Chana Market
Chana Market  Agrowon
ॲग्रोमनी

Chana Market : हरभरा बाजार यंदा साधणार की कमी दरात जाणार

Anil Jadhao 

Chana Rate Update : सध्या तूर (Tur), उडिद (Urad) आणि मुगाच्या दरात (Moong Rate) तेजी आहे. यामुळं हरभरा बाजारालाही आधार मिळून दरात काहीशी सुधारणा झाली. उत्पादनात यंदा घट झाल्याचं पुढं येतंय. तर बाजारातील हरभरा आवक (Chana Arrival) आता हळूहळू वाढतेय. सध्या बाजारात हमीभावापेक्षा कमीच भाव मिळत आहे.

केंद्राने यंदा सरकारला प्रतिक्विंटल ५ हजार ३३५ रुपये हमीभाव जाहीर केला. तर सध्या बाजारात हरभऱ्याला ४ हजार ७०० ते ५ हजार २०० रुपये दर मिळत आहे.

शेतकऱ्यांचा हरभरा आता जवळपास काढून झाला. बाजारातील आवकही गेल्या काही दिवसांपासून वाढली. आवक वाढीसह दरातही काहीशी सुधारणा पाहायला मिळाली. मार्च महिन्याच्या पहिल्या आठवड्यापर्यंत हरभऱ्याचे सरासरी भाव ४ हजार ५०० ते ४ हजार ८०० रुपये दर मिळत होता.

पण मागील दोन आठवड्यांमध्ये हरभरा दरात क्विंटलमागं २०० ते ३०० रुपयांपर्यंत सुधारणा दिसली. हरभऱ्याला आता ४ हजार ७०० ते ५ हजार २०० रुपये भाव मिळतोय.

काही बाजारांमध्ये हरभरा भावानं ५ हजार ३०० रुपयांचाही टप्पा पार केला. पण हा दर खूपच कमी बाजारात आणि कमी मालाला मिळतोय. तर दुसरीकडं आजही अनेक ठिकाणी हरभरा दर ५ हजारांच्या खालीच आहेत.

हरभरा दरात सुधारणा होण्याचं मुख्य कारण म्हणजे उत्पादनात झालेली घट. बदलते वातावरण तसचं वादळी पाऊस आणि गारपीटीमुळे हरभरा उत्पादकता यंदा घटली.

हरभरा उत्पादन २० ते ३० टक्क्यांपर्यंत कमी आल्याचं शेतकरी सांगतात. त्यामुळं सरकारच्या अंदाजापेक्षा उत्पादन खूपच कमी राहील, असा अंदाज जाणकार व्यक्त करत आहेत.

इतर कडधान्यातील तेजी. सध्या तूर, मूग आणि उडीद या महत्वाच्या कडधान्याचे दर तेजीत आहेत. प्रामुख्यानं तुरीच्या दराचा हरभऱ्यावर परिणाम होत असतो.

तुरीचे दर जास्त वाढल्यानं हरभरा बाजारालाही आधार मिळतोय. इतर डाळीचे दर तेजीत असल्याने हरभऱ्याला उठाव मिळू शकतो. त्यामुळंही हरभरा दरात सुधारणा दिसली.

नाफेडची खरेदी ४.३१ लाख टनांवर

केंद्रानं आतापर्यंत महाराष्ट्र, गुजरात, कर्नाटक आणि आंध्र प्रदेश या चार राज्यांमध्ये हरभरा खरेदी सुरु केली. यंदा ५ हजार ३३५ रुपये हमीभाव आहे. नाफेडनं आजपर्यंत ४ लाख ३१ हजार टन हरभरा खरेदी केली.

यापैकी महाराष्ट्रात २ लाख ३० हजार टन हरभरा खरेदी झाली. गुजरातमध्ये १ लाख १९ हजार टन, आंध्र प्रदेशात ४५ हजार टन आणि कर्नाटकात ४४ हजार टनांची खरेदी झाली.

नाफेडच्या खरेदीकडे लक्ष

सध्या बाजाराची नजर नाफेडच्या खरेदीवरच आहे. मागील हंगामात नाफेडने २५ लाख टनांच्या दरम्यान हरभरा खरेदी केला होता. त्यानंतर या हरभऱ्याची खुल्या बाजारात कमी दरानं विक्री केली. त्यामुळं गेली वर्षभर हरभरा बाजार दबावात राहीला.

तर बहुतेक शेतकऱ्यांना खुल्या बाजारात हमीभावापेक्षा ५०० ते ७०० रुपये कमी दरानं विक्री करावी लागली होती. पण यंदा हरभरा बाजाराला आधार देणारे फंडामेंटल्स मजबूत आहेत. देशात यंदा नेमकं किती उत्पादन होईल हे पुढील काही दिवसांमध्ये स्पष्ट होईल.

उत्पादन यंदा घटलं हे नक्की आहे. पण शेतकरी सांगतात त्याप्रमाणं उत्पादनात २० ते ३० टक्क्यांपर्यंत घट झाल्यास खुल्या बाजारातील दर सुधारून हमीभावाचा टप्पा गाठतील, असा अंदाज जाणकारांनी व्यक्त केला.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Crop Damage Rain : वादळी पावसाने टोमॅटो, मिरची, भेंडीसह ऊस पीक उद्धवस्त, नुकसान भरपाई मिळणार कधी?

Konkan Ranmeva : कोकणच्या रानमेव्यावर वातावरणाचा परिणाम, अनेकांचे आर्थिक गणित कोलमडणार

Agrowon Podcast : हळदीचे भाव तेजीतच; कापूस, सोयाबीन, गहू, लिंबू यांचे काय आहेत दर पाहुयात?

Ethanol Production : कांदा उत्पादकांच्या पाठोपाठ ऊस उत्पादकांनाही सरकारनं घोषणा करून भूलवलं ? | शेतीच्या बातम्या

Maharashtra Rain : राज्यात उष्णतेच्या लाटेचा इशारा; देशातील अनेक भागात तापमानाचा पारा ४२ ते ४६ अंशाच्या दरम्यान

SCROLL FOR NEXT