Summer Moong Agrowon
मार्केट इन्टेलिजन्स

Summer Moong Procurement: मध्य प्रदेशात उन्हाळी मूग उत्पादकांची वाढली चिंता

Agriculture Production: सोयाबीन उत्पादक मध्य प्रदेशातील १६ जिल्ह्यांत उन्हाळी मुगाखालील क्षेत्रात गेल्या वर्षीच्या तुलनेत यंदा वाढ नोंदविली गेली.

विनोद इंगोले : ॲग्रोवन वृत्तसेवा

Nagpur News: सोयाबीन उत्पादक मध्य प्रदेशातील १६ जिल्ह्यांत उन्हाळी मुगाखालील क्षेत्रात गेल्या वर्षीच्या तुलनेत यंदा वाढ नोंदविली गेली. सुमारे २१ लाख टन उत्पादन या वाढीव क्षेत्रातून अपेक्षित असतानाच सरकारकडून मात्र शासकीय मूग खरेदीबाबत कोणत्याच हालचाली नसल्याने शेतकऱ्यांची चिंता वाढली आहे.

मध्य प्रदेश देशात सोयाबीन लागवड आणि उत्पादनासाठी ओळखले जाते. त्याबरोबरच मध्य प्रदेशातील १६ जिल्ह्यांमध्ये उन्हाळी पिके घेणाऱ्या शेतकऱ्यांची संख्या देखील मोठी आहे. या उन्हाळी पिकात शेतकऱ्यांची मुगाला पसंती असते. त्यामुळेच गेल्या वर्षीच्या तुलनेत यंदा लागवड क्षेत्रातही वाढ नोंदविली गेली आहे. गेल्या हंगामात ११.५९ लाख हेक्‍टरवर मूग लागवड होती.

यावर्षी सुमारे १३.४९ लाख हेक्‍टरपर्यंत हे क्षेत्र विस्तारले. विस्तारीत क्षेत्राच्या माध्यमातून मध्य प्रदेशातील एकूण मुगाचे उत्पादन २१ लाख टन अपेक्षित असल्याची माहिती सूत्रांनी दिली. दरवर्षी मध्य प्रदेश सरकारकडून राज्यात उत्पादित उन्हाळी मुगाची हमीभावाने खरेदी होते. गेल्या वर्षी २० मे २०२४ पासून नोंदणीला सुरुवात करण्यात आली. त्यानंतर मुगाची खरेदी देखील झाली.

यावर्षी मात्र अद्याप खरेदी संदर्भाने केंद्र सरकारकला प्रस्ताव देखील पाठविण्यात आलेला नाही. त्यामुळे यंदाच्या हंगामातील उन्हाळी मूग खरेदीबाबत मध्य प्रदेश सरकार सकारात्मक नसल्याची चर्चा आहे. उन्हाळी मुगाच्या खरेदीबाबत अशाप्रकारे अनिश्‍चितता असतानाच ‘नाफेड’कडून त्यांच्याकडील शेतीमालाची विक्री केली जात आहे. त्यामुळे बाजारात मुगाचे दर हमीभावाच्या खाली आले आहेत.

चांगल्या प्रतीच्या मुगाचे व्यवहार ७१५० ते ७२०० रुपयांनी होत आहेत. त्याचवेळी साधारण मुगाला ६६०० ते ६९०० रुपयांचा दर मिळत असल्याची माहिती मध्य प्रदेशातील व्यापाऱ्यांनी दिली. हमीभावाने खरेदी सुरू होत नाही तोवर मुगाचे दर दबावात राहतील, असेही सांगितले जाते. ग्राहकांकडून देखील डाळ खरेदी मंदावल्याने त्याबरोबरच प्रक्रिया उद्योजकांकडे कच्च्चा मालाचा अपेक्षित साठा असल्याने उडदाचेही दर हमीभावापेक्षा कमी असल्याचे सांगण्यात आले.

असा आहे मूग-उडदाचा दर

मूगाचा हमीभाव २०२४-२५ या वर्षात ८६८२ रुपये होता. २०२५-२६ या वर्षात त्यात ८६ रुपयांची वाढ करीत ८७६८ रुपये असा दर जाहीर करण्यात आला आहे. त्याचवेळी उडदाच्या हमीभावात गेल्या वर्षीच्या तुलनेत ४०० रुपयांची वाढ केली आहे. उडदाचा दर ७४०० रुपयांवरून ७८०० असा यंदा करण्यात आला आहे.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Shiv Sena Split Case: शिंदेंनी कोणत्या आधारे 'मुख्य नेता' पद स्वतःला बहाल केलं? ठाकरेंच्या वकिलांचा जोरदार युक्तिवाद

Rain Damage Compensation: अतिवृष्टीग्रस्तांसाठी ३९ कोटींच्या निधी वाटपाला गती

Krantisinha Nana Patil Award : क्रांतिसिंह नाना पाटील पुरस्कार’ राजू देसले यांना

Farmers Loan Waiver: शेतकऱ्यांची कर्जमुक्तीकडे वाटचाल

Koyna Dam Water : कोयना धरणातून पाण्याचा विसर्ग पूर्णपणे बंद

SCROLL FOR NEXT