Chana Rate
Chana Rate  Agrowon
मार्केट इन्टेलिजन्स

Chana Rate : हरभऱ्याचे दर हमीभावापेक्षा कमी

डॉ.अरूण कुलकर्णी

Chana Market Update जानेवारी महिन्यात कापसाची आवक (Cotton Arrival) वाढत्या पातळीवर स्थिर राहिली. मक्याची आवक मोठ्या प्रमाणात घसरली. मूग व सोयाबीन यांचीही आवक (Soybean Arrival) घसरत होती.

तुरीचा हंगाम (Tur Season) सुरु झाला आहे व आवक जानेवारी महिन्यापासून वाढू लागली. या सप्ताहातसुद्धा ती वाढती आहे. हळद, हरभरा यांची आवक कमी पातळीवर स्थिर होती. कांद्याची व टोमॅटोची आवक या सप्ताहात वाढली आहे.

जानेवारी महिन्यात मूग व टोमॅटो वगळता सर्व वस्तुंच्या किमती घसरत होत्या. या सप्ताहातसुद्धा मूग, टोमॅटो व सोयाबीन (Soybean Rate) वगळता सर्व वस्तुंच्या किमती घसरल्या. सोयाबीनच्या (अकोला) किमती दोन टक्क्यांनी वाढल्या.

सोमवार, १३ फेब्रुवारी २०२३ पासून MCX मध्ये पुन्हा कापसाचे फ्युचर्स व्यवहार सुरु होत आहेत. ते एप्रिल २०२३, जून २०२३ व ऑगस्ट २०२३ डिलिवरीसाठी असतील. पुढील सप्ताहापासून या संबंधी अधिक माहिती देण्यात येईल.

१० फेब्रुवारी रोजी संपणाऱ्या सप्ताहातील किमतींमधील सविस्तर चढ-उतार खालील प्रमाणे आहेत.

कापूस/कपाशी

MCX मधील कापसाचे व कपाशीचे राजकोट मधील स्पॉट भाव (रु. प्रति १७० किलोची गाठी) जानेवारी महिन्यात स्थिर होते. गेल्या सप्ताहात कापसाचे स्पॉट भाव रु. २९,८३० वर आले होते; या सप्ताहात ते रु. २९,९१० वर आले आहेत.

कपाशीचे स्पॉट भाव (प्रति २० किलो) ०.७ टक्क्यांनी घसरून रु १,५८१ वर आले आहेत. यंदा कापसाचे हमीभाव लांब धाग्यासाठी (प्रति क्विंटल) रु. ६,३८० व मध्यम धाग्यासाठी रु. ६,०८० आहेत.

मका

मक्याच्या स्पॉट किमती (छिंदवाडा) जानेवारी महिन्यात स्थिर होत्या. गेल्या सप्ताहात स्पॉट किमती रु. २,१२६ वर आल्या होत्या. या सप्ताहात त्या ०.९ टक्क्यांनी घसरून रु. २,१०८ वर आल्या आहेत.

फ्युचर्स (मार्च डिलिवरी) किमती रु. २,१२३ वर आल्या आहेत. मे फ्युचर्स किमती रु. २,१४७ वर आहेत. मक्याचा हमीभाव रु. १,९६२ आहे. सध्याच्या किमती हमीभावापेक्षा अधिक आहेत.

हळद

हळदीच्या स्पॉट (निझामाबाद) किमती जानेवारी महिन्यात स्थिर होत्या. गेल्या सप्ताहात त्या रु. ७,२१६ वर आल्या होत्या. या सप्ताहात त्या १.२ टक्क्यांनी घसरून रु. ७,१३१ वर आल्या आहेत. एप्रिल फ्युचर्स किमती रु. ६,९६० वर आल्या आहेत. मे फ्युचर्स किमती रु. ७,०२२ वर आल्या आहेत.

हरभरा

हरभऱ्याच्या स्पॉट (अकोला) किमती या सप्ताहात त्या २.२ टक्क्यांनी घसरून रु. ४,५०० वर आल्या आहेत. हरभऱ्याचा हमीभाव रु. ५,३३५ आहे. सध्याचे भाव हमीभावापेक्षा कमी आहेत.

मूग

मुगाच्या किमती जानेवारी महिन्यात वाढत होत्या. मुगाची स्पॉट किमत (मेरटा) गेल्या सप्ताहात रु. ७,८०० वर आली होती. या सप्ताहात ती १.३ टक्क्यांनी वाढून रु. ७,९०० वर आली आहे. मुगाचा हमीभाव रु. ७,७५५ आहे. आवक कमी होत आहे.

सोयाबीन

सोयाबीनच्या किमती जानेवारी महिन्यात कमी होत होत्या. या सप्ताहात सोयाबीनची स्पॉट किमत (अकोला) २.१ टक्क्यांनी घसरून रु. ५,५६८ वर आली आहे. सोयाबीनचा हमीभाव रु. ४,३०० आहे. सोयाबीनची आवक कमी होत आहे.

तूर

तुरीची स्पॉट किमत (अकोला) या सप्ताहात रु. ६,९३३ वर स्थिर आहे. तुरीची आवक वाढू लागली आहे. तुरीचा हमीभाव रु. ६,६०० आहे.

कांदा

कांद्याची किंमत (पिंपळगाव) गेल्या सप्ताहात रु. १,११० होती; या सप्ताहात ती घसरून रु. १,०५० वर आली आहे.

टोमॅटो

गेल्या सप्ताहात टोमॅटोची स्पॉट किमत (जुन्नर, नारायणगाव) रु. ५०० वर आली होती. या सप्ताहात ती वाढून रु. ६२५ वर आली आहे.

(सर्व किमती प्रति क्विंटल; कापसाची किंमत प्रति १७० किलोची गाठी; कपाशीची किंमत प्रति २० किलो).

: arun.cqr@gmail.com

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Accident Insurance Scheme : अपघात विमा योजनेतून ४५० शेतकरी कुटुंबांना मदत

Banana Sunburn : उन्हाच्या तीव्रतेमुळे जळताहेत केळीची रोपे

Summer Heat : मालेगावात वैशाखाआधीच वणवा

Adulterated Milk : भेसळयुक्त दूध रोखण्यासाठी उपाययोजना कराव्यात

Water Scarcity : कळंबा परिसरात पाण्याचा प्रश्‍न गंभीर

SCROLL FOR NEXT