीवर पोहोचला आहे.

Anil Jadhao 

Pune News: अमेरिकेच्या आयातीवर चीन, कॅनडाने शुल्क जाहीर करताच कापूस दरात मोठी पडझड झाली. चीनने अमेरिकेच्या कापसावर १५ टक्के आयातशुल्क लावले आहे. त्यामुळे आंतरराष्ट्रीय बाजारात कापसाचा भाव गेल्या ५ वर्षातील निचांकी पातळीवर पोचला. आंतरराष्ट्रीय बाजारातील या घडामोडींचा देशातील बाजारावरही परिणाम होऊ शकतो, असा अंदाज अभ्यासकांनी व्यक्त केला. 

चीन जगातील महत्वाचा कापूस खरेदीदार आहे. चीनची कापूस आयात मोठी आहे. चीन ब्राझील, ऑस्ट्रेलिया आणि अमेरिकेतून कापूस आयात करतो. अमेरिका कापूस उत्पादनात भारत आणि चीननंतर तिसऱ्या क्रमांकावर असतो. अमेरिकेत कापसाचे उत्पादन जास्त होत असले तरी वापर मात्र कमी असतो. त्यामुळे चीनला कापूस निर्यातीवर अवलंबून राहावे लागते. जागतिक बाजारात जसे अमेरिकेच्या पुरवठ्याचा परिणाम होतो तसेच चीनच्या मागणीचा परिणाम होत असतो. 

अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ट ट्रम्प यांनी चीनच्या वस्तुंवर आयात कर लावला. त्याच्या प्रत्यत्तरादाखल चीनने देखील अमेरिकेतून आयात होणाऱ्या वस्तुंसह शेतीमाल आयातीवर कर लावला. चीनने अमेरिकेच्या सोयाबीन, ज्वारी, फळे, भाजीपाला, डेअरी उत्पादनांवर १० टक्के आयात शुल्क लावले. तर कापूस, गहू, मक्यावर १५ टक्के आयातशुल्क लावले. तसेच चीन आयात शुल्कात वाढ करु शकतो, ही चर्चा बाजारात सुरु झाली आणि त्याचा परिणाम बाजारवर दिसून आला. 

केवळ चीनच नाही तर कॅनडानेही अमेरिकेच्या कापूस आयातीवर शुल्क लागू केले. याचा परिणाम अमेरिकेच्या बाजारावर झाला. कापसाचा भाव मंगळवारीच जवळपास ३ टक्क्यांनी तुटला होता. न्यूयाॅर्क काॅटन एक्सचेंजवर कापसाचा भाव गेल्या ५ वर्षातील निचांकी पातळीवर पोचला होता. मागील काही महिन्यांपासून कापसाला ६६ सेंट प्रतिपाऊंडचा एक सपोर्ट मिळत होता. मात्र अमेरिका आणि चीनच्या व्यापार युध्दामुळे ६६ सेंटचा आधार तुटला आणि बाजार ६३ सेंटपर्यंत खाली आला होता. 

चीनला पर्याय काय? 
चीनने अमेरिकेच्या कापूस आयातीवर शुल्क लावल्याने अमेरिकेतून येणारा कापूस महाग होईल. पण चीनकडे ब्राझील आणि ऑस्ट्रेलिया हे दोन पर्याय असतील. यंदा ब्राझीलमध्ये कापूस उत्पादनही वाढले आहे. त्यामुळे चीनला ब्राझीलकडून कापूस मिळेल. चीन यंदा ब्राझीलच्या कापसाची चांगली खरेदी करेल, असा अंदाज व्यक्त केला जात आहे. 

बाजारवरील परिणाम

चीन आणि अमेरिकेच्या व्यापार युध्दात भारताचा थेट सहभाग नसला तरी आंतरराष्ट्रीय बाजारात कापूस दरावर होणार परिणामापासून देशातील बाजारही दूर राहू शकत नाही. आंतरराष्ट्रीय बाजारात तुटलेल्या भावाचा दबाव देशातील बाजारावरही झाला. त्यामुळे कापसाच्या भावात मोठी नरमाई दिसत नसली तरी मोठी वाढही सध्यातरी दिसत नाही, असे कापूस बाजारातील अभ्यासकांनी सांगितले. 

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Shaktipeeth Highway Protest : जमीन द्यायची नाही अन् काही ऐकायचं नाही

Bogus Crop Insurance : बोगस पीकविमा काढल्यास आधार काळ्या यादीत

Paddy Plantation : रत्नागिरी जिल्ह्यात १५ हजार हेक्टर क्षेत्रावर भात लागवड

Solapur Rainfall : बळिराजानं पेरलं, पावसानं वाऱ्यावर सोडलं

Sugarcane Crushing : एक लाख हेक्टरवरील उसाचे होणार गाळप

SCROLL FOR NEXT