Banana Price Agrowon
मार्केट इन्टेलिजन्स

Banana Price: खानदेशात केळी दरात सुधारणा

Khandesh Market Update: खानदेशात केळी दरात जूनच्या अखेरीस घसरण दिसली. परंतु मागील चार ते पाच दिवसांत दरात सुधारणा सुरू आहे. दर २६०० रुपये प्रतिक्विंटलपर्यंत पोहोचले होते.

चंद्रकांत जाधव ः अॅग्रोवन वृत्तसेवा

Jalgaon News: खानदेशात केळी दरात जूनच्या अखेरीस घसरण दिसली. परंतु मागील चार ते पाच दिवसांत दरात सुधारणा सुरू आहे. दर २६०० रुपये प्रतिक्विंटलपर्यंत पोहोचले होते. सध्या निर्यातक्षम किंवा गुणवत्तापूर्ण केळीस कमाल दर २६०० रुपये प्रतिक्विंटल मिळत आहेत.

मागील वर्षी जुलैच्या सुरुवातीला केळीचे कमाल दर १३०० ते १४०० रुपये प्रतिक्विंटल होते. या तुलनेत यंदा जुलैतच चांगली दरवाढ झाली आहे. आषाढी एकादशी व अन्य बाबींसाठी केळीला मागणी राहिली. तर किमान दर १५०० ते १६०० रुपये प्रतिक्विंटल आहेत. मध्यम दर्जाच्या केळीस १८०० रुपये प्रतिक्विंटलचा दर आहे. केळी दरात मागील दोन-तीन दिवसांत सतत सुधारणा झाली आहे.

बऱ्हाणपूर येथील बाजार समितीत रविवारी (ता. ६) केळीला कमाल २६०० रुपये प्रतिक्विंटलचा दर मिळाला. या दरांनुसार जळगाव, धुळे व नंदुरबारमध्ये केळीची थेट किंवा शिवार खरेदीचा निर्णय खरेदीदार घेत आहेत.

खानदेशात केळीची आवक कमी होत आहे. सध्या प्रतिदिन १०० ते ११० ट्रक (एक ट्रक १६ टन क्षमता) केळीची आवक होत आहे. उशिराच्या मृग बाग केळीमधून सध्या केळीची काढणी सुरू आहे. केळीची आवक सध्या जळगावातील रावेर, यावल, मुक्ताईनगर, चोपडा, जळगाव, नंदुरबारमधील तळोदा, शहादा, अक्कलकुवा भागात सुरू आहे.

दर्जेदार केळीची थेट खरेदी करून शेतात पॅकिंग केली जात आहे. ही केळी काश्मीर, पंजाब, दिल्ली येथे पाठविली जात आहेत. केळीला उत्तरेकडे उठाव आहे. केळी आवकेत मागील १० ते १२ दिवसांत सतत घट झाली आहे. जूनच्या मध्यापर्यंत खानदेशात प्रतिदिन सरासरी १८० ते १८५ ट्रक केळीची आवक सुरू होती. मध्य प्रदेशातही केळी आवक कमी आहे.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Wild Animal Attack: एप्रिलमध्ये वन्य प्राण्यांच्या हल्ल्यात ७ जणांचा मृत्यू, पीक नुकसानीची १,६६१ प्रकरणे, वनमंत्र्यांची माहिती

Heavy Rainfall: सोयगाव तालुक्यातील बनोटी मंडलात अतिवृष्टी; ‘खडकी’ला पूर

Pune Toxic Liquor Case: विषारी दारूकांडावरून गदारोळ

Village Development Plan: ग्राम विकास आराखडा, पाण्याचा ताळेबंद आणि जिल्हा नियोजन समिती

Brahmangaon Village Success Story: उपक्रमशीलतेत कायमच अग्रेसर ब्राह्मणगाव

SCROLL FOR NEXT