Encroachment Free Vanpuri: पुरंदर तालुक्यातील ‘वनपुरी’ ठरले पथदर्शी

Revenue Dept: राज्य शासनाच्या महसूल विभागामार्फत राबविण्यात आलेल्या पाणंद रस्ते अतिक्रमणमुक्त करण्याच्या मोहिमेला पुरंदर तालुक्यात यश आले आहे. यासोबत तालुक्यातील वनपुरी येथे शेतकऱ्यांच्या सातबारा उताऱ्यावर ‘इतर हक्कांत’ या रस्त्याची नोंदही झाली आहे.
Encroachment Free Vanpuri
Encroachment Free VanpuriAgrowon
Published on
Updated on

Pune News: राज्य शासनाच्या महसूल विभागामार्फत राबविण्यात आलेल्या पाणंद रस्ते अतिक्रमणमुक्त करण्याच्या मोहिमेला पुरंदर तालुक्यात यश आले आहे. यासोबत तालुक्यातील वनपुरी येथे शेतकऱ्यांच्या सातबारा उताऱ्यावर ‘इतर हक्कांत’ या रस्त्याची नोंदही झाली आहे. जिल्ह्यात अशा प्रकारे सातबारा उताऱ्यावर पाणंद रस्त्याची नोंद करणारे वनपुरी हे पहिलेच गाव असल्याचे तहसीलदार विक्रम राजपूत यांनी सांगितले.

सासवड येथील तहसील कार्यालयात तहसीलदार राजपूत यांच्या हस्ते बुधवारी वनपुरीतील शेतकऱ्यांच्या सातबारा उताऱ्यावर ‘इतर हक्कांत’ या पाणंद रस्त्याची नोंद करण्यात आल्याचे सातबारा उताऱ्यांचे वाटप झाले. या पथदर्शी उपक्रमामुळे शेतकऱ्यांना दिलासा मिळाला आहे.

Encroachment Free Vanpuri
Grazing Land Encroachment : गायरान जमिनीवरील अतिक्रमण ‘जैसे थे’

अनेकदा शेतापर्यंत जाण्यासाठी असलेल्या पाणंद रस्त्यांवर अतिक्रमणे होतात, ज्यामुळे शेतकऱ्यांना शेतीकामांसाठी अडचणी येतात. ही मोहीम आणि सातबारा उताऱ्यावरील नोंद यामुळे भविष्यात अशा अडचणी दूर होण्यास मदत होईल.

Encroachment Free Vanpuri
Encroachment Removal : राज्यातील वन विभागाच्या जमिनीवरील अतिक्रमण हटवण्यात येणार

याबद्दल पुरंदरच्या महसूल, पोलिस आणि भूमी अभिलेख विभागातील अधिकाऱ्यांचे अभिनंदन करत त्यांच्या समन्वयामुळेच हा महत्त्वाचा टप्पा गाठता आल्याचे मत वनपुरीतील शेतकऱ्यांनी व्यक्त केले.  या वेळी माजी ग्रामपंचायत सदस्य संभाजी महामुनी, शेतकरी महादेव गायकवाड, सुनील गायकवाड, तन्वीर शेख, मंडल अधिकारी दुर्गादास शेळकंदे, गाव कामगार तलाठी सागर चव्हाण उपस्थित होते.

पुरंदर तालुक्यात आतापर्यंत ६१ पाणंद रस्ते अतिक्रमणमुक्त झाले आहेत. संबंधित शेतकऱ्यांनी सातबारावर या रस्त्यांची इतर हक्कात नोंद करून घ्यावी, जेणेकरून पुढे या रस्त्यांवर अतिक्रमण होणार नाही. 
- विक्रम राजपूत, तहसीलदार, पुरंदर

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon - Agriculture News
agrowon.esakal.com