Cotton Market : परभणीत कापूसदरात संथगतीने सुधारणा

Cotton Rate : परभणी जिल्ह्यातील सेलू, परभणी, मानवत या कृषी उत्पन्न बाजार समित्यांमधील कापूस खरेदी दरात गेल्या काही आठवड्यांच्या तुलनेत थोडी सुधारणा झाली आहे.
Cotton Market
Cotton MarketAgrowon
Published on
Updated on

Cotton Market Update : परभणी जिल्ह्यातील सेलू, परभणी, मानवत या कृषी उत्पन्न बाजार समित्यांमधील कापूस खरेदी दरात (Cotton Rate) गेल्या काही आठवड्यांच्या तुलनेत थोडी सुधारणा झाली आहे.

सोमवारी (ता. १०) सेलू बाजार समितीत कापसाला प्रतिक्विंटल किमान ६७०५ ते कमाल ८२५० रुपये दर मिळाले. मागील सोमवारच्या (ता. ३) तुलनेत किमान दरात ७० रुपये तर कमाल दरात १३५ रुपये वाढ झाली.

सोमवारी (ता. १०) परभणी कृषी उत्पन्न बाजार समितीत कापसाची २५० क्विंटल आवक होऊन किमान ६५०० ते कमाल ८२५० रुपये दर मिळाले. कापसाच्या कमाल दरात ८० रुपयांनी वाढ झाली आहे.

Cotton Market
Cotton Market : कापसातील तेजीचा शेतकऱ्यांना फायदा होईल का?

सेलू बाजार समितीत शनिवारी (ता. ८) कापसाची २२६५ क्विंटल आवक होऊन प्रतिक्विंटल किमान ६४०० ते कमाल ८३०० रुपये तर सरासरी ८२३० रुपये दर मिळाले. शनिवारी (ता. ८) च्या तुलनेत कापसाच्या कमाल दरात क्विंटलमागे १७५ रुपये वाढ झाली.

Cotton Market
Cotton Market : कापूस बाजारात वाढीचा ट्रेंड

मानवत बाजार समितीत शुक्रवारी (ता. ७) कापसाची ६२५० क्विंटल आवक होऊन प्रतिक्विंटल किमान ६८०० ते कमाल ८३७० रुपये तर सरासरी ८२२५ रुपये दर मिळाले.

बुधवारी (ता. ५) कापसाची ६८०० क्विंटल आवक होऊन प्रतिक्विंटल किमान ६५०० ते कमाल ८२०० रुपये तर सरासरी ८०७५ रुपये दर मिळाले. मागील आठवड्यापासून जिल्ह्यातील बाजार समित्यांतील कापसाच्या दरात संथगतीने सुधारणा होत आहे. त्यामुळे घरात कापूस साठवून ठेवलेल्या शेतकऱ्यांना काही प्रमाणात दिलासा मिळाला आहे.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com