Tur Market Agrowon
ॲग्रोमनी

Tur Market : तूर बाजारावर केंद्राचा बारीक `डोळा`

तुरीच्या दरानं देशातील काही बाजारांमध्ये ९ हजारांचा टप्पा गाठल्यानं सरकारची चिंता वाढली.

Anil Jadhao 

Tur Rate : तुरीच्या दरानं देशातील काही बाजारांमध्ये ९ हजारांचा टप्पा गाठल्यानं सरकारची चिंता वाढली. सरकारने आयातवाढीसाठी आणि बाजारावर दबावासाठी सर्व प्रयत्न केले. पण तरीही तुरीच्या दरातील तेजी कमी होण्याची नाव घेईना.

त्यामुळं सरकारने आता व्यापारी, स्टाॅकिस्ट, मिलर्स आणि आयातदारांकडील तूर साठ्याचे निरिक्षण करण्यासाठी एक समिती स्थापन केली. पण याचा तुरीच्या बाजारावर परिणाम होणार नाही, असे तूर बाजारातील अभ्यासकांनी सांगितले.

केंद्र सरकारने सोमवारी (ता.२७) केंद्रीय ग्राहक कल्याण विभागाच्या अतिरिक्त सचिव निधी खरे यांच्या अध्यक्षतेखाली एक समिती स्थापन केली. देशात तुरीची आयात चांगल्या प्रमाणात होत आहे. मात्र तरीही बाजारात तुरीचा साठा मुबलक प्रमाणात होत नाही.

त्यामुळे तुरीची साठेबाजी होत असल्याचा संशय केंद्राला आहे. त्यामुळे केंद्र सरकारने व्यापारी, स्टाॅकिस्ट मिलर्स आणि आयातदार यांच्याकडील तुरीच्या साठ्याचे निरिक्षण करण्यासाठी सरकारने ही समिती स्थापन केली आहे. यावरून सरकार तुरीचे दर नियंत्रणात आणण्यासाठी सर्व ते प्रयत्न करत असल्याचे स्पष्ट होते.

केंद्र सरकार मागील काही महिन्यांपासून तूर बाजारावर लक्ष ठेऊन आहे. पुढील काळात तुरीच्या दरात आणखी सुधारणा होण्याची शक्यता व्यक्त होत आहे. मात्र या परिस्थितीत बाजारात अवास्तव किंवा कृत्रिम दरवाढ होऊ नये, यासाठी सरकारचा प्रयत्न सुरु आहे.

सरकारने राज्यांना राज्यातील तुरीच्या साठ्याची माहिती देण्याची सूचना केली होती. तर आयात वाढविण्यासाठी तूर आयातीवरील १० टक्के शुल्कही काढले. आता ही समिती स्थापन केली.

दर कमी होतील का?

देशात यंदा तुरीच्या उत्पादनात मोठी झाली. केंद्र सरकारनं ३६ लाख टनांचा अंदाज जाहीर केला. पण उद्योग आणि व्यापारी ३२ लाख टनांपर्यंत तुरीचे उत्पादन झाल्याचे सांगत आहे. तसेच सरकारने यंदा १० लाख टन तूर आयात होईल, असे सांगितले.

पण आयातदारांच्या मते ८ लाख ५० हजारांपेक्षा जास्त तूर आयात होणार नाही. म्हणजेच यंदा देशात तुरीची मोठी टंचाई भासणार आहे. त्याचेच पडसाद सध्या बाजारात दिसत असून दरातील तेजी कायम आहे.

तसेच सरकारच्या कोणत्याही निर्णयाचा बाजारात अल्पकाळासाठीच परिणाम दिसेल. दीर्घकाळात तुरीचे दर तेजीतच राहतील, असाही अंदाज तूर बाजारातील अभ्यासकांनी व्यक्त केला.

देशातील तूर उत्पादनात मोठी घट झाली. मागील हंगामातील शिल्लक साठाही १ लाख टनांपेक्षा जास्त नाही. आयात ८ ते ८ लाख ५० हजारांच्या दरम्यान राहणार आहे. एकूणच काय दर यंदा तुरीचा पुरवठा खूपच कमी राहील. मागणी मात्र चांगली आहे. त्यामुळे सरकारच्या निर्णयाचा बाजारावर काही परिणाम होणार नाही.
दीनेश सोमाणी, तूर बाजार विश्लेषक

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Monsoon Rainfall 2025: कोकण, घाटमाथ्यावर पावसाचा अंदाज; विदर्भात दोन दिवस जोरदार पावसाची शक्यता

AI In Sugarcane Farming : ‘एआय’च्या वापरासाठी ऊस उत्पादक शेतकरी आले पुढे

Sugarcane Farming : ऊस व्यवस्थापनातील महत्त्वाचे मुद्दे

Pasha Patel: शेतकऱ्यांनी नुकसानीची सवय लावून घेतली पाहिजे; पाशा पटेल यांचा अजब सल्ला

Dairy Farming : दुग्ध व प्रक्रिया व्यवसायातून शोधला आनंद

SCROLL FOR NEXT