New Delhi News: कच्चा तागाचा (टीडी-३) २०२५-२६ साठी हमीभाव प्रतिक्विंटल ५६५० रुपये जाहीर करण्यात आला आहे. केंद्र सरकारच्या या निर्णयामुळे ताग उत्पादकांना सरासरी ६६.८ टक्के अधिक उत्पन्न मिळेल, अशी माहिती केंद्रीय कृषी व शेतकरी कल्याण मंत्रालयाने दिली आहे.
केंद्र सरकारने २०२५-२६ च्या आर्थिक वर्षासाठी कच्चा तागाच्या किमान आधारभूत किमतीत (एमएसपी) म्हणजेच हमीभावात वाढ केली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या अध्यक्षतेखाली केंद्रीय आर्थिक घडामोडी समितीची बैठक बुधवारी ता.२२) आयोजित करण्यात आली होती.
या बैठकीत कच्चा तागाच्या हमीभावात प्रति क्विंटल ३१५ रुपयांची वाढ केली. २०२५- २६ साठी कच्चा तागाचा (टीडी-३) हमीभाव प्रतिक्विंटल ५६५० रुपये जाहीर करण्यात आला. केंद्र सरकारच्या या निर्णयामुळे ताग उत्पादकांना सरासरी ६६.८ टक्के अधिकचे उत्पन्न मिळेल, अशी माहिती केंद्रीय कृषी व शेतकरी कल्याण मंत्रालयाने दिली आहे.
गेल्या वर्षी केंद्र सरकारने १ लाख ७० हजार शेतकऱ्यांकडून ज्यूट कॉर्पोरेशन ऑफ इंडियाच्या मदतीने ताग खरेदी केली होती. तसेच २०२४-१५ तसेच २०२४-२५ या कालावधीत तब्बल १३०० कोटी रुपयांचा खर्च करण्यात आल्याचा दावाही कृषी मंत्रालयाकडून करण्यात आला आहे. तर, २००४ ते २०१४ दरम्यान तत्कालीन युपीए सरकारने केवळ ४४१ कोटी रुपयांचे ताग खरेदी केल्याच्या आकड्यांकडे कृषी मंत्रालयाने प्रसिद्धी पत्रकात लक्ष वेधले आहे.
केंद्र सरकारने २०२४-१५ मध्ये कच्चा तागासाठी २४०० रुपये प्रति क्विंटलचा हमीभाव जाहीर केला होता. त्यामध्ये आत्तापर्यंत ३२५० रुपयांची म्हणजेच २.३५ पट वाढ करण्यात आल्याचे मंत्रालयाकडून सांगण्यात आले आहे.
ॲग्रोवनचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.
ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.