Cotton Market
Cotton Market  Agrowon
मार्केट इन्टेलिजन्स

Cotton Arrival : कापसाची आवक वाढत्या पातळीवर स्थिर

डॉ.अरूण कुलकर्णी

डिसेंबर महिन्यात अंडी व इतर प्राणिजन्य पदार्थांची स्थानिक व निर्यात मागणी वाढत होती. याही महिन्यात हा वाढीचा कल कायम राहण्याची शक्यता आहे. किंबहुना, या वस्तूंच्या मागणीचा दीर्घकालीन कल वाढता आहे.

त्यामुळे पशुखाद्यासाठी लागणाऱ्या सर्व शेतीमालाच्या मागणीचा कल वाढत आहे. त्याचा परिणाम त्यांच्या किमती वाढण्यावर झाला आहे. ऑक्टोबर ते डिसेंबर २०२२ या महिन्यात, मुख्यत्वे आंतर-राष्ट्रीय परिस्थितीमुळे सोयाबीनमध्ये वाढता तर कापसामध्ये उतरता कल राहिला.

डिसेंबर महिन्यात कापसाची आवक (Cotton Arrival) वाढत्या पातळीवर स्थिर राहिली. मक्याची आवक (Maize Arrival) मोठ्या प्रमाणात घसरली.

मूग व सोयाबीन (Soybean Arrival) यांचीही आवक घसरत होती. तुरीची आवक (Tur Arrival) आता वाढू लागली आहे. या महिन्यात ती वाढती असेल. हरभरा, कांदा व टोमॅटो यांची आवक स्थिर राहिली.

२० जानेवारी रोजी संपणाऱ्या सप्ताहात हरभरा, सोयाबीन व कांदा यांच्या किमतीत घट झाली. इतरांच्या किमतीत वाढ झालेली दिसली. मुगामध्ये ३.५ टक्के, तर मक्यात २ टक्के वाढ झाली.

या सप्ताहामधील किमतींतील सविस्तर चढ-उतार खालील प्रमाणे आहेत.

कापूस/कपाशी

MCX मधील कापसाचे व कपाशीचे (Cotton Rate) राजकोटमधील स्पॉट भाव (रु. प्रति १७० किलोची गाठी) डिसेंबर महिन्यात घसरत होते. गेल्या सप्ताहात कापसाचे स्पॉट भाव २.६ टक्क्यांनी घसरून रु. २९,६८० वर आले होते;

या सप्ताहात मात्र ते ०.८ टक्क्याने वाढून रु. २९,९१० वर आले आहेत. कपाशीचे स्पॉट भावसुद्धा (प्रति २० किलो) किंचित वाढून रु १,६१९ वर आले आहेत. कापसाचे हमीभाव लांब धाग्यासाठी (प्रति क्विंटल) रु. ६,३८० व मध्यम धाग्यासाठी रु. ६,०८० आहेत.

मका

मक्याच्या स्पॉट किमती (छिंदवाडा) नोव्हेंबर व डिसेंबर महिन्यांत वाढत होत्या. गेल्या सप्ताहात स्पॉट किमती रु. २,२०० वर आल्या होत्या. या सप्ताहात त्या रु. २,२४० वर आल्या आहेत.

फ्यूचर्स (फेब्रुवारी डिलिव्हरी) किमती रु. २,२१६ वर आल्या आहेत. एप्रिल फ्यूचर्स किमती रु. २,२४० वर आहेत. मक्याचा हमीभाव रु. १,९६२ आहे. सध्याच्या किमती हमीभावापेक्षा अधिक आहेत.

हळद

हळदीच्या स्पॉट (निजामाबाद) किमती डिसेंबर महिन्यात वाढत होत्या. गेल्या सप्ताहात त्या ०.३ टक्क्याने वाढून रु. ७,३५७ वर आल्या होत्या. या सप्ताहात त्या ०.५ टक्क्याने वाढून रु. ७,३९२ वर आल्या आहेत.

एप्रिल फ्यूचर्स किमती रु. ७,७३८ वर आल्या आहेत. मे फ्यूचर्स किमती रु. ७,९१६ वर आल्या आहेत. या सर्वांत वाढीचा कल आहे.

हरभरा

हरभऱ्याच्या स्पॉट (बिकानेर) किमती गेल्या सप्ताहात १.३ टक्क्याने घसरून रु. ४,९८४ वर आल्या होत्या. या सप्ताहात त्या पुन्हा १.५ टक्क्याने घसरून रु. ४,९१४ वर आल्या आहेत. हरभऱ्याचा हमीभाव रु. ५,३३५ आहे.

मूग

मुगाच्या किमती डिसेंबर महिन्यात वाढत होत्या. याही महिन्यात हा कल कायम आहे. मुगाची स्पॉट किमत (मेरटा) गेल्या सप्ताहात ४ टक्क्यांनी वाढून रु. ७,८०० वर आली होती. या सप्ताहात ती पुन्हा ३.५ टक्क्यांनी वाढून रु. ८,०७५ वर आली आहे. मुगाचा हमीभाव रु. ७,७५५ जाहीर झाला आहे. आवक कमी होत आहे.

सोयाबीन

गेल्या सप्ताहात सोयाबीनची स्पॉट किमत (इंदूर) ०.४ टक्क्याने घसरून रु. ५,७५६ वर आली होती; या सप्ताहात ती पुन्हा १.७ टक्क्याने घसरून रु. ५,६५६ वर आली आहे. चालू वर्षासाठी सोयाबीनचा हमीभाव रु. ४,३०० आहे.

तूर

तुरीची स्पॉट किमत (अकोला) गेल्या सप्ताहात १.९ टक्क्याने घसरून रु. ६,९०० वर आली होती. या सप्ताहात ती ०.७ टक्क्याने वाढून ६,९५० वर आली आहे. तुरीची आवक वाढू लागली आहे.तुरीचा हमीभाव रु. ६,६०० आहे.

कांदा

कांद्याची किंमत (पिंपळगाव) गेल्या सप्ताहात रु. १,३६७ होती; या सप्ताहात ती रु. १,२८८ वर आली आहे.

टोमॅटो

गेल्या सप्ताहात टोमॅटोची स्पॉट किमत (जुन्नर, नारायणगाव) रु. ८०० वर आली होती. या सप्ताहात ती रु. ८६७ वर आली आहे.

(सर्व किमती प्रति क्विंटल; कापसाची किंमत प्रति १७० किलोची गाठी; कपाशीची किंमत प्रति २० किलो.)

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Mahavitaran : ‘महावितरण’च्या यंत्रचालक, तंत्रज्ञांचा विशेष गौरव

Nagpur Lok Sabha : ...तर मतदानात वाढ झाली असती

Sangli Lok Sabha Election : सांगली लोकसभा मतदार संघात १६६८ दिव्यांग, ज्येष्ठांचे मतदान

Co-operative Credit Society : सांगलीतील २३१ सोसायट्यांचे संगणकीकरण मेअखेर पूर्ण करा

Water Tanker Bill : टॅंकरने पाणी पुरविणाऱ्यांची १५ कोटींचे देयके थकली

SCROLL FOR NEXT