Banana Market Agrowon
मार्केट इन्टेलिजन्स

Banana Price: केळी दरात सुधारणा; बाजारपेठेत सरासरी १७०० रुपये प्रति क्विंटल दर!

Banana Market Update: खानदेशात केळी दरात सुधारणा झाली आहे. दर १००० ते २१०० व सरासरी १७०० रुपये प्रति क्विंटलपर्यंत पोहोचले आहेत.

चंद्रकांत जाधव ः अॅग्रोवन वृत्तसेवा

Jalgaon News: खानदेशात केळी दरात सुधारणा झाली आहे. दर १००० ते २१०० व सरासरी १७०० रुपये प्रति क्विंटलपर्यंत पोहोचले आहेत. दरात मागील तीन ते चार दिवसांत सतत वाढ झाली असून, आवकेतही वाढ होत आहे.

केळीची आवक खानदेशात सध्या २२० ट्रक (एक ट्रक १६ टन क्षमता) एवढी आहे. मार्चमध्ये प्रतिदिन सरासरी २०० ट्रक केळीची आवक होत होती. त्यात मागील पाच ते सात दिवसांत वाढ झाली आहे. मध्य प्रदेशातील बऱ्हाणपूर येथेही सध्या ९० ते ९५ ट्रक केळीची आवक होत आहे. मागील हंगामात कुकुंबर मोझॅक विषाणूच्या (सीएमव्ही) भीतीने अनेकांनी एप्रिल व मे महिन्यात केळी लागवड केली होती.

एप्रिल व मेमध्ये लागवड केलेल्या केळी बागांमधील काढणी मेच्या मध्यापर्यंत वेगात सुरू होती. केळीची आवक मोठी व मागणी कमी, अशी स्थिती झाली होती. यामुळे एप्रिलमध्ये केळीदर ४०० ते ७०० रुपये प्रति क्विंटल असे होते. केळी दरात घसरणीमुळे जिल्हा प्रशासनाला हस्तक्षेप करावा लागला होता.

व्यापाऱ्यांना तंबी द्यावी लागली होती. यंदा मात्र केळी दरात सुधारणा दिसत आहे. मार्च महिन्यात केळीला सरासरी १५०० रुपये प्रति क्विंटलचा दर मिळाला. परंतु या महिन्यात केळी दरात सुधारणा झाली. कमाल दर मध्य प्रदेशातील बाजारांत २१०० रुपयांपर्यंत पोहोचला आहे. खानदेशात केळीची थेट किंवा शिवार खरेदी केली जाते.

यामुळे शिवार खरेदीत केळीला कमाल १८०० ते २००० रुपये प्रति क्विंटलचा दर खानदेशात आहे. किमान दर १००० रुपये प्रति क्विंटल, असा आहे. केळीची पाठवणूक उत्तर भारतात केली जात आहे. दिल्ली, काश्मिरात पाठवणुकीच्या केळीचे दर २१०० रुपयांपर्यंत आहेत.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Crop Insurance Scheme : बिगर कर्जदार शेतकऱ्यांना विमा अर्जासाठी अंतिम मुदत

Crop Insurance Payment : विमा परतावा खात्यात जमा होण्यास नांदेडमध्ये सुरुवात

NAFED Onion Scam : कांदा उत्पादकांना न्याय मिळेपर्यंत लढा देणार

Rain Update : सिंधुदुर्ग जिल्ह्यात पावसाचे जोरदार कमबॅक

Kharif Sowing : सोयाबीन, सूर्यफूल क्षेत्रात घट

SCROLL FOR NEXT