Maize Agrowon
मार्केट इन्टेलिजन्स

Maize Market : खानदेशातील बाजारांत मक्याची आवक घटली

Makka Market : खानदेशातील प्रमुख बाजार समित्यांमध्ये मक्याची आवक गेल्या पाच-सहा दिवसांत निम्म्याने घटली आहे. एप्रिलच्या तुलनेत मे व जूनमधील आवक निम्म्याने घटली.

Team Agrowon

Jalgaon News : खानदेशातील प्रमुख बाजार समित्यांमध्ये मक्याची आवक गेल्या पाच-सहा दिवसांत निम्म्याने घटली आहे. एप्रिलच्या तुलनेत मे व जूनमधील आवक निम्म्याने घटली. दरात किंचित सुधारणा होऊन दर प्रतिक्विंटल किमान १६०० व कमाल १७०० रुपये आहेत. परंतु आणखी दरवाढीची अपेक्षा शेतकऱ्यांना आहे.

एप्रिलमध्ये अमळनेर, जळगाव, चोपडा येथील बाजारात मक्याची प्रतिदिन सरासरी पाच हजार क्विंटल आवक झाली. मेमध्ये ही आवक प्रतिदिन सरासरी तीन साडेचार हजार क्विंटल एवढी होती. यात जळगाव बाजार समितीमधील आवक अधिक होती. मक्याची लागवड, उत्पादन खानदेशात यंदा वाढली होती. आवक मेमध्ये अधिक होती. मार्चमध्ये मका दर कमाल २१०० रुपये प्रतिक्विंटल होते.

पण एप्रिलमध्ये घसरण सुरू झाली. यामुळे अनेकांनी या हंगामात लागवड केलेल्या शेतकऱ्यांना नफा कमी मिळाला किंवा नुकसान झाले आहे. आवक सुरुवातीपासून यंदा चांगली होती. अनेकांनी १६०० ते १६५० रुपये प्रतिक्विंटल दरात थेट शिवार खरेदी केली. तर काही शेतकऱ्यांनी बाजारात मक्याची पाठवणूक केली. दरातही फारशी वाढ झाली नाही. शासकीय खरेदी सुरू होण्याची चिन्हे नसल्याने शेतकऱ्यांनी मका विक्री सुरूच ठेवली.

सध्या काही शेतकऱ्यांकडे मका शिल्लक आहे. त्याचे प्रमाण कमी आहे. काही शेतकरी शासकीय खरेदीची प्रतीक्षा करीत आहेत. कारण बाजारात मक्याचे दर हमीभावापेक्षा कमी आहेत. नुकसान भरून निघावे, खर्च निघावा यासाठी किमान २०५० ते २१०० रुपये प्रतिक्विंटलचा दर शेतकऱ्यांना अपेक्षित आहे.

मक्याची आवक पुढे आणखी कमी होऊ शकते. कारण शेतकऱ्यांकडे फारसा साठा नाही. तसेच शासकीय खरेदी सुरू झाल्यास बाजारातील आवक अतिशय नगण्य, अशीच राहील. यामुळे पशुखाद्य निर्माते व इतर प्रक्रिया उद्योजकांना मक्यासाठी विविध भागात जाऊन शोधाशोध करावी लागेल, अशी स्थिती आहे.

खानदेशात मक्यासाठी जळगाव जिल्ह्यात जळगाव, चोपडा, अमळनेर, चाळीसगाव, पाचोरा, धुळ्यात शिरपूर, दोंडाईचा (ता. शिंदखेडा), नंदुरबारात नंदुरबार या बाजार समित्या प्रसिद्ध आहेत. या सर्वच बाजारांतील आवक मागील तीन ते चार दिवसांत कमालीची घटली आहे.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Tiger Death : बरडकिन्हीमध्ये आढळला वाघाचा मृतदेह

Borewell Crackdown : बोअरवेल खोदण्यापूर्वीच प्रशासनाचा दणका

Adinath Sugar Factory : ‘आदिनाथ’ची ४५० कोटींची मालमत्ता १२२ कोटींना विकल्याचा आरोप

Panchnama Update : सोलापुरात ३५ टक्के दुष्काळी क्षेत्राचे पंचनामे पूर्ण

Ration Card e-KYC: रेशन कार्डधारकांच्या सवलतीवर गदा

SCROLL FOR NEXT