Tur Market Agrowon
ॲग्रोमनी

Tur Market : तुरीचे दर दबावात येतील का?

देशात सध्या तुरीचे दर तेजीत आहेत. मात्र सरकार तुरीचे दर कमी करण्यासाठी प्रयत्न करत आहे. त्यासाठी सराकरने आयातवाढीसाठी प्रयत्न सुरु केले. त्यामुळे यंदा तुरीची आयात वाढण्याचा अंदाज आहे.

Team Agrowon

देशात सध्या तुरीचे दर (Tur Rate) तेजीत आहेत. मात्र सरकार तुरीचे दर कमी करण्यासाठी प्रयत्न करत आहे. त्यासाठी सराकरने आयातवाढीसाठी (Import) प्रयत्न सुरु केले. त्यामुळे यंदा तुरीची आयात (Tur Import) वाढण्याचा अंदाज आहे.

मग तुरीची आयात यंदा किती वाढेल? देशात आतापर्यंत किती तूर आयात झाली? तुरीचे दर कसे राहतील? याची माहिती तुम्हाला या व्हिडिओतून मिळेल. 

देशात यंदा तुरीचे उत्पादन घटले. सरकारने यंदा देशात ३६ लाख टन तुरीचा अंदाज व्यक्त केला. पण व्यापारी आणि उद्योगाने यंदा उत्पादन ३० ते ३२ लाख टनांच्या दरम्यान स्थिरावेल, असा अंदाज व्यक्त केला.

तर मागील हंगामतील शिल्लक साठा २ ते ३ लाख टनांपेक्षा जास्त नसेल, असे व्यापारी सांगत आहेत. म्हणजेच यंदा देशातील तुरीचा पुरवठा ३२ ते ३५ लाख टनांच्या दरम्यान राहील. 

देशाला वर्षाला ४५ ते ४६ लाख टन तुरीची गरज असते. तर देशातील ३५ लाख टन पुरवठा पकडला तरी यंदा १० ते ११ लाख टनांची तुट असेल.

याची जाणीव असल्यानेच व्यापारीही नफावसुली करताना दिसत आहेत. आयात होणारी तूर हातोहात विकली जात आहे.

आता आफ्रिका आणि म्यानमारमध्ये कमी प्रमाणात तूर उपलब्ध आहे. त्यामुळे आयात पुढील काही दिवस सरासरी राहण्याचा अंदाज. 

देशात भासणारी १० ते ११ लाख टनांची तूट आयातीतून भरून करण्याचा सरकारचा प्रयत्न आहे. पण जगात भारत वगळता तूर उत्पादन आणि वापर होत नाही.

आफ्रिका आणि म्यानमारसारखे देश भारतालाच निर्यात करण्यासाठी तुरीचे उत्पादन घेत असतात. त्यामुळं आंतरराष्ट्रीय बाजारात १० लाख टन तूर उपलब्ध नाही. 

देशात चालू आर्थिक वर्षात एप्रिल ते फेब्रुवारी या काळात ८ लाख ४ हजार टन तुरीची आयात झाली. तर मार्च महिन्यातील आयात ५० ते ६० हजार टनांपर्यंत होऊ शकते.  

म्हणजेच यंदाही गेल्यावर्षीएवढीच म्हणजेच ८ लाख ५० हजार टनांपर्यंत आयात होईल. तर पुढील आर्थिक वर्षातही आयात यापेक्षा जास्त होईल याची शक्यता कमीच आहे. 

तुरीच्या दरातील तेजी पाहून शेतकरी मर्यादीत विक्री करत आहेत. दुसरीकडे बाजारात उठाव चांगला आहे. त्यामुळे तुरीचे दर तेजीत आहेत.

सध्या तुरीला प्रतिक्विंटल सरासरी ७ हजार ५०० ते ८ हजार ५०० रुपये दर मिळत आहे. पण देशातील तुरीचे उत्पादन आणि आयात बघता तुरीचे सरासरी दर ८ हजार ते ९ हजार रुपयांच्या दरम्यान राहू शकतात, असा अंदाज तूर बाजारातील अभ्यासकांनी व्यक्त केला. 

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Sugar Price: साखरेचा किरकोळ दर सलग चौथ्या दिवशी ६० रुपयांच्या खाली, सणासुदीतील मागणीमुळे दरवाढीचा कल

Drought 2026 : राज्य सरकार किती तालुक्यात दुष्काळ जाहीर करू शकतं?

Wildlife Damage: वन्यप्राण्यांपासून पिकांचे नुकसान थांबवा : पालकमंत्री अ‍ॅड. यशोमती ठाकूर

Rain Dry Spell: पावसाची दडी, खरीप संकटात; भरघोस मदतीची मागणी

Maharashtra Drought: महाराष्ट्रात दुष्काळ; शेतकऱ्यांना सरसकट हेक्टरी ५० हजारांची मदत द्या- हर्षवर्धन सपकाळ

SCROLL FOR NEXT