Cotton Market Agrowon
मार्केट इन्टेलिजन्स

Cotton Market : वेचणीबरोबरच बाजारात कापसाची आवकही सुरू

Cotton Picking : मराठवाड्यातील कापूस उत्पादक जिल्ह्यात कापसाच्या वेचणीला प्रारंभ झाला आहे. वेचणीबरोबरच कापसाची बाजारात आवकही सुरू झाली.

संतोष मुंढे ः ॲग्रोवन वृत्तसेवा

Jalna News : मराठवाड्यातील कापूस उत्पादक जिल्ह्यात कापसाच्या वेचणीला प्रारंभ झाला आहे. वेचणीबरोबरच कापसाची बाजारात आवकही सुरू झाली. कुंभार पिंपळगाव येथील बाजारात बुधवारी (ता. १७) आवक झालेल्या कापसाला ६९०० रुपये प्रतिक्विंटलचा दर मिळाला.

मराठवाड्यात कपाशीचे सर्वसाधारण क्षेत्र १५ लाख ४५ हजार ४१२ हेक्टर आहे. या सर्वसाधारण क्षेत्राच्या तुलनेत १४ लाख ६ हजार ८३२ हेक्टरवर कपाशीची प्रत्यक्ष पेरणी झाली.

या पेरणी झालेल्या क्षेत्रामध्ये छत्रपती संभाजीनगर, जालना, बीड या तीन जिल्ह्यांत ९ लाख ६९ हजार ४२५ हेक्टर तर लातूर कृषी विभागातील ५ जिल्ह्यांत ४ लाख ३७ हेक्टर कपाशी पिकाच्या क्षेत्राचा समावेश आहे.

पावसातील खंडामुळे पिकाच्या वाढीवरही विपरित परिणाम झाला आहे. त्यामुळे कपाशीच्या उत्पादनात ४० ते ५० टक्क्यांच्या पुढे घटीची शक्यता वर्तवली जात आहे. छत्रपती संभाजीनगरसह जालना, बीड जिल्ह्यात कपाशी हे प्रमुख पीक आहे.

या तीनही जिल्ह्यांत पावसाचा प्रदीर्घ खंड कपाशीच्या पिकाला सहन करावा लागला. कापसाची वेचणी सुरू झाली आहे. कपाशीला असलेल्या बोंडांची संख्या पाहता एकरी दोन ते चार क्विंटलच्या आतच कापसाचे उत्पादन राहण्याची शक्यता आहे.

('ॲग्रोवन'चं व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

गतवर्षी पाच रुपये प्रतिकिलोपासून सुरुवात झालेली कपाशीची वेचणी यंदा प्रतिकिलो सात ते आठ रुपयांपासून सुरू झाली आहे. कपाशीची वेचणी अंतिम टप्प्यात येईल तसतसे दर दहा रुपये किवा त्यापुढे प्रतिकिलोपर्यंत जाण्याची शक्यता शेतकऱ्यांनी वर्तवली आहे. कापसाच्य वेचणीबरोबरच बाजारातील आवकही सुरू झाली आहे.

जालना जिल्ह्यातील कुंभार पिंपळगाव येथील कृषी उत्पन्न बाजार समितीच्या आठवडे भुसार बाजारात बुधवारी (ता. १७) कापसाला ६९०० रुपये क्विंटलचा भाव मिळाला. तर सोयाबीनला ४४०० रुपये प्रतिक्विंटलचा भाव मिळाला. बाजारात कापसाची ४० ते ५० क्विंटलची आवक होती. सोयाबीनची ४ हजार क्विंटलची आवक झाली होती.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Orange Crop Insurance: आंबिया बहर संत्रा फळपिकासाठी विमा योजना

Modern Fruit Farming: शेतीतच भविष्य शोधलेला‘बायोकेमिस्ट्री’चा तरुण

Minimum Support Price: आधारभूत किमतीपेक्षा कमी दराने खरेदीचा प्रश्न ऐरणीवर

Crop Damage Compensation : जालना जिल्ह्यात १८५ कोटी नुकसाभरपाईची मदत वाटप

Farmers FPO: शेतकऱ्यांचा विश्‍वास हेच भांडवल ठरलं मोलाचं !

SCROLL FOR NEXT