Fertilizer Subsidy
Fertilizer Subsidy Agrowon
मार्केट इन्टेलिजन्स

Fertilizer Subsidy : खरीप हंगामासाठी १.०८ लाख कोटींच्या खत अनुदानाला मंत्रिमंडळाची मंजुरी

Team Agrowon

Fertilizer Market : सरकार खतांच्या किमतीत वाढ करणार नाही आणि युरियासाठी ७०,००० कोटी रुपये आणि डाय-अमोनियम फॉस्फेट (डीएपी) साठी ३८,००० कोटी रुपये खर्च करणार आहे, असे केंद्रीय मंत्री मनसुख मांडविया यांनी बुधवारी सांगितले.

ते म्हणाले, केंद्रीय मंत्रिमंडळाच्या बुधवारी (ता. १७) झालेल्या बैठकीत खरीप हंगामासाठी १.०८ लाख कोटी रुपयांच्या खत अनुदानाला मंजुरी देण्यात आली आहे. मंत्रिमंडळाने खतांच्या किमतीत वाढ न करण्याचा निर्णय घेतला आहे.

मंत्रिमंडळाने खरीप हंगामासाठी १.०८ लाख कोटी रुपयांच्या खत अनुदानाला मंजुरी दिली आहे. सरकार युरियासाठी ७०,००० कोटी रुपये आणि डाय-अमोनियम फॉस्फेट (डीएपी) साठी ३८,००० कोटी रुपये खर्च करणार आहे, असे मंडाविया यांनी केंद्रीय मंत्रिमंडळाच्या निर्णयांबाबत पत्रकार परिषदेत सांगितले.

युनियन केमिकल्स अँड फर्टिलायझर्सने सांगितले की, भारताची युरियाची वार्षिक गरज ३२५-३५० लाख टन आहे. मांडविया म्हणाले, की आंतरराष्ट्रीय बाजारात खताच्या किमतीत तफावत असताना देशातील शेतकऱ्यांना वेळेवर खत मिळणे आणि त्याचा बोजा सहन करावा लागणार नाही, हे आमच्या सरकारसाठी आवश्यक आहे.

गेल्या वर्षी सरकारच्या अर्थसंकल्पात खत अनुदानासाठी २.५६ लाख कोटी रुपये खर्च झाले होते. केंद्रीय मंत्रिमंडळाने १७,००० कोटी रुपयांच्या अर्थसंकल्पी खर्चासह आयटी हार्डवेअरसाठी उत्पादन लिंक्ड इन्सेंटिव्ह (पीएलआय) योजनेलाही मंजुरी दिली.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Cotton Seed : कपाशीच्या बियाण्यांसाठी तेलंगणाची वारी

Bribe Arrest : निलंबन रद्द करण्यासाठी ५० हजारांच्या लाचेची मागणी

Animal Vaccination : पावसाळ्यापूर्वी जनावरांचे लसीकरण करा

Summer Sowing : दुष्काळी छायेतही २४ हजार हेक्टरवर पेरा

Summer Sowing : यवतमाळच्या शेतकऱ्यांची उन्हाळी तिळाला पसंती

SCROLL FOR NEXT