Agriculture Market Agrowon
मार्केट इन्टेलिजन्स

Agrowon Podcast : कापूस बाजार दबावातच; कापूस, सोयाबीन, कांदा तसेच काय आहेत पेरुचे दर?

Market Update : आज आपण सोयाबीन, कापूस, कांदा, टोमॅटो आणि पेरु पिकाच्या बाजाराची माहिती घेणार आहोत.

Anil Jadhao 

Market Bulletin :

कपासावर पुन्हा दबाव

कापूस बाजारावरील दबाव आजही कायम आहे. कापसाचा भाव पुन्हा एकदा गेल्या चार वर्षातील सर्वाच निचांकी पातळीवर पोचला. कापसाची विक्री वाढत असून कापसाचा उठाव मात्र कमी आहे. त्यामुळे दरावर दबाव येत आहे. आज दुपारपर्यंत कापसाचे वायदे ६७.२३ सेंट प्रतिपाऊंडच्या दरम्यान होते. देशातील बाजारातही सप्टेंबरचे वायदे ५८ हजार रुपये प्रतिखंडीवर पोचले होते. तर बाजार समित्यांमधील भाव ७ हजार ते ७ हजार ६०० रुपयांच्या दरम्यान होते. कापूस बाजारातील ही स्थिती आणखी काही दिवस कायम राहू शकते, असा अंदाज अभ्यासकांनी व्यक्त केला. 

सोयाबीन दबावातच

सोयाबीन बाजाराची आठवड्याची सुरुवातही मंदीनेच झाली. सोयाबीन आणि सोयापेंडचे भाव दबावातच होते. आठवड्याच्या शेवटी म्हणजेच शुक्रवारी सोयाबीनचे वायदे १०.१८ डाॅलर प्रतिबुशेल्सवर बंद झाले. तर सोयापेंड ३२३ डाॅलर प्रतिटनांवर होते. देशातही सोयाबीन दबावातच असून सोयाबीनला आजही ४ हजार १०० ते ४ हजार ४०० रुपयांच्या दरम्यान भाव मिळत आहे. सोयाबीन बाजारातील ही स्थिती आणखी काही दिवस राहू शकते, असा अंदाज सोयाबीन बाजारातील अभ्यासकांनी व्यक्त केला. 

टोमॅटोचा बाजार नरमला

बाजारातील टोमॅटोची आवक वाढल्याचा परिणाम दरावर दिसून येत आहे. त्यामुळे टोमॅटोच्या भावावर दबाव आला. टोमॅटोचा बाजार एकाच महिन्यात ५ हजारांवरून २५०० हजारांपर्यंत कमी झाला. राज्यातील सर्वच भागात टोमॅटोची आवक वाढत आहे. त्यामुळे टोमॅटोला सरासरी १७०० ते २५०० रुपयांच्या दरम्यान भाव मिळत आहे. टोमॅटोची बाजारातील आवक पुढील एक-दोन आठवड्यात पुन्हा वाढण्याचा अंदाज आहे, असे बाजारातील व्यापारी सांगत आहेत. 

पेरुची आवक कमीच

बाजारात पेरुची आवक कमी झाली. राज्याच्या महत्वाच्या पेरू उत्पादक भागांमध्ये पाऊस सुरु आहे. त्यामुळे पेरु आवकेवर परिणाम होत आहे. तर दुसरीकडे पेरुला उठाव चांगला मिळत आहे. त्यामुळे पेरुला सध्या सरासरी ३ हजार ते ५ हजार रुपये क्विंटलच्या दरम्यान भाव मिळत आहे. पेरुचा बाजार आणखी काही आठवडे कायम राहू शकतो, असा अंदाज पेरु व्यापारी व्यक्त करत आहेत. 

कांदा भाव स्थिरावले

कांद्याचा बाजार आज काहीसा स्थिरावला आहे. कांद्याला वाढलेल्या भावात मागील दोन आठवड्यांमध्ये काहीशी मागणी कमी झाली होती. त्याचा परिणाम दरावर दिसून आला.  कांद्याला आजही सरासरी २ हजार ५०० ते ३ हजार रुपयांच्या दरम्यान भाव मिळाला. बाजारातील कांद्याची आवक यापुढच्या काळातही कमीच राहण्याची शक्यता आहे. पण मागणीत होणाऱ्या बदलानुसार बाजारातील दरही बदलू शकतात, असा अंदाज कांदा बाजारातील व्यापारी व्यक्त करत आहेत.     

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Agriculture Irrigation Issues: प्रकल्पांच्या कालवा वितरण प्रणालीची दुरावस्था

Sunetra Pawar NCP National President: राष्ट्रवादी काँग्रेसच्या राष्ट्रीय अध्यक्षपदी सुनेत्रा पवार, एकमताने निवड

Onion Price Crisis: कांदा उत्पादक समितीचे काय झाले?; सत्यजीत तांबेंचा सरकारला सवाल

Grape Care After Rain: द्राक्षाला अवकाळीचा फटका? बाग वाचवण्याचे सोपे उपाय

Grape Farming: वातावरणातील बदलांनुसार पाणी बचतीवर भर आवश्यक

SCROLL FOR NEXT