Tur Market Agrowon
मार्केट इन्टेलिजन्स

Tur Market : अकोल्यात तुरीला सरासरी ११ हजारांचा दर कायम

Tur Rate : मागील काही काळापासून अकोला बाजारपेठेत तुरीला सरासरी ११ हजारांचा दर मिळतो आहे.

 गोपाल हागे

Akola News : मागील काही काळापासून अकोला बाजारपेठेत तुरीला सरासरी ११ हजारांचा दर मिळतो आहे. हा दर स्थिरावलेला असून आवक ५०० क्विंटलच्या आत सुरू आहे. अकोला ही विदर्भातील तुरीची प्रमुख बाजारपेठांपैकी एक आहे. या ठिकाणी तूरडाळ तयार करणारे अनेक उद्योग असून या ठिकाणच्या दरावर इतर बाजारपेठांचे दर निश्‍चित होतात.

सध्या अकोल्यात तुरीचा किमान दर साडेनऊ हजार व कमाल दर साडेबारा हजार इतका मिळतो आहे. बाजारातील आवक कधी ४०० ते ५०० क्विंटलच्या दरम्यान राहत आहे. या विभागाचे तुरीचे पीक मोठ्या क्षेत्रावर घेतले जाते. गेल्या हंगामात तुरीच्या पिकाला वातावरण बदलाचा सर्वात मोठा फटका बसला होता.

पीक चांगले दिसूनही शेवटच्या टप्प्यात आलेल्या किडरोगांमुळे उत्पादकतेत मोठी घट झाली. शिवाय तयार झालेल्या तुरीमध्ये बहुतांश माल हा ‘मुकण्या’ स्वरूपाचा होता. यामुळे चांगल्या मालाला सातत्याने मागणी व दर टिकून आहेत.

पुरेशा पावसाअभावी या हंगामातील पेरणीला अद्याप सार्वत्रिक सुरवात झालेली नाही. बाजारपेठेत दर चांगला मिळत असल्याने यावर्षी तुरीचे क्षेत्र वाढेल, असा कृषी खात्याचा अंदाज आहे. त्यादृष्टीने नियोजनही करण्यात आले. नवीन तूर यायला किमान आठ महिन्यांचा वेळ आहे.

या काळात बाजारपेठेत येणारी तूर ही प्रामुख्याने साठवणुकीची अधिक राहते. काही शेतकऱ्यांनी अद्यापही विक्री केलेली नसल्याने त्यांचा माल बाजारात येऊ शकतो. टप्प्याटप्प्याने तुरीची बाजारात आवक सुरू आहे. सरासरी आवकेचा विचार केला तर ४०० ते ५०० क्विटंलदरम्यान तुरीची विक्री होत आहे. तूर डाळीचा दर वाढीच्या टप्प्यात असल्याने येत्या काळात तुरीच्या दरातही वाढ होईल, अशी अपेक्षा शेतकरी बाळगून आहेत.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Rain Crop Damage: मराठवाड्यात ३ लाख ५८ हजार हेक्टरवरील पिकांना फटका

Ahupe Village Rehabilitation: ‘आहुपे’च्या पुनर्वसनाचा प्रस्ताव केंद्राकडे पाठवा

Jal Jeevan Mission: पाणीपुरवठा कामांच्या गतीकरिता समन्वयक अधिकारी नेमा : जिल्हाधिकारी डूडी

Pune Heavy Rainfall: मुळशी धरण क्षेत्रात सर्वाधिक २१० मिमी पावसाची नोंद

Bogus Agri Input: बोगस निविष्ठा उत्पादकांविरोधात देशव्यापी अभियान

SCROLL FOR NEXT