Lemon Market Agrowon
मार्केट इन्टेलिजन्स

Lemon Market : खानदेशात लिंबू आवक कमीच

Lemon Rate : खानदेशातील प्रमुख बाजार समित्यांत लिंबाची आवक कमी आहे. उठाव बऱ्यापैकी असून, मागील १० ते १५ दिवसांत लिंबूला चांगले दर मिळाले आहेत.

चंद्रकांत जाधव ः अॅग्रोवन वृत्तसेवा

Jalgaon News : खानदेशातील प्रमुख बाजार समित्यांत लिंबाची आवक कमी आहे. उठाव बऱ्यापैकी असून, मागील १० ते १५ दिवसांत लिंबूला चांगले दर मिळाले आहेत. सध्या कमाल २५० रुपये प्रतिकिलोचा दर लिंबास आहे. कमी दर्जा, लहान आकारातील लिंबाचा दर २०० रुपये प्रतिकिलोपर्यंत आहे.

ऊन सतत वाढले आहे. मागील १० ते १२ दिवसांत तापमान ४५ अंश सेल्सिअसपर्यंत पोहोचले आहे. उन्हापासून बचाव करण्यासाठी घरोघरी व बाजारातही लिंबू सरबताची मागणी वाढली आहे. परिणामी लिंबाला मागणी वाढली आहे. बाजारात लिंबाची आवक कमी असल्याने दर वधारले आहेत. या महिन्याच्या सुरुवातीला लिंबाचे दर १०० ते १५० रुपये प्रतिकिलोपर्यंत होते.

खानदेशात धुळे, नंदुरबार, जळगाव, चाळीसगाव, भडगाव-पाचोरा या बाजारांत लिंबाची आवक होत असते. सध्या प्रतिदिन २० ते २१ क्विंटल लिंबाची आवक बाजारात होत आहे. काही बाजारात आवकच नाही. विविध शहरांतील खरेदीदार धुळे, पाचोरा-भडगाव, चाळीसगाव, जामनेर, छत्रपती संभाजीनगर भागांतून लिंबाचा पुरवठा करून घेत आहेत.

जळगावातील चोपडा, यावल, रावेर, धुळ्यातील शिरपूर, नंदुरबारातील शहादा भागात लिंबू बागा फारशा नाहीत. लिंबू बागा जळगावातील एरंडोल, पाचोरा, जामनेर, चाळीसगाव, भडगाव, पारोळा, अमळनेर, धुळ्यातील साक्री, धुळे आदी भागांत अधिक आहेत. पाचोरा, भडगाव, चाळीसगाव भागांतील लिंबू मुंबई, नाशिक भागांतील खरेदीदार मागवून घेत आहेत.

खानदेशात मार्च महिन्यासह त्यापूर्वीही बेमोसमी, वादळी पाऊस झाला होता. पाचोरा, भडगाव, जामनेरात गारपीटही झाली. यामुळे लिंबास फटका बसला आहे. परिणामी लिंबाची आवक कमी आहे, अशी माहिती मिळाली. पुढेही लिंबाची आवक फारशी राहणार नाही, अशी स्थिती आहे.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Agriculture Drone: जिल्हाधिकाऱ्यांनी घेतला कृषी ड्रोन हाताळणीचा अनुभव

Safflower Sowing: करडईच्या पेरणी क्षेत्रात घट

Soybean Market: सोयाबीनचे ७ कोटी ७१ लाख ७० हजार रुपयांचे चुकारे अदा

Sugarcane Farmer Issues: सीनाकाठच्या शेतकऱ्यांकडे कारखानदारांची पाठ

Manikrao Kokate: क्रीडामंत्री माणिकराव कोकाटे पुन्हा अडचणीत, २ वर्षांची कारावासाची शिक्षा कायम, प्रकरण काय?

SCROLL FOR NEXT