Cotton Market Agrowon
मार्केट इन्टेलिजन्स

Cotton Market Rate : कापूस वायद्यांमध्ये तेजी; कापूस दरातील 'ऑफ सिझन' मधील तेजी हीच का?

Agriculture Market Update : कापूस वायद्यांमध्ये दोन दिवसात चांगली तेजी पाहायला मिळाली. त्यामुळे ऑफ सिझनमध्ये अपेक्षित असणारी तेजी हीच आहे का? असा प्रश्न शेतकरी विचारू लागले आहेत.

Anil Jadhao 

Pune News : कापूस वायद्यांमध्ये दोन दिवसात चांगली तेजी पाहायला मिळाली. त्यामुळे ऑफ सिझनमध्ये अपेक्षित असणारी तेजी हीच आहे का? असा प्रश्न शेतकरी विचारू लागले आहेत. पण बाजारातील एकूणच समिकरण पाहीलं तर देशातील बाजाराला आधार देणारे काही घटक आहेत. या घटकांमुळे देशातील बाजारात कापसाला आधार मिळू शकतो. पण बाजारात चांगली तेजी येण्यासाठी आंतरराष्ट्रीय बाजारात आणखी सुधारणा आवश्यक आहे. त्यातही कापूस बाजाराचे लक्ष अमेरिकेच्या कापूस पिकाच्या अहवालाकडे आहे. 

देशातील बाजारातही कापूस भावात सुधारणा झाली. वायद्यांमध्ये अडीच महिन्यांनंतर कापूस वायदे ५९ हजारांच्या पार गेले. आज दुपारी एमसीएक्सवर कापसाचे वायदे ५९ हजार ५०० रुपये प्रतिखंडीवर होते. तर बाजार समित्यांमधील भावही १०० ते १५० रुपयांनी वाढला होता. काही बाजारात कापसाचा कमाल भाव ८ हजारांवर गेला. तर सरासरी भावपातळी ७ हजार ते ७ हजार ६०० रुपयांवर होती. अनेक दिवसांनंतर कापूस बाजारात लक्षणीय वाढ झाल्याने दरात चांगली तेजी येईल का? असा प्रश्न शेतकरी आणि व्यापारीही विचारत आहेत. 

देशातील सध्याची सुधारणा होण्याला प्रमुख्याने काही कारण आहेत. त्यात देशातील कापूस लागवडीचा घटत असलेला टक्का, देशातील कापूस वापर, निर्यातीसाठी येत असलेली मागणी, सरकीचे टिकून असलेले बाजारभाव आणि आंतरराष्ट्रीय बाजारातील सुधारणा यामुळे देशातील कापूस दरात सुधारणा झाली आहे. विशेष म्हणजे आंतरराष्ट्रीय बाजारातील सुधारणा हा महत्वाचा घटक आहे.  

आंतरराष्ट्रीय बाजारात कापसाचे वायदे मागील तीन दिवसांमध्ये ४ टक्क्यांनी वाढले. आंतरराष्ट्रीय बाजारातील कापूस वायदे आज सायंकाळी ७५.३४ सेंट प्रतिपाऊंडच्या दरम्यान होते. विशेष म्हणजे ही दरपातळी कापूस वायद्यांनी तीन आठवड्यांनंतर दाखवली. 

अमेरिकेच्या कापूस निर्यातीत दिसत असलेली सुधारणा, काही भागात कोरडे हवामान आणि कच्च्या तेलाच्या किमतीतील सुधारणा आणि डाॅलरची कमी झालेली किंमत यामुळे आंतरराष्ट्रीय बाजारात सुधारणा दिसत असल्याचे अभ्यासक सांगत आहेत. पण कापसाच्या मागणीत फार मोठी सुधारणा नसल्याचेही त्यांनी स्पष्ट केले. यामुळे भावातील सुधारणेवर मर्यादा दिसू शकतात.

पण आंतरराष्ट्रीय बाजारातील ही सुधारणा टिकेल का? तर यासाठी अमेरिकेच्या कृषी विभागाच्या अहवालाकडे बाजाराचे लक्ष आहे. या अहवालात अमेरिकेच्या कापसाला मागणी कशी आहे? निर्यात किती वाढली? पिकाची परिस्थिती कशी आहे? याचा तपशील असेल. या अहवालातील गोष्टी कापूस बाजाराला आधार देणाऱ्या असतील तर बाजार सध्याच्या दरापेक्षा वाढेल. असे झाले तर देशातील बाजारातही सुधारणा अपेक्षित आहे. 

सर्वात महत्वाचे म्हणजे मार्केट सध्या सेंटीमेंटनुसार चालत आहे. सेंटीमेंट नकारात्मक असल्याने दरावर सातत्याने दबाव दिसत होता. आता सेंटीमेट सकारात्मक झाल्याने बाजारात सुधारणा दिसून येत आहेत. हे सकारात्मक सेंटीमेंट कायम राहीले आणि त्याला मागणीची जोड मिळाली तर कापूस भावात चांगल्या सुधारणेची अपेक्षा आहे. 

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Maharashtra Assembly Election : शेतकरी संघटनांना भुलवतेय आमदारकीची मोहमाया

Maharashtra Assembly Election : पुणे जिल्ह्यात शिवसेना ठाकरे गटाची ससेहोलपट

Sanjay Kulkarni Death : ‘जलसंपदा’ला दिशा देणारे संजय कुलकर्णी यांचे निधन

Rabi Crop Loan : रब्बीसाठी पीक कर्जाचे ६८५ कोटींचे उद्दिष्ट

Maharashtra Weather : मध्य महाराष्ट्रात थंडीची चाहूल

SCROLL FOR NEXT