Sangli Sugarcane Farmers: साखर कारखाने आणि ऊस उत्पादकांत दरी वाढत असताना, क्रांती साखर कारखान्याने शेतकऱ्यांशी असलेले ऋणानुबंध घट्टपणे जपले आहेत, असे प्रतिपादन वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूटचे महासंचालक डॉ. संभाजीराव कडू-पाटील यांनी केले. .‘क्रांती’च्या २०२६-२७ गाळप हंगामाच्या प्रारंभानिमित्त पूजा, बॉयलर अग्निप्रदीपन तसेच एकरी विक्रमी ऊस उत्पादन घेणाऱ्या शेतकऱ्यांना पुरस्कार वितरण सोहळा उत्साहात झाला. डॉ. कडू-पाटील प्रमुख पाहुणे होते. कारखान्याचे मार्गदर्शक संचालक आमदार अरुण लाड अध्यक्षस्थानी होते..Kadva Sugar Factory : कादवा कारखान्याकडून प्रतिटन ३ हजार रुपये ऊस बिल वर्ग.डॉ. कडू-पाटील म्हणाले, ‘‘सध्या अनेक कारखान्यांचे गाळपासाठी ऊस मिळवणे हेच एकमेव ध्येय झाले आहे. ऊस उत्पादक शेतकऱ्यांच्या शेतीमध्ये परिवर्तन घडवून आणण्यासाठी फार कमी कारखाने प्रयत्नशील आहेत. ऊस उत्पादन वाढीसाठी शेतकऱ्यांना आधुनिक तंत्रज्ञान, सुधारित शेती पद्धती आणि मार्गदर्शन देण्यासाठी क्रांती कारखाना अग्रेसर आहे.’’.Cooperative Sugar Mills Loan: सहकारी कारखान्यांना सवलतीने कर्ज शक्य; ‘सहकार’चा वित्त विभागाकडे प्रस्ताव.इफ्को (पुणे)चे राज्य विपणन व्यवस्थापक डॉ. महादेव पवार यांनी खतांवरील वाढता खर्च विचारात घेऊन संतुलित खत व्यवस्थापनावर भर देण्याचे आवाहन केले. गाळप हंगाम २०२५-२६ मध्ये एकरी विक्रमी ऊस उत्पादन घेणाऱ्या शेतकऱ्यांचा सन्मान करण्यात आला..अर्जुन पवार, संभाजी पाटील, अशोक होनमाने, नामदेव जाधव, अर्जुन कदम, बाळकृष्ण धोत्रे, दिलीप जाधव, शिवाजी लाड, दशरथ लाड, ऋषिकेश पाटील आणि जयंतराव यादव यांना पुरस्कार प्रदान करण्यात आले..कारखान्याचे अध्यक्ष शरद लाड, उपाध्यक्ष जयप्रकाश साळुंखे, व्हीएसआयचे डॉ. डी. एस. पवार, राजेंद्र भोईटे, नितीन नवले, पोपटराव संकपाळ, कार्यकारी संचालक अप्पासाहेब कोरे, सचिव वीरेंद्र देशमुख, कार्यालयीन अधीक्षक अविनाश लाड, ऊस विकास अधिकारी विलास जाधव यांच्यासह शेतकरी, सभासद उपस्थित होते..ॲग्रोवनचे सदस्य व्हाशॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.