Cotton Agrowon
मार्केट इन्टेलिजन्स

Cotton Arrival: कापसाची बाजारातील आवक टिकून; दरावर दबाव कायम!

Cotton Market Update: जानेवारी महिन्यातही बाजारातील कापसाची आवक चांगली सुरु आहे. सध्या रोज बाजारात दीड लाख गाठींच्या दरम्यान आवक आहे. सध्या गुजरात, महाराष्ट्र आणि तेलंगणातील आवक चांगली आहे.

Anil Jadhao 

Pune News: जानेवारी महिन्यातही बाजारातील कापसाची आवक चांगली सुरु आहे. सध्या रोज बाजारात दीड लाख गाठींच्या दरम्यान आवक आहे. सध्या गुजरात, महाराष्ट्र आणि तेलंगणातील आवक चांगली आहे. त्यातही महाराष्ट्रातील आवक उचांकी आहे. या आवकेचा दरावरही दबाव दिसून येत आहे. 

जानेवारी महिन्याच्या सुरुवातीच्या १० दिवसांमध्ये देशातील बाजारात रोज जवळपास १ लाख ९० हजार ते २ लाख गाठींच्या दरम्यान कापसाची आवक होती. त्यात सर्वाधिक आवक महाराष्ट्रात होती. त्यानंतर गुजरात आणि तेलंगणाचा नंबर लागतो. शेतकऱ्यांनी यंदा नवीन वर्षाला सुरुवातीला दरवाढीची वाट पाहून कापूस विक्री केल्याचे दिसत आहे.

त्यामुळे देशातील बाजारात कापसाची आवक वाढली आहे. १० जानेवारी ते २० जानेवारी या कालावधीत देशातील आवक काहीशी कमी झाली. दैनंदीन आवक सव्वाल लाख ते दीड लाख गाठींच्या दरम्यान आहे. संक्रांतीपर्यंत शेतकऱ्यांनी जास्त कापूस विकल्याचे दिसते. त्यातही महाराष्ट्रातील कापसाची आवक जास्त आहे. त्याचा दबाव कापसाच्या दरावरही दिसत आहे. 

मागील महिनाभरापासून कापसाला उठावही चांगला आहे. सुतालाही मागणी वाढत आहे. देशातून कापड निर्यात वाढली आहे. डिसेंबरम महिन्यातील कापड निर्यात १३ टक्क्यांनी जास्त आहे. याचा आधार कापूस बाजाराला आहे. त्यामुळे कापसाच्या सरासरी भावात मागील ३ आठवड्यांमध्ये जवळपास २०० रुपयांची वाढ झाली. मात्र कापूस आवकेचा दबाव असल्याने दराला चांगला आधार मिळाला नाही. 

महाराष्ट्रातील आवक जास्त

जानेवारी महिन्यात महाराष्ट्रातील आवक वाढलेली आहे. गुजरात आणि तेलंगणापेक्षा महाराष्ट्रातील आवक जास्त आहे. जानेवारीच्या पहिल्या १० दिवसांमध्ये राज्यातील बाजारात रोज ६० ते ७० हजार गाठींची आवक झाली होती. तर १० जानेवारी ते २० जानेवारीच्या दरम्यान ४५ ते ५५ हजार गाठींच्या दरम्यान आवक झाली. म्हणजेच मागच्या १० दिवसांमध्ये तुलनेत आवक कमी झाली आहे. 

दराची स्थिती

मागील ३ आठवड्यांमध्ये सरकीच्या दरात सुधारणा झाल्यानंतर कापसाच्या भावात क्विंटलमागे २०० रुपयांपर्यंत वाढ झाली होती. कापसाचा सरासरी भाव ७ हजार ते ७ हजार २०० रुपयांच्या दरम्यान आहे. तर सरकीचे भाव सध्या ३ हजार ४०० ते ३ हजार ६०० रुपयांच्या दरम्यान आहेत. खाद्यतेलाच्या भावात तेजी असल्याने सध्या सरकीला चांगला उठाव मिळत आहे. 

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

E-Peek Pahani: शेतकऱ्यांचं टेन्शन मिटलं! ई- पीक पाहणी प्रक्रियेत मोठा बदल, सहायकांची नियुक्ती, शासन निर्णय जारी

Farmer Fraud: शेतकऱ्यांची फसवणूक करणाऱ्या व्यापाऱ्याविरुद्ध गुन्हा दाखल करा

Pikvima Scam: पीकविमा अर्जासाठी सीएससी चालकांकडून शेतकऱ्यांची लूट

Dairy Farming: नवतंत्रज्ञानातून दुग्ध उत्पादनात वाढ शक्य

Pik Vima Dharashiv: गतवर्षीच्या खरिपातील पीकविम्याचा मार्ग मोकळा

SCROLL FOR NEXT