Cotton Market Agrowon
ॲग्रोमनी

Cotton Market : कापूस निर्यात खरचं कमी राहणार का?

देशातील बाजारात मागील दोन दिवसांमध्ये कापूस दरात काहीशी नरमाई दिसली. दुसरीकडं कापसाची आवक कायम आहे.

Anil Jadhao 

Cotton Rate Update : देशातील बाजारात मागील दोन दिवसांमध्ये कापूस दरात (Cotton Rate) काहीशी नरमाई दिसली. दुसरीकडं कापसाची आवक कायम आहे. युएसडीएनं आपल्या एप्रिलच्या अहवालात भारताची निर्यात २३ लाख गाठींवरच स्थिरावेल, असं म्हटले आहे.

अमेरिकेच्या कृषी विभागाने (Agriculture Department) अर्थात युएसडीएने नुकत्याच जाहीर केलेल्या अंदाजात देशातील कापूस उत्पादनाचा (Cotton Production) अंदाज कायम ठेवला. तर कापूस निर्यातीचा अंदाज कमी केला.

युएसडीएच्या मते यंदा भारतातून २३ लाख गाठी कापसाची निर्यात होईल. मार्च महिन्यातील अहवालात युएसडीएनं २८ लाख गाठी कापूस निर्यात होईल असं म्हटलं होतं. पण जागितक पातळीवर सध्या आर्थिक संकट आहे.

अनके देशांमध्ये महागाई वाढल्यानं बाजार सुस्त दिसतोय. तसेच भारतीय कापूस आयातदार देशांमध्येही अडचणी आहेत. त्यामुळं यंदा निर्यात कमी राहू शकते, असा अंदाजही अमेरिकेच्या कृषी विभागानं अर्थात युएसडीएनं व्यक्त केला.

काॅटन असोसिएशन ऑफ इंडिया आर्थात सीएआयच्या अंदाजनुसार यंदा देशातून ३० लाख गाठी कापूस निर्यात होईल. पण युएसडीएनं निर्यात कमी राहीलं, असं म्हटलंय. युएसडीएचा अंदाज खरा ठरल्यास भारतातून मागील १९ वर्षातील निचांकी निर्यात होईल.

यापूर्वी २००४-०५ मध्ये भारताने १० लाख गाठी कापूस निर्यात केली होती. त्यानंतर देशातून कापूस निर्यात वाढत गेली. पण यंदा निर्यात कमी राहण्याची शक्यता आहे.

भारताने आतापर्यंत ९ लाख ५० हजार गाठी कापूस निर्यात केली. सध्या बांगलादेशला कापूस निर्यात सुरु आहे. तसेच पुढील काळात बांगलादेशच भारतीय कापसाचा ग्राहक असेल. कारण इतर देशांकडून मागणी कमी झाली आहे. चीनमध्ये यंदा कापूस उत्पादन वाढले. त्यामुळे चीनची मागणी कमी आहे, व्हिएतनाममधून कमी मागणी आहे, असे जाणकारांनी सांगितले.

सध्या जागतिक पातळीवर कापसाला उठाव कमी आहे. पण जूननंतर उठाव वाढेल. हळूहळू कापड मार्केट आकार घेत आहे. त्यामुळे चालू हंगामाच्या दुसऱ्या मध्यात आंतरराष्ट्रीय बाजारात कापसाला मागणी येईल. यंदा बाजारात कापूस टप्प्याटप्प्यानं आला.

कापसाचे भाव वाढतील या अपेक्षेने शेतकरी कापूस मागं ठेवत आहेत. हंगाम सुरु होऊन आता सहा महिन्यांपेक्षा अधिक काळ झाला. तरीही बाजारात कापूस आवक कमीच दिसते.

युएसडीएच्या अहवालानंतर कापूस दरावर काहीसा दबाव आला. बहुतांशी भागात पाऊस पडत असल्यानंही शेतकरी कापूस विकत असल्याचं व्यापारी सांगत आहेत. मागील दोन दिवसांमध्ये कापूस दरात क्विंटलमागं १०० ते २०० रुपयांची नरमाई आली.

सध्या कापसाला सरासरी ७ हजार ९०० ते ८ हजार ४०० रुपये दर मिळतोय. तर आंतरराष्ट्रीय बाजारात कापसाचे वायदे ८२.७८ सेंट प्रतिपाऊंडवर होते. देशातील कापूस वायदेही २२० रुपयाने नरमले. सध्या जून महिन्याचे वायदे ६३ हजार ८८० रुपयाने झाले.

बाजारातील कापूस आवक सध्याही सरासरीपेक्षा अधिक आहे. तर निर्यातीची गतीही कमी असल्याचा बाजारावर परिणाम दिसतो आहे. पण देशातही कमी कापूस शिल्लक आहे. पावसाच्या तोंडावर शेतकरी कापूस विक्री वाढवतील, असाही अंदाज आहे.

पण पुढील काळात कापूस आवक कमी राहून दराला आधार मिळेल. सोबतच तात्पुरत्या घटकांमुळे चढ उतार येत राहतील. त्यामुळं शेतकऱ्यांनी बाजाराचा आढाव घेऊनच विक्रीचा निर्णय घ्यावा, असं आवाहन कापूस बाजारातील अभ्यासकांनी केलंय.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Farmer Exploitation: पवनचक्कीच्या नावाखाली शेतकऱ्यांचा छळ; पोलिसांचाही सहभाग: विधानसभेत विरोधक आक्रमक 

Khandesh Rain Update : खानदेशात पाऊसमान कमी

Sugarcane Payment : कारखानदारांनी थकवले ऊस उत्पादकांचे ९३ कोटी

Tur Sowing : खानदेशात तूर लागवडीत वाढ

Bhojapur Dam : भोजापूर धरण ‘ओव्हर फ्लो’

SCROLL FOR NEXT