Tur Market Agrowon
ॲग्रोमनी

Tur Market : तुरीचा बाजार तेजीत राहील, की दबावात येईल?

देशातील बाजारात तुरीचे दर तेजीत आहेत. तुरीला सध्या ८ हजार ते ९ हजार रुपयांच्या दरम्यान भाव मिळतो. तुरीचे दर तेजीत कमी करण्यासाठी सरकारचीही धडपड सुरु आहे.

Anil Jadhao 

Tur Rate Update : देशातील बाजारात तुरीचे दर तेजीत आहेत. तुरीला सध्या ८ हजार ते ९ हजार रुपयांच्या दरम्यान भाव मिळतो. तुरीचे दर तेजीत कमी करण्यासाठी सरकारचीही धडपड सुरु आहे. सरकारने बाजारावर दबाव टाकण्याचा पूर्ण प्रयत्न चालवला आहे.

चालू हंगामात (Tur Season) तूर बाजारात येण्याच्या आधीपासूनच तेजीत आहे. तुरीने नवा माल बाजारात येण्याच्या आधीच ७ हजारांचा टप्पा गाठला होता. त्याला मुख्य कारण होतं देशातील घटलेली लागवड आणि उत्पादकता.

भारताला दरवर्षी ४५ ते ४६ लाख टन तुरीची आवश्यकता असते. मागील हंगामात देशात ४३ लाख ५० हजार टन उत्पादन झाले होते. तर आयात ८ लाख ६० हजार टन होती. त्यामुळे देशात अतिरिक्त पुरवठा राहून दर दबावात होते.

शेतकऱ्यांना हमीभावही मिळाला नाही. त्यामुळं यंदा लागवड कमी झाली. त्यातच बदलते वातावरण आणि पावसाचा पिकाला फटका बसला. त्यामुळे उत्पादन ३६ लाख टनांवर राहील, असा सरकारचा अंदाज आहे.

पण व्यापारी आणि उद्योगाच्या मते ३० ते ३२ लाख टनांवरच उत्पादन स्थिरावेल. मागील हंगामातील स्टाॅकही कमी आहे. सरकारने १० लाख टन आयातीचे उद्दिष्ट ठेवले, तरी आयात ८ लाख ५० हजार टनांवरच स्थिरावण्याची शक्यता आहे.

त्यामुळे देशात तुरीचा पुरवठा कमी झाला. परिणामी तुरीचे दर तेजीत आहेत. सध्या तुरीला सरासरी ८ हजार ते ९ हजार रुपये भाव मिळत आहे. सरकारने मात्र दरवाढीची धास्ती घेतली. कारण तुरीमुळे हरभरा बाजारालाही आधार मिळत आहे.

पण तूर दरातील ही तेजी सरकारला खुपत आहे. शेतकरी देशोधडीला लागला तरी चालेल पण महागाई कमी झाली पाहिजे, असे सरकारचे धोरण दिसते.

काहीही करून तुरीचे दर कमी करण्याचा सरकारचा मनसुबा आहे. त्यासाठी सरकारने आयातशुल्क काढले, राज्यांकडून स्टाॅकची माहिती घेतली, तूर बाजारावर लक्ष ठेवण्यासाठी समितीही नेमली.

सरकारने एक बैठक बोलावून व्यापारी, स्टाॅकिस्ट, आयातदार आणि मिलर्स यांना तंबी दिली. तुमच्याकडील तुरीच्या खऱ्या स्टाॅकची माहिती द्यावी, असं सरकारने सांगितले.

त्यानुसार व्यापारी आणि इतर घटकांनी आपल्याकडे २९ मार्चपर्यंत १२ लाख ६४ हजार टन स्टाॅक असल्याची माहिती दिली.

पुढील काळात सरकारकडून स्टाॅक लिमिटही लावली जाऊ शकते. पण तुरीचा जास्त स्टाॅक शेतकऱ्यांकडे आहे. त्यामुळे त्याचाही बाजारावर जास्त परिणाम होणार नाही, अशी माहिती जाणकारांनी दिली.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Farm Loan Waiver: कर्जमाफी योजनेची प्रत्यक्ष अंमलबजावणी सुरु, शेतकऱ्यांची पहिली यादी जाहीर

Pandharpur Vitthal Darshan: दर्शन रांगेतील वयोवृद्ध दांपत्याला थेट विठ्ठल दर्शन

Kharif Crop Insurance: शेतकऱ्यांची खरीप पीकविम्याकडे पाठ

Fake Soybean Seed Issue: बोगस बियाण्यांच्या तक्रारीवर उलट शेतकऱ्यांवरच प्रश्नांचा भडिमार

Agriculture Scheme Subsidy Issue: परभणी जिल्ह्यातील ६७० शेतकरी अद्यापही अनुदानाच्या प्रतीक्षेत

SCROLL FOR NEXT