Soybean Rate Agrowon
ॲग्रोमनी

Soybean Rate Update: सोयाबीन बाजाराची स्थिती काय?

पावसानं सोयाबीन काढणीच्या कामात खोडा घातला. पण दुसरीकडं बाजारात सध्या आवक काहीशी वाढलेली दिसतेय.

Anil Jadhao 

देशात सध्या सोयाबीन काढणी (Soybean Harvesting) जोमानं सुरु आहे. मात्र पावसानं सोयाबीन काढणीच्या कामात खोडा घातला. पण दुसरीकडं बाजारात सध्या आवक काहीशी वाढलेली दिसतेय. मध्य प्रदेश आणि महाराष्ट्रातील आवक जास्त दिसते. शेतकरी दिवाळी सणासाठी सोयाबीन विक्री करताना दिसत आहे. पण दिवाळीनंतरही दर कायम राहिल्यास शेतकरी सोयाबीन रोखू शकतात. मग या परिस्थितीत सोयाबीनचा बाजार (Soybean Market) कसा राहील? सध्या सोयाबीनला काय दर मिळतोय? पाहुयात बुलेटीनच्या शेवटी.  

कापूस बाजारावर दबाव

राज्यात मागील काही दिवस झालेल्या पावसानं कापसाचं मोठं नुकसान झालं. त्यामुळं कापसाचा दर्जा खालावतोय. तसचं कापूस ओला होतोय. या कापसाला किमान ६ हजार रुपयांपासून दर मिळतोय. तर कमाल दर ८ हजार ५०० रुपये मिळतोय. उत्तर भारतात कमाल दर ९ हजार ८०० रुपयांवर आलाय. मात्र जिनिंग आणि सूतगिरण्यांकडून अद्यापही कापसाला अपेक्षेप्रमाणं मागणी वाढलेली नाही. त्यामुळं कापूस दर काहीसे दबावात आहेत. पण पुढील महिन्यापासून कापूस दरात सुधारणा होण्याची शक्यता असून शेतकऱ्यांना सरासरी ९ हजार रुपये दर मिळू शकतो, असा अंदाज जाणकारांनी व्यक्त केलाय. 

कांद्याच्या दरात सुधारणा

देशात दिवाळी सणामुळं कांद्याला मागणी वाढलेली दिसतेय. मात्र दुसरीकडं आवक कमी होतेय. त्यामुळं कांदा दर काहीसे सुधारलेले दिसतात. सध्या कांद्याला सरासरी १ हजार ५०० रुपये ते २ हजार १०० रुपये दर मिळतोय. मात्र यंदा वाढलेला निविष्ठांचा खर्च, पावसामुळं नुकसान आणि अतिउष्णतेनं झालेली कांदा सड, यामुळं कांद्याचा उत्पादन खर्च प्रतिक्विंटल २ हजार २०० रुपयांपर्यंत पोचलाय. त्यामुळं सध्या मिळत असलेल्या दरात उत्पादन खर्चही भरून निघणार नाही. मात्र पुढील काळात कांदा पुरवठा मर्यादीत होऊन दरात सुधारणा होऊ शकते, असा अंदाज व्यापाऱ्यांनी व्यक्त केलाय. 

हिरव्या मिरचीचा ठसका कायम

राज्यात मागील १० ते १२ दिवसांमध्ये झालेल्या पावसानं मिरची पिकाला मोठा फटका बसला. त्यामुळं बाजारातील हिरवी मिरची आवक मर्यादीत होतेय. सध्या पुणे, मुंबई आणि नाशिक तसचं नागपूर बाजारातील आवक काहीशी जास्त दिसत असली तरी सरासरीपेक्षा कमीच आहे. मात्र इतर बाजार समित्यांमध्ये १० ते २० क्विंटलच्या दरम्यान आवक होतेय. त्यामुळं सध्या हिरव्या मिरचीला सरासरी ३ हजार ते ४ हजार ५०० रुपये दर मिळतोय. मिरचीचे दर पुढील काही दिवस टिकून राहतील, असा अंदाज भाजीपाला बाजारातील व्यापाऱ्यांनी व्यक्त केलाय. 

मेथीचे दर तेजीत

बाजारात सध्या मेथीची भाजी चांगलाच भाव खातेय. पुणे, नाशिक, सातारा, कोल्हापूर सह महत्वाच्या भाजीपाला उत्पादक जिल्ह्यांमध्ये झालेल्या जोरदार पावसानं मेथीच्या पिकाचं मोठं नुकसान झालं. पाणी साचून अनेक ठिकाणी पीक सडलं. त्यामुळं सध्या बाजारातील आवक नगण्य अशीच आहे. सध्या मेथीला प्रतिक्विंटल ५ हजार ते ८ हजार रुपये दर मिळतोय. तर किरकोळ बाजारात मेथीची विक्री ३० ते ५० रुपये जुडीप्रमाणं होतेय. मेथीचे दर आणखी काही दिवस टिकून राहण्याची शक्यता आहे. 

देशातील सोयाबीनचा हंगाम सुरु होऊन आता पंधरवडा उलटलाय. त्यामुळं सोयाबीन काढणी जोमात सुरु आहे. असं असलं तरी मागाल १५ ते २० दिवसांपासून देशातील काही भागांमध्ये पाऊस पडतोय. या पावसामुळं सोयाबीन काढणीच्या कामात व्यत्यय येतोय. परिणामी अनेक भागांत सोयाबीन पीक काढणीला येऊनही शेतातच आहे. सध्या सोयाबीनचे दर दबावात आहेत. मात्र दिवाळी सण साजरा करण्यासाठी शेतकरी सोयाबीन विक्री करताना दिसतोय. त्यामुळं देशातील महत्वाच्या बाजारांमध्ये सध्या सोयाबीन आवक वाढली. मध्य प्रदेश, राजस्थान आणि महाराष्ट्रातही अनेक बाजारांमध्ये सोयाबीन विक्रीसाठी येतंय. जाणकारांच्या सध्या आवक वाढत असल्यानं दर काहीसे स्थिरावले. मात्र दिवाळीनंतर शेतकरी विक्री कमी करण्याची शक्यता आहे. तसंच नुकसान वाढल्यानं दरात सुधारणा होण्याची शक्यता आहे. असं झाल्यास शेतकरी पुन्हा सोयाबीन रोखतील. परिणामी बाजार दरात सुधारणा होण्यास मदत होईल. सध्या नव्या सोयाबीनला ४ हजार ४ हजार ६०० रुपये दर मिळतोय. तर जुनं सोयाबीन ५ हजार ते ५ हजार ३०० रुपयानं विकलं जातंय. सध्या सोयाबीनचं नेमकं किती नुकसान झालंय, याबाबत निश्चित आकडा उपलब्ध नाही. मात्र या महिन्याच्या शेवटी नुकसानीचा आकडा येऊ शकतो. नुकसान जास्त असल्यास दरात सुधारणा होऊ शकते. सध्या शेतकऱ्यांनी किमान ५ हजार रुपये दर लक्षात ठेऊन सोयाबीन विक्री केल्यास फायदेशीर ठरु शकते, असा अंदाज जाणकारांनी व्यक्त केलाय. 

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Nashik-Pune Highway : पुणे-नाशिक महामार्ग प्रकल्पात शेतकऱ्यांवर अन्याय होणार नाही

MNS Protest : शेतकरी आणि कर्मचाऱ्यांसह मनसेचा ‘पन्नगेश्‍वर’वर मोर्चा

Paddy Transplantation : पावसाअभावी सिंधुदुर्गात भातरोप पुनर्लागवड रखडली

Mulching Farming : शेतकऱ्यांची पॉली मल्चिंगला मागणी

Groundnut Sowing : खानदेशात भुईमूग लागवडीस गती

SCROLL FOR NEXT