Soybean Rate Agrowon
ॲग्रोमनी

Soybean Rate : अमेरिकेत सोयाबीन तेजीत; देशात स्थिर का?

आंतरराष्ट्रीय बाजारात सोयाबीनच्या दरात आजही सुधारणा पाहायला मिळाली. सोयाबीनचे दर मागील पाच महिन्यांतील उच्चांकी पातळीवर पोचले.

Team Agrowon

अनिल जाधव
पुणेः आंतरराष्ट्रीय बाजारात सोयाबीनच्या दरात (Soybena Rate) आजही सुधारणा पाहायला मिळाली. सोयाबीनचे दर मागील पाच महिन्यांतील उच्चांकी पातळीवर पोचले. सोयाबीनने आज १४.९० डाॅलर प्रतिटनाचा टप्पा गाठला. सोयापेंडचेही (Soyapend) दर वाढले होते. पण आंतरराष्ट्रीय बाजारातील सोयाबीन आणि सोयापेंड दरातील तेजीचा देशातील सोयाबीन बाजाराला आज फायदा मिळाला नाही. देशातील सोयाबीन दर स्थिर होते.

आंतरराष्ट्रीय बाजारात सोयाबीनचा दर आज १४.९० डाॅलर प्रतिबुशेल्सवर पोचले होते. अमेरिकेतील सोयाबीनचा नवा हंगाम सुरु झाल्यानंतरचा हा विक्रमी दर आहे. चीनमध्ये कोरोना निर्बंध शिथिल झाल्यानंतर सोयाबीनची मागणी वाढली. सध्या ब्राझील आणि अर्जेंटीनात सोयाबीन लागवड सुरु आहे. फक्त अमेरिकेतच सोयाबीन पीक हाती आले आहे. त्यामुळे चीनची मागणीचा फायदा अमेरिकेच्या सोयाबीनला मिळत आहे.

सोयापेंडचे दरही सध्या मागील चार महिन्यांतील उच्चांकी पातलीवर पोचले आहेत. आजही सोयापेंडच्या दरात जवळपास एक टक्क्यांची वाढ झाली होती. आज सोयापेंडचे दर ४६९ डाॅलर प्रतिटनावर पोचले होते. हा दर चालू हंगामातील उच्चांकी आहे. सोयाबीन आणि सोयापेंडचे दर वाढले मात्र सोयातेलाचे दरही अद्यापही दबावात आहेत.

आंतरराष्ट्रीय बाजारात सोयाबीन आणि सोयापेंडचे दर वाढत आहेत. चीनची वाढलेली मागणी आणि अर्जेंटीना तसेच ब्राझीलमधील दुष्काळी स्थिती यामुळे सोयाबीनला उठाव मिळाला. चीनमधून सोयापेंडलाही मागणी वाढली आहे. मात्र सोयातेलाचे बाजार अद्यापही सुस्तच आहे. सोयातेलाचे दर दबावात आहेत. पामतेल आणि सूर्यफुल तेलाचा सोयाबीन तेलाच्या दरावार दबाव दिसतो आहे.

…………..
सोयाबीनची आवक
देशातील बाजारात आज जवळपास २ लाख ६० हजार क्विंटल सोयाबीनची आवक झाली होती. यापैकी महाराष्ट्रात ८० हजार क्विंटल आणि मध्य प्रदेशात १ लाख २० हजार क्विंटल सोयाबीनची आवक झाली होती. तर राजस्थानमधील बाजारात २५ हजार क्विंटल सोयाबीन विक्रीसाठी आले होते. दराचा विचार करता आज सरासरी ५ हजार ३०० ते ५ हजार ५०० रुपये प्रतिक्विंटलवर स्थिर होते.
…………….

प्रक्रिया प्लांट्सचे दर
प्रक्रिया प्लांट्सचे दर महाराष्ट्रात अधिक होते. महाराष्ट्रातील प्रक्रिया प्लांट्सनी आज ५ हजार ६५० ते ५ हजार ७५० रुपयांच्या दरम्यान दर काढले होते. तर मध्य प्रदेशातील प्रक्रिया प्लांट्सनी ५ हजार ५५० ते ५ हजार ७०० रुपयाने सोयाबीन खरेदी केले. राजस्थानमध्येही याच दरम्यान दर होता.
………….

दरवाढीचा अंदाज
इंडोनेशिया जैव इंधनामध्ये ३५ टक्के पामतेलाचा वापर करण्याचे धोरण राबविणार आहे. त्याची अंमलबजावणी जानेवारी २०२३ पासून म्हणजेच पुढच्या महिन्यापासून होण्याची शक्यता आहे. त्यामुळे जागतिक खाद्यतेल बाजाराला आधार मिळेल, असा अंदाज व्यक्त होत आहे. खाद्यतेलाचे दर वाढले आणि सोयाबीन तसेच सोयातेलाच्या दरातील वाढ कायम राहील्यास देशातही सोयाबीनचे दर सुधारतील, असा अंदाज जाणकारांनी व्यक्त केला.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Orange Farmer Guide: ‘संत्रा : स्पेन, इस्राईल व्हाया विदर्भ’ पुस्तक मार्गदर्शक

Citrus Research Project: लिंबूवर्गीय समन्वयित संशोधन प्रकल्प बंद करणार नाही: शिवराज सिंह चौहान

Ethanol Production: मक्यापासून इथेनॉल निर्मिती करा

India Agri Export: ‘ट्रम्प टॅरिफ’नंतरही शेतीमाल निर्यात चढी

Maharashtra Cold Wave: गारठा कमी होण्याची शक्यता

SCROLL FOR NEXT