Cotton Market
Cotton Market Agrowon
ॲग्रोमनी

Cotton Market: कापूस दर वाढतील की नाही?

Anil Jadhao 

अनिल जाधव
पुणेः देशातील कापूस बाजारानं शेतकऱ्यांची निराशा केली, असंच म्हणावं लागेल. विशेष म्हणजे शेतकऱ्यांनी सरुवातीपासून मर्यादीत विक्री केली.

बाजारात आवकेचा दबाव नव्हता. त्यामुळं दर टिकायला हवे होते. पण कापूस बाजार दबावात ठेवण्यात आल्याचं सांगितलं जातं.

आजही कापसाचे दर बहुतेक बाजारांमध्ये स्थिर होते. आज देशातील कापसाला सरासरी ८ हजार ते ८ हजार ५०० रुपये दर मिळाला. मात्र पुढील काळात कापूस दरात सुधारणा होऊ शकते, असा अंदाज कापूस बाजारातील अभ्यासकांनी व्यक्त केला.

नोव्हेंबर महिन्यात कापूस दरानं ९ हजारांचा टप्पा गाठल्यानंतर चढ उतार राहतील, असा अंदाज होता. पण शेतकऱ्यांची टप्प्याटप्यानं सुरु असलेली विक्री आणि ११ टक्के आयातशुल्क यामुळं दरात मोठी नरमाई येण्याची शक्यता कमीच होती.

देशातील घटलेल्या उत्पादनाचाही आधार दराला मिळत होता. बाजारातील आवक जिथे दोन ते सव्वा दोन लाख गाठीं असायची तिथे केवळ एक लाख गाठींच्या दरम्यान आवक होती.

शेतकरी टप्प्याटप्प्यानं विक्री करत असल्यानं दर टिकतील असं वाटतं होतं. पण एरवी शेतकरी डिसेंबर आणि जानेवारीत जवळपास सर्व कापूस विकत होते.

बाजारात आवक दाटल्यानं सहाजिकच दर पाडले जात. पण यंदा शेतकऱ्यांनी कापूस रोखला. बाजारातील आवक सरासरीपेक्षा कमी राहीली. पण शेतकऱ्यांना अपेक्षित दरपाळी होऊ दिली नाही.

बाजारातील घटक विचारात घेता, सध्याच्या परिस्थितीत कापसाचा भाव ८ हजार ५०० ते ९ हजार रुपयांच्या दरम्यान असायला पाहीजे. तशी परिस्थितीही आहे.

पण कापूस दर दबावात ठेवले जात आहेत, असा आरोपही काही अभ्यासक करत आहेत.

आजची दरपातळी
आजही देशातील बाजारात कापसाला सरासरी ८ हजार ते ८ हजार ५०० रुपये  दर मिळाला. मात्र बाजारातील कापूस आवक वाढली.

आज देशातील बाजारात जवळपास दीड लाख गाठींची आवक झाली. त्याचाही दबाव दरावर असल्याचं सांगितलं जातं.

दोन महिने वाट पहिल्यानंतरही अपेक्षित दर मिळत नाही म्हटल्यावर पैशांची गरज असलेले शेतकरी कापूस विकत आहेत. शेतकऱ्यांची ही गरज सर्वांनाच माहीत होती. त्यामुळंच बाजार दबावात ठेवल्याचं सांगितलं जातं.


दर किती वाढतील?
सध्या बाजारातील आवक वाढली. पण आवक जास्त वाढल्यास दरावर दबाव येऊ शकतो, असंही सांगितलं जातंय.

त्यामुळं बाजारात आवकेचा दबाव येणार नाही, याची काळजी शेतकऱ्यांनी घेणं गरजेचं आहे. शेतकऱ्यांनी कापूस विक्री मर्यादीत ठेवल्यास सध्याचे दर टिकून राहतील.

कमी दरात जास्तीत जास्त कापूस शेतकऱ्यांकडून खरेदी केला जाईल. त्यामुळं टप्प्याटप्प्यानं विक्री करावी. कापसाचा भाव यंदा ८ हजार ५०० ते ९ हजार ५०० रुपयांच्या दरम्यान राहू शकतो, असा अंदाज आहे.

हा अंदाज अभ्यासकांनी उत्पादन, आयात, निर्यात, वापर अर्थात मागणी आणि पुरवठा विचारात घेऊन व्यक्त केला.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Agriculture Fertilizer : जळगावात मुबलक खतांसाठी कृषी विभागाची दमछाक

Mahabeej Workshop : कानशिवणी येथे ‘महाबीज’ची शेती कार्यशाळा

Maharashtra Rain : विदर्भात पुढील ५ दिवस पावसाचा अंदाज; राज्यात ठिकठिकाणी वादळी पावसाचा अंदाज

Drought 2024 : देशातील प्रमुख धरणात पाणीसाठा घटला; पाणीसंकट गंभीर ?

Sludge Remove Campaign : ‘घरणी’तील गाळ उपसा मोहिमेची जिल्हाधिकाऱ्यांनी केली पाहणी

SCROLL FOR NEXT