Onion Market Agrowon
मार्केट इन्टेलिजन्स

Onion Market : कांदा आवक वाढल्याने नगरला लिलाव रद्द

Onion Arrival : नगर येथील बाजार समितीच्या नेप्ती उप बाजारात सोमवार, गुरुवार व शनिवार असे तीन दिवस लिलाव होतात.

सूर्यकांत नेटके : ॲग्रोवन वृत्तसेवा

Nagar News : येथील बाजार समितीच्या नेप्ती उपबाजार समितीत गुरुवारी (ता. २५) कांद्याची मोठ्या प्रमाणात आवक झाली. तसेच प्रजासत्ताक दिनाची सुट्टी व मराठा आंदोलनामुळे मुंबई महामार्गावर वाहतूक कोंडी आहे. परिणामी, कांद्याची वेळेत उचल होणे शक्य नसल्याने शनिवारचे (ता.२७) कांदा लिलाव रद्द करण्यात आले.

लिलाव रद्दबाबत भाजीपाला फळ व अडते असोसिएशन संघटनेने बाजार समितीच्या सचिवांना पत्र दिले. नगर येथील बाजार समितीच्या नेप्ती उप बाजारात सोमवार, गुरुवार व शनिवार असे तीन दिवस लिलाव होतात. गुरुवारी (ता. २५) झालेल्या लिलावासाठी सुमारे पावणेदोन लाख कांदा गोण्यांची आवक झाली.

आवक वाढल्याने दरातही पडझड होत आहे. तसेच प्रजासत्ताक दिनाची सुट्टी, मराठा आरक्षण मोर्चासाठी मुंबई महामार्गावरही मोठ्या प्रमाणात वाहने आहेत. त्यामुळे वाहतूक अडथळा निर्माण होत आहे.

दक्षिण भारतात कांद्याची मागणी अधिक असते. मात्र त्या भागातील लोक सध्या सोलापूर येथूनच मोठ्या प्रमाणात कांदा खरेदी करू लागले आहेत. त्यामुळे कांद्याची उचल करणे शक्य नाही. असे सांगत नगर येथील ‘असोसिएशन’ने शनिवारी लिलाव बंद ठेवण्याचा निर्णय घेतला, असे कृषी उत्पन्न बाजार समितीतून सांगण्यात आले.

दर दोन हजारांवरून १२०० रुपयांवर

दोन हजार रुपये प्रतिक्विंटल दराने विकत असलेला कांदा १२०० रुपयांवर आला. गुरुवारी (ता. २५) लिलाव सुरू झाल्यावर कांद्याचे दर घसरले. त्यामुळे कांदा उत्पादकांनी नाराजी व्यक्त केली.

एक नंबर कांद्याला ९०० ते १२००, दोन नंबरला ५०० ते ९००, तीन नंबरला २५० ते ५००, तर गोल्टी कांद्याला १०० ते २०० रुपयांचा दर मिळाला, असे बाजार समितीतून सांगण्यात आले.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Mahayuti Press Conference : महाराष्ट्रातील हा ऐतिहासिक विजय असून लाडक्या बहिणींनी अंडरकरंट दिला; महायुतीच्या पत्रकार परिषदेतून शिंदे, फडणवीस, अजित पवार यांची मविआवर टीका

Onion Cultivation : एक लाख हेक्टरपर्यंत पोहोचले कांदा लागवड क्षेत्र

Sangli Vidhansabha Election : सांगलीत भाजपचं मायक्रो प्लॅनिंग; आर. आर. आबांच्या मुलाने वादळात दिवा लावला

Lumpy Skin Disease : दिघंचीमध्ये ‘लम्पी’चा विळखा

Agrowon Podcast : कांदा बाजारभाव दबावात; कापूस, सोयाबीन, कांदा तसेच काय आहेत गहू दर?

SCROLL FOR NEXT