Chana Market  Agrowon
ॲग्रोमनी

Chana Market : नाफेडची हरभरा खरेदी वाढूनही दर दबावातच का?

नाफेडची हरभरा खरेदी वेगाने सुरु आहे. पण खुल्या बाजारात त्याचा परिणाम होताना दिसत नाही.

Anil Jadhao 

Chana Rate Update : नाफेडची हरभरा खरेदी (Chana Procrument) वेगाने सुरु आहे. पण खुल्या बाजारात त्याचा परिणाम होताना दिसत नाही. खुल्या बाजारात हरभऱ्याचे दर दबावात आहेत. वास्तविक नाफेडची खेरदी वाढल्यानंतर दरात सुधारणा व्हायला हवी होती. पण सध्या उलट चित्र दिसत आहे.

देशातील बाजारात हरभरा बाजारभाव अद्यापही हमीभावाच्या खाली आहेत. नाफेडची खरेदी वेगानं सुरु असली तरी खुल्या बाजारात दरात सुधारणा दिसली नाही. मागील हंगामात नाफडने २५ लाख टन हरभऱ्याची खरेदी केली होती.

यावेळी नाफेडकडे एकूण २९ लाख टनांच्या दरम्यान हरभऱ्याचा स्टाॅक झाला होता. नाफेडच्या खेरदीमुळे बाजारात दरात तेजी येईल, असा अंदाज भलेभले विश्लेषक आणि व्यापारी व्यक्त करत होते. पण नाफेडने सर्वांना चेकमेट करत बाजार दबावातच ठेवला.

शेतकऱ्यांचा हरभरा बाजारात येऊन गेल्यानंतर नाफेडने खुल्या बाजारात कमी दरात विक्री सुरु केली. नाफेडच्या विक्रीमुळे गेले वर्षभर हरभरा बाजार दबावात राहीला. हरभऱ्यासाठी महत्वाच्या सणांच्या काळातही नाफेडने मोठ्या प्रमाणात माल बाहेर काढला. त्यामुळे सणांच्या काळातही सुधारणा दिसली नाही. यामुळे स्टाॅकिस्ट, व्यापारी आणि प्रक्रियादारांना तोटाही सहन करावा लागला होता.

यंदा तूर आणि इतर काही कडधान्याचे भाव तेजीत आहेत. पुढील वर्षी येऊ घातलेल्या निवडणुका डोळ्यापुढे ठेऊन सरकार कडधान्याचे भाव दबावात ठेवेल, असा अंदाज आहे.

सरकारच्या वागण्यावरून हे स्पष्टही होतंय. त्यामुळे व्यापारी किंवा स्टाॅकिस्ट हरभरा स्टाॅक करताना दिसत नाहीत. यंदाही नाफेडची खरेदी वेगाने सुरु आहे. नाफेड हा स्टाॅक पुढील काळात बाहेर काढेल. याचा दबाव बाजाराव येऊ शकतो, असा अंदाज व्यक्त केला जातोय.

नाफेडने आतापर्यंत १२ लाख ५७ हजार टनांची खेरदी केली. त्यात सर्वाधिक खेरदी महाराष्ट्रात झाली. महाराष्ट्रातील खरेदी आता ५ लाख २२ हजार टनांवर पोचली.

तर गुजरातंमध्ये २ लाख ३८ हजार टन आणि मध्य प्रदेशात ३ लाख ५ हजार टनांची खरेदी झाली. यंदा राजस्थान आणि उत्तर प्रदेशातील हरभरा खरेदी धीम्या गतीने सुरु आहे.

यंदाही नाफेडकडे गेल्यावर्षीप्रमाणं हरभऱ्याचा स्टाॅक होण्याची शक्यता आहे. कारण आतापर्यंत नाफेडने १२ लाख ५७ हजार टनांची खरेदी केली.

तर गेल्यावर्षीचा जवळपास १४ लाख टन शिल्लक साठा असल्याचे सांगितले जाते. म्हणजेच आजच्या तारखेला नाफेडकडे २६ लाख टन हरभरा आहे. याचाच दबाव पुढील काळात बाजारात येऊ शकतो, असा अंदाज व्यक्त केला जातोय.

सध्या बाजारात हरभऱ्याला ४ हजार ५०० ते ४ हजार ९०० रुपये दर मिळतोय. तर खुल्या बाजारातील आवकही हळूहळू वाढतेय. अनेक शेतकरी नाफेडला हरभरा देण्यासाठी माल मागं ठेवत आहेत. पण नाफेडची खेरदी बंद झाल्यानंतर खुल्या बाजारातील आवकही वाढू शकते.

याचा काही काळ बाजारावर दबाव येऊ शकतो. पण पुढील काळातील भाव नाफेडची विक्री, माॅन्सूनचा पाऊस आणि इतर डाळींच्या दरावर अवलंबून असतील, असा अंदाज हरभरा बाजारातील अभ्यासकांनी व्यक्त केला.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Paddy Plantation Machine: आजऱ्यात होणार यंत्राद्वारे भातलागण

Onion Harvesting Delay: खानदेशात कांदा काढणी रखडली

Fish Industry Development: माफसू साकारणार ‘मत्स्य तंत्रज्ञान संकुल’

Sugarcane FPR Delay: सोलापुरात २७६ कोटी एफआरपी थकीत; कारखानदारांकडून दिशाभूल

Nashik District Bank: नाशिक जिल्हा बॅंकेला ७५३ कोटींचे भागभांडवल

SCROLL FOR NEXT