Bajari  Agrowon
मार्केट इन्टेलिजन्स

Bajari Market : खानदेशातील बाजारांत बाजरीची आवक सुरू

Bajari Rate : बाजरीचे दर सध्या खानदेशातील प्रमुख बाजारांत किमान २४०० ते २६५० व सरासरी २५०० रुपये प्रतिक्विंटल, असे आहेत.

चंद्रकांत जाधव ः अॅग्रोवन वृत्तसेवा

Jalgaon News : खानदेशात यंदा बाजरीची पेरणी सरासरीएवढी झाली. बाजारात बाजरीची आवक सुरू झाली असून, दर यंदा मागील हंगामाच्या तुलनेत फारसे अधिक नसल्याचे चित्र आहे. आवकेस याच आठवड्यात वेग आला आहे.

बाजरीचे दर सध्या खानदेशातील प्रमुख बाजारांत किमान २४०० ते २६५० व सरासरी २५०० रुपये प्रतिक्विंटल, असे आहेत. कुठेही दरपातळी २७०० रुपये प्रतिक्विंटल किंवा यापेक्षा अधिक नाही. मागील हंगामातही कमाल दर २६५० रुपये प्रतिक्विंटलपर्यंत होते. यंदा पाऊसमान कमी होते.

यामुळे बाजरीची पेरणी कमी होईल, असे चित्र होते. परंतु शेतकऱ्यांनी कांदा, मका आदी पिकांखालील क्षेत्र कमी केले. चारा व धान्यासाठी बाजरीची पेरणी केली. यामुळे बाजरीची पेरणी सुमारे साडेसहा हजार हेक्टरवर झाली. पेरणी अपेक्षेएवढी किंवा सरासरीऐवढी झाली. खानदेशात तापी, अनेर, गिरणा पट्ट्यात अनेक शेतकरी बेवडसाठी बाजरीची पेरणी करतात.

केळीची काढणी झाल्यानंतर अनेकांनी जानेवारीत बाजरीची पेरणी केली होती. यामुळे बाजरीच्या क्षेत्रात मोठी घट झाली नाही. डिसेंबर अखेरीस व जानेवारीच्या मध्यापर्यंत बाजरीची पेरणी झाली होती. जानेवारीच्या शेवटच्या आठवड्यातही काहींनी पेरणी केली होती.

जानेवारीच्या सुरुवातीला पेरणी केलेल्या बाजरी पिकाची कापणी, मळणीचे काम पूर्ण झाले आहे. या बाजरीची आवक बाजारात सुरू झाली आहे. खानदेशात बाजरीसाठी धुळ्यातील दोंडाईचा (ता.शिंदखेडा), शिरपूर, धुळे, नंदुरबारातील नंदुरबार, शहादा, जळगाव जिल्ह्यात चाळीसगाव, चोपडा व अमळनेर या बाजार समित्या प्रसिद्ध आहेत. या सर्वच बाजारांत बाजरीची आवक सुरू आहे.

प्रतिदिन ११०० क्विंटल आवक

खानदेशात सध्या प्रतिदिन ११०० क्विंटल बाजरीची आवक विविध बाजारांत होत आहे. सर्वाधिक आवक चोपडा, शिरपूर, चाळीसगाव भागात होत आहे. चोपडा येथे गुरुवारी (ता. ४) बाजरीची १५० क्विंटल आवक झाली.

तेथे किमान २४००, कमाल २६५० व सरासरी २५१५ रुपये प्रतिक्विंटलचा दर बाजरीस मिळाला. असेच दर चाळीसगाव, नंदुरबार व धुळे भागात आहेत. हे दर अपेक्षित नसल्याचे शेतकऱ्यांचे म्हणणे आहे. पुढे आवक आणखी वाढणार आहे.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Maharashtra Election 2024 Update : भाजप पहिल्या स्थानावर; तर कॉँग्रेस दुसऱ्या क्रमांकावर, पहिले कल काय सांगतात?

Agro Vision Krishi Exhibition : विकसनशील भाग म्हणून विदर्भ कृषी क्षेत्रात नावारूपास येणार

Maharashtra Election 2024 : सत्तास्थापनेसाठी दोन्हींकडून तयारी; मतदानात ०.९४ टक्क्यांची वाढ

Orange Growers Compensation : संत्रा बागायतदारांना भरपाईसाठी ‘तारीख पे तारीख’

Maharashtra Assembly Election Counting : पोस्टल मतमोजणीत मुख्यमंत्री शिंदे, उपमुख्यमंत्री फडणवीस आघाडीवर; अजित पवार पिछाडीवर

SCROLL FOR NEXT