Maize Rate Agrowon
ॲग्रोमनी

Maize Market : मक्याचे भाव वाढतील का?

Maize Bazarbhav : देशात मक्याचे भाव सध्या कमी झाले आहेत. मात्र असं आसतानाही मक्याची निर्यातही कमी झालेली दिसते.

Team Agrowon

Maize Rate Update : देशात मक्याचे भाव सध्या कमी झाले आहेत. मात्र असं आसतानाही मक्याची निर्यातही कमी झालेली दिसते. आंतरराष्ट्रीय बाजारात अर्जेंटीना आणि ब्राझीलमध्ये मक्याचे भाव कमी झाले आहेत. मागील महिनाभरात देशात मक्याचे भाव टनामागे १५ डाॅलरने कमी झाले.

तर एक एप्रिलपासून दरात १५ टक्क्यांची नरमाई दिसली. देशात सध्या मक्याचे भाव अनेक भागांमध्ये प्रतिक्विंटल सरासरी १ हजार ९६२ रुपये प्रतिक्विंटलच्या दरम्यान आहेत.

रब्बी हंगामातील मक्याची आवक बाजारात वाढत आहे. सध्या देशातील मक्याचे भाव हमीभावाच्याही खाली आले आहेत. आंतरराष्ट्रीय बाजारातही मक्याच्या दरात नरमाई आली आहे. याचाही दबाव बजारावर वाढला. देशात मक्याचे भाव कमी असूनही निर्यात मात्र कमी झाली आहे.

देशात सध्या रब्बीतील मका बाजारात येण्याचा कालावधी आहे. म्हणजेच सध्या देशात मका उपलब्ध आहे. पण असं असताना मागणी नाही. त्यामुळे दर नरमले आहेत. भारतीय मक्याला काही प्रमाणात आग्नेय आशियातील देशांमधून मागणी येत आहे. पण दुसरीककडून सध्या मागणी नाही. याचा दरावर दबाव येत आहे.

मक्याला सध्या मागणी नसली तरी पुढील काळात मागणी येऊ शकते. एल निनोमुळे अनेक देशांमध्ये मक्याचे उत्पादन कमी राहू शकते. भारतात उत्पादनाबाबत शंका उपस्थित केली जात आहे. त्यामुळे मक्याला पुढील काळात उठाव मिळू शकतो, असा अंदाज अनेक विशषक व्यक्त करत आहेत.

देशात मक्याचे भाव हमीभावापेक्षा कमी झाल्यानंतर अनेक मोठे व्यापारी मक्याचा स्टाॅक करत आहेत. सरकारने यंदा मक्यासाठी प्रतिक्विंटल सरासरी १ हजार ९६२ रुपयांचा हमीभाव जाहीर केला. पण सध्या मक्याची खरेदी प्रक्रिया उद्योग आणि स्टार्च उद्योगांकडून १ हजार ८०० रुपयाने केली जात आहे. तर मागील हंगामात याच काळातील मक्याचे भाव सरासरी २ हजार १५० रुपयांच्या दरम्यान होते.

यंदा देशातील मक्याचे उत्पादनही विक्रमी पातळीवर पोचण्याचा अंदाज सरकारने व्यक्त केला. सरकारने यंदा ३४६ लाख टन उत्पादनाचा अंदाज जाहीर केला. तर उद्योगांच्या मते मका उत्पादन ३३० लाख टनांवर स्थिरावेल. निर्यातीसाठीचे मक्याचे भावही सध्या कमी झालेले आहेत.

दोन महिन्यांपुर्वी निर्यातीसाठी मक्याला प्रतिक्विंटल सरासरी २२ हजार रुपये प्रतिटनांचा भाव मिळत होता. पण आता मक्याची १९ हजार रुपयांनी विचारणा केली जात आहे. यामुळे भारताची मका निर्यात यंदा कमी होण्याची शक्यता आहे.

मागील हंगामात भारताने ४० लाख टन मका निर्यात केली होती. तर यंदा मका निर्यात ३६ लाख टनांवर स्थिरावेल, असा अंदाज व्यक्त केला जात आहे.

भारताची मका निर्यात यंदा कमी होण्याची शक्यता व्यक्त केली जात असली तरी देशांतर्गत पशुखाद्य उद्योगाकडून चांगली मागणी आहे. तसेच पुढील काळात एल निनोचा परिणाम झाल्यास मक्याला आणखी उठाव मिळू शकतो, असा अंदाज जाणकारांनी व्यक्त केला.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Soybean Price: देशात सोयाबीनच्या दरात सुधारणा

Banana Export: पिंप्री खुर्द गावातील केळीची परदेशात निर्यात

Agriculture Minister Bharane: शेतकऱ्यांना आनंदी करणारे कामकाज करू: कृषिमंत्री दत्तात्रय भरणे

Farm Road: शेतरस्त्यांसाठी जमिनींचा ताबा

Papaya Market: खानदेशात पपई आवक वाढण्याचे संकेत

SCROLL FOR NEXT