Soybean Market Agrowon
ॲग्रोमनी

Soybean Market : सोयापेंड निर्यात सौद्यांचा सोयाबीनला आधार

Soybean Rate : देशात आणि आंतरराष्ट्रीय बाजारात सोयाबीन आणि सोयापेंडची भावपातळी वाढली. ब्राझीलमध्ये काही भागात पिकाला पोषक स्थिती नाही. यामुळे ही भाववाढ झाल्याचे अभ्यासक सांगतात.

अनिल जाधव

Soybean Prices : पुणेः देशात आणि आंतरराष्ट्रीय बाजारात सोयाबीन आणि सोयापेंडची भावपातळी वाढली. ब्राझीलमध्ये काही भागात पिकाला पोषक स्थिती नाही. यामुळे ही भाववाढ झाल्याचे अभ्यासक सांगतात.

आंतरराष्ट्रीय बाजारात एका महिन्यात सोयापेंडचे भाव २० टक्क्यांनी वाढले. यामुळे भारताकडे मागणी वाढली. परिणामी सोयाबीनची भावपातळी २०० ते ३०० रुपयांनी वाढल्याचेही जाणकारांनी सांगितले.  

सोयाबीनच्या भाववाढीला तसे तीन फंडामेंटल्स म्हणजेच बाजारातील पायाभूत घटक कारणीभूत आहेत. पण तिन्ही फंडामेंटल्सच्या मुळाशी एक कारण आहे. ते कारण म्हणजे ब्राझील. ब्राझील हा जगातील महत्वाचा सोयाबीन उत्पादक देश. यंदा ब्राझीलमध्ये आतापर्यंतचं विक्रमी सोयाबीन उत्पादन होईल, असा अंदाज आहे.

या अंदाजामुळं आंतरराष्ट्रीय बाजारात सोयाबीनवर दबाव होता. त्याचा परिणाम आपल्या सोयाबीनच्या भावावरही दिसून येत होता. त्यामुळे आपला भाव ४ हजार ५०० रुपयांचा टप्पा पार करत नव्हता. म्हणजेच भाव दबावात राहण्यामागही ब्राझील काही प्रमाणात कारणीभूत होता.

आता ब्राझीलमधील काही सोयाबीन उत्पादक भागात पाऊस नाही. पिकाला पोषक वातावरण नाही. यामुळे ब्राझीलमधील उत्पादन अंदाजापेक्षा कमी राहील, असे अंदाज आता येत आहेत. त्यामुळे अमेरिकेच्या सोयाबीनला उठाव वाढला. यामुळे अमेरिकेच्या बाजारात भाव वाढले. सोयापेंडचे भाव महिनाभरातच जवळपास २० टक्क्यांनी वाढले. सोयाबीनही १० टक्क्यांनी वाढलं.

आंतरराष्ट्रीय बाजारात सोयापेंडचा भाव ३७१ डाॅलर प्रतिटनांवरून ४५१ डाॅलर प्रतिटनांवर पोचला. आजही अमेरिकेच्या सोयापेंडचे भाव भारताच्या सोयापेंडपेक्षा कमीच आहेत. पण आशियातील देशांना सध्याच्या भावात अमेरिकेपेक्षा भारताकडून सोयापेंड घेणं परवडतं. त्यामुळे आपल्या शेजारचे आणि आशियातील देश भारताकडून सोयापेंड घेत आहेत. आपलं सोयापेंडच्या बंदरावर जवळपास ४६ हजार रुपये प्रतिटनाने मिळत आहे, असे काही निर्यातदारांनी सांगितले.

तीन लाख टन सोयापेंड निर्यातीचे करार
भारतातील निर्यातदारांनी आतापर्यंत ३ लाख टन सोयापेंड निर्यातीचे करार केले. ही निर्यात नोव्हेंबर आणि डिसेंबर या दोन महिन्यांमध्ये होणार आहे. यापैकी जास्त माल बांगलादेश, इराण, नेपाळ आणि व्हिएतनामला जाणार आहे.

भारताकडे केवळ हे चार देशच नाही तर इतरही आशियातील देश सोयापेंडसाठी विचारणा करत आहेत, असे राॅयटर्स या वृत्तसंस्थेने आपल्या एका अहवालात म्हटले आहे.

भावपातळी काय झाली?
भारतात सोयातेलाचे भाव दबावात आहेत. पण सोयापेंड निर्यातीला आता मागणी येत असल्याने भावाला आधार मिळत आहे.  दोन आठवड्यापूर्वी सोयाबीनचा सरासरी भाव ४ हजार ४०० ते ४ हजार ५०० रुपयांच्या दरम्यान होता.

पण त्यात वाढ होत आता भावपातळी काहिशी सुधारली. सोयाबीनचा सरासरी भाव आज ४ हजार ६०० ते ४ हजार ८०० रुपयांच्या दरम्यान पोचला. म्हणजेच दोन आठवड्यांमध्यो सोयाबीनचा सरासरी भाव क्विंटलमागं किमान २०० ते ३०० रुपयांनी वाढला. सरासरी भाव सर्वच भागात वाढला.

दिवाळीनंतर बाजार कसा राहू शकतो?
आंतरराष्ट्रीय बाजारात सोयापेंडचा भाव आणखी वाढण्याचा अंदाज आहे. त्यामुळे भारतीय सोयापेंडलाही मागणी वाढेल. सोयापेंड निर्यातीचे सौदे पूर्ण करण्यासाठी गाळपासाठी प्रक्रिया प्लांट्सना सोयाबीन खरेदी वाढवावी लागेल. यंदा उत्पादनात घट आहे.

त्यामुळे भावात सुधारणा होऊ शकते. सोयाबीनचा भाव पुढील दोन महिन्यांमध्ये ५ हजार ५०० रुपयांचा टप्पा गाठू शकतो? असा अंदाज सोयाबीन बाजारातील अभ्यासकांनी व्यक्त केला.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Agrowon Podcast: हरभरा दरात सुधारणा; केळी दर नरमले, ज्वारीला मागणी कायम, आले दरात सुधारणा तर कांद्याची दरपातळी कायम

Mumbai Rain: मुंबईतील पावसाने २६ जुलै २००५ ची आठवण; अनेक भागात जनजिवन विस्कळीत

Khandesh Cotton Crisis : खानदेशात जिनिंग प्रेसिंग कारखान्यांची धडधड बंद

Crop Insurance Crisis: पीक विम्याकडे शेतकऱ्यांची पाठ; गेल्यावर्षीच्या तुलनेत केवळ २२ टक्के अर्ज

Solapur Power Loss : सोलापूर मंडलाची वीजहानी सर्वाधिक

SCROLL FOR NEXT