Mango Agrowon
ॲग्रोमनी

राज्यातून अडीच हजार टन आंबा निर्यातीचे उद्दिष्ट

देशातून दरवर्षी साधारणतः ५० हजार टन आंब्याची निर्यात होते. कोरोनानंतर यंदा आंब्याची निर्यात वाढविण्यासाठी राज्य कृषी पणन मंडळ सज्ज झाले आहे.

टीम ॲग्रोवन

पुणे : देशातून दरवर्षी साधारणतः ५० हजार टन आंब्याची(Mango) निर्यात(Export) होते. कोरोनानंतर(Corona) यंदा आंब्याची निर्यात वाढविण्यासाठी राज्य कृषी पणन मंडळ सज्ज झाले आहे. यंदाच्या हंगामात अडीच हजार टन आंब्यावर प्रक्रिया करून निर्यात करण्याचे उद्दिष्ट ठेवण्यात आले असल्याची माहिती (Information) राज्य कृषी पणन मंडळाचे कार्यकारी संचालक सुनील पवार यांनी दिली.

राज्यातील हापूस, (Hapus) केसर, कर्नाटकातील बैंगनपल्ली आणि उत्तर प्रदेशातील(UP) दशहरी, चौसा आदी प्रजातींच्या आंब्यांवर (Mango) महाराष्ट्रात प्रक्रिया करून त्याची निर्यात केली जाते. निर्यातपूर्व प्रक्रियेसाठी कृषी हवामान विभागांमध्ये निर्यात (Export) सुविधा केंद्रे उभारण्यात आलेली आहेत. या केंद्रांद्वारे विविध देशांच्या मागणीनुसार विविध प्रक्रिया करून आंबा निर्यात केला जातो. तर विविध आंब्यांना त्यांच्या भौगोलिक परिस्थिती आणि हवामानानुसार वैशिष्ट्यपूर्ण चवी आहेत. या चवींना जागतिक (World) बाजारपेठ मिळावी आणि त्याचे आंतरराष्ट्रीय पातळीवर बाजारपेठ (Market) मिळावी यासाठी पणन मंडळ आणि कृषी विभागाच्या सहकार्याने भौगोलिक मानांकन प्राप्त आंब्याच्या निर्यातीसाठी सध्या सांघिक प्रयत्न सुरू असल्याचे पवार यांनी
सांगितले.

गेल्या तीन-चार वर्षांपासून देशातून रशियात आंबा (Mango) निर्यात केली जात आहे. यंदा रशिया-युक्रेनमधील युद्धामुळे आंतरराष्ट्रीय स्तरावर निर्बंध आल्याने या निर्यातीबाबत साशंकता निर्माण झाली आहे. तसेच आंतरराष्ट्रीय स्तरावरील अस्थिरता युरोप व अमेरिकेतील आंबा निर्यातीवर विपरीत परिणाम करेल की काय, या परिस्थितीकडे निर्यातदार (Export) लक्ष ठेऊन आहेत. परंतु, बहुतांश निर्यात (Export) नजीकचे देशांसह मध्यपूर्व आशियायी देशात होत असल्याने निर्यातीवर फारसा फरक पडणार नाही, असेही पवार यांनी सांगितले.

निर्यातीसाठीच्या प्रक्रिया...

  • आयातदार देशांच्या मागणीनुसार आंब्यावर (Mango) विविध प्रक्रिया कराव्या लागतात

  • व्हेपर हीट ट्रिटमेंट, हॉट वॉटर ट्रिटमेंट आणि विकिरण आदी प्रक्रियेचा यात समोवश आहे.

  • या माध्यमातून आंब्यामधील फळमाशी व कोय किडीचे निर्मूलन केले जाते.

  • प्रक्रिया झालेला आंबा जास्त काळ टिकतो आणि निर्यातीसाठी उत्तम स्थिती राहते.

या देशात होतो निर्यात
अमेरिका, रशिया, ऑस्ट्रेलिया, मलेशिया, अर्जेंटिना, इंग्लंड, जपान, न्यूझीलंड, दक्षिण कोरिया, मॉरिशस, इराण, मध्यपूर्व आशियायी देश आणि युरोपमधील देशांत निर्यात होती.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Halloween Decor: अमेरिकेत भरतो हॅलोविन महोत्सव

Weekly Weather: बहुतांशी जिल्ह्यांत हलक्या पावसाची शक्यता

Farmers Support: अतिवृष्टिग्रस्तांच्या मदतीला ‘महाबीज’कडून हरताळ

Mathadi Board: माथाडी मंडळाला आदेशाचा फेरविचार करण्याचा अधिकार नाही

Tomato Processing Project: शेतकरी गटाचा धान पट्ट्यात टोमॅटो प्रक्रिया प्रकल्प

SCROLL FOR NEXT