Cotton Market Agrowon
मार्केट इन्टेलिजन्स

Cotton Market : मानवत बाजार समितीत कापसाला मिळतोय ७३७५ ते ७५२५ रुपयांचा दर

Cotton Rate : मानवत बाजार समितीमधील कापसाची आवक कमी झाली आहे. सध्या सुपर (नंबर एक) तसेच फरदड कापसाची आवक सुरू आहे.

माणिक रासवे

Parbhani News : जिल्ह्यातील कापसाची प्रमुख बाजारपेठ असलेल्या मानवत बाजार समितीमध्ये शनिवारी (ता. १५) कापसाची सुमारे १२०० क्विंटल आवक होती. चांगल्या प्रतीच्या कापसाला प्रतिक्विंटल किमान ७३७५ ते ७५२५ रुपये तर सरासरी ७४५० रुपये दर मिळाले. पावसात भिजलेल्या (रेन टच) कापसाला प्रतिक्विंटल किमान ६२०० ते ७२०० रुपये दर मिळाले.

मानवत बाजार समितीमधील कापसाची आवक कमी झाली आहे. सध्या सुपर (नंबर एक) तसेच फरदड कापसाची आवक सुरू आहे. मागील काही दिवसांपासून दैनंदिन आवक सरासरी ८०० ते १२०० क्विंटल होत आहे. गेल्या काही दिवसांत कापसाच्या दरात किंचित सुधारणा झाली असून कमाल दर साडेसात हजार रुपयांपर्यंत वाढले आहेत. चांगल्या प्रतीच्या कापसाचे किमान दर सात हजारांवर आहेत तर पावसात भिजलेल्या कापसाचे किमान दर साडेसहा हजार रुपयांपेक्षा कमी आहेत.

शुक्रवारी (ता. १४) कापसाची ८०० क्विंटल आवक असताना प्रतिक्विंटल किमान ७३७५ ते कमाल ७५१० रुपये तर सरासरी ७४५० रुपये दर मिळाले. पावसात भिजलेल्या कापसाला प्रतिक्विंटल ६००० ते ७२०० रुपये दर मिळाले. गुरुवारी (ता. १३) कापसाची सुमारे १००० क्विंटल आवक असताना प्रतिक्विंटल किमान ७४०० ते कमाल ७५०० रुपये तर सरासरी ७४५० रुपये दर मिळाले. पावसात भिजलेल्या कापसाला प्रतिक्विंटल ६२०० ते ७२५० रुपये दर मिळाले.

बुधवारी (ता. १२) प्रतिक्विंटल किमान ७२०० ते किमान ७३५० रुपये तर सरासरी ७२७५ रुपये दर मिळाले. पावसात भिजलेल्या कापसाला प्रतिक्विंटल किमान ६२०० ते कमाल ७२०० रुपये दर मिळाले. मंगळवारी (ता. ११) सुमारे ८०० क्विंटल आवक असताना प्रतिक्विंटल किमान ७२०० ते कमाल ७३५० रुपये तर सरासरी ७२७५ रुपये दर मिळाले.

पावसात भिजलेल्या कापसाला प्रतिक्विंटल किमान ६००० ते कमाल ६९०० रुपये दर मिळाले. सोमवारी (ता. १०) १३०० क्विंटल आवक असताना प्रतिक्विंटल किमान ७२७५ ते कमाल ७३८५ रुपये तर सरासरी ७३२५ रुपये दर मिळाले. पावसात भिजलेल्या कापसाला प्रतिक्विंटल किमान ६००० ते कमाल ७०५० रुपये दर मिळाले.

निवाऱ्यांमुळे पावसाळ्यातही खरेदी शक्य

तातडीच्या आर्थिक गरजा नसलेल्या जिल्ह्यातील अनेक शेतकऱ्यांनी पहिल्या वेचणीपासून कापूस घरात साठवून ठेवला आहे. अशा शेतकऱ्यांची संख्या मोजकीच आहे. कापसाच्या दरात तूर्त सुधारणा होण्याची चिन्हे दिसत नसल्यामुळे या शेतकऱ्यांनी आता कापूस विक्रीसाठी काढला आहे. मानवत बाजार समितीच्या मार्केट यार्डावर निवारे आहे. तसेच ५ ते ६ जिनिंग कारखान्यांमध्येही निवारे आहेत. त्यामुळे मागील वर्षीप्रमाणे यंदादेखील पावसाळ्यात कापूस खरेदी करता येऊ शकते.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Maharashtra Assembly Election : शेतकरी संघटनांना भुलवतेय आमदारकीची मोहमाया

Maharashtra Assembly Election : पुणे जिल्ह्यात शिवसेना ठाकरे गटाची ससेहोलपट

Sanjay Kulkarni Death : ‘जलसंपदा’ला दिशा देणारे संजय कुलकर्णी यांचे निधन

Rabi Crop Loan : रब्बीसाठी पीक कर्जाचे ६८५ कोटींचे उद्दिष्ट

Maharashtra Weather : मध्य महाराष्ट्रात थंडीची चाहूल

SCROLL FOR NEXT