Soybean Rate Agrowon
ॲग्रोमनी

Soybean Market : आंतरराष्ट्रीय बाजारात सोयाबीन उच्चांकी पातळीवर

देशातील सोयाबीन बाजारानं आजही शेतकऱ्यांचा हिरमोड केला. मात्र आंतरराष्ट्रीय बाजारानं काहीशी उमेद जागवली. आज आंतरराष्ट्रीय बाजारात सोयाबीन आणि सोयापेंडच्या दरात मोठी वाढ झाली.

Team Agrowon

अनिल जाधव
पुणेः देशातील सोयाबीन बाजारानं (Soybean Market) आजही शेतकऱ्यांचा हिरमोड केला. मात्र आंतरराष्ट्रीय बाजारानं काहीशी उमेद जागवली.

आज आंतरराष्ट्रीय बाजारात सोयाबीन आणि सोयापेंडच्या (Soyacake) दरात मोठी वाढ झाली. विशेष म्हणजे हे दर टिकून राहतील, असा अंदाज आहे. त्यासाठी पोषक स्थितीही आहे.

तसेच पुढील काळात देशातील दरही वाढतील, असा अंदाज सोयाबीन बाजारातील (Soybean Market) अभ्यासकांनी व्यक्त केला. 

सहाजिकच सुरुवातीलाच आपण आंतरराष्ट्रीय बाजारावर चर्चा करू…आंतरराष्ट्रीय बाजारात आज, म्हणजेच १८ जानेवारीला सोयाबीनने मोठी झेप घेतली.

सोयाबीननं आज मागील सात महिन्यांतील उच्चांकी टप्पा गाठला होता.

तसं काल सायंकाळनंतर सोयाबीनच्या दरात वाढ झाली होती. त्यामुळं बाजार १५.३४ डाॅलर प्रतिटनावर बंद झाला होता. रुपयात हा दर ४ हजार ५७८ रुपये होतो.

मात्र आज बाजार सुरु झाल्यापासूनच दरात वाढ होत गेली. दुपारी ४ वाजेपर्यंत सोयाबीनचे दर १५.४६ डाॅलर प्रतिबुशेल्सवर होते.

सोयाबीनचा हा भाव आपल्या हिशोबानुसार ४ हजार ६१७ रुपये क्विंटल होतो.

आता तुम्हाला प्रश्न पडलाच असेल की, आंतरराष्ट्रीय बाजारात सोयाबीन दरात एवढी वाढ का झाली? तर चीनमधून सोयाबीनला वाढणारी मागणी आणि अर्जेंटीनात उत्पादन घटीचा अंदाज, यामुळं सोयाबीनमध्ये तेजी आली, असं म्हणता येईल.

अर्जेंटीनात यंदा विक्रमी उत्पादनाचा अंदाज हंगामाच्या सुरुवातीला व्यक्त केला जात होता. मात्र दुष्काळानं गणित बदललं. आता अर्जेंटीनातील उत्पादन गेल्यावर्षीएवढंच राहील, असंही सांगितलं जातं  आहे.

चीनमध्ये कोरोना निर्बंध सध्या शिथिल करण्यात येत आहेत. तर चीनमधील मजूर नववर्ष म्हणजेच लूनार साणासाठी आपल्या गावी निघाले आहेत.

त्यामुळं चीनमधील रेल्वे स्थानकं गजबजली. चीनची अर्थव्यवस्था खुली होत असल्यानं सोयाबीनला मागणी वाढली. सध्या चीनमध्ये सोयापेंडचा साठा नाही.

त्यामुळं यंदा चीन सोयाबीनची आयात वाढवणार आहे. याचा परिणाम सध्या आंतरराष्ट्रीय बाजारावर दिसत असून दर तेजीत आले.

सोयापेंडचे दरही तेजीत
सोयाबीनसह आंतरराष्ट्रीय बाजारात सोयातेल आणि सोयापेंडचेही भाव वाढले. काल सोयापेंडचे वायदे ४७९ डाॅलरवर बंद झाले होते.

काल सायंकाळनंतर सोयाबीनसह सोयापेंडच्या दरातही मोठी वाढ झाली होती. आज बाजार खुला झाल्यानंतर दरवाढ कायम राहीली.

आज दुपारी ४ वाजेपर्यंत सोयापेंडचा भाव ४८५ डाॅलर प्रतिटनावर पोचला होता. म्हणजेच आज सोयापेंडच्या दरात ६ डाॅलरची वाढ झाली होती.

देशातील दरपातळी
आंतरराष्ट्रीय बाजारात सोयाबीन आणि सोयापेंड तेजीत आहेत. मात्र देशातील बाजार मात्र हालायचं नाव घेईना.

देशातील सोयाबीनची सरासरी दरपातळी आजही ५ हजार २०० ते ५ हजार ५०० रुपयांच्या दरम्यान होती. तर प्रक्रिया प्लांट्सचे भाव ५ हजार ५०० ते ५ हजार ७०० रुपयांच्या दरम्यान आहेत.


देशातील दर वाढणार
आंतरराष्ट्रीय बाजारात दर वाढल्यानंतर देशातही दरवाढ होणं अपेक्षित होतं. पण यंदा शेतकऱ्यांनी सोयाबीन मागं ठेवलं.

त्यामुळं उद्योगही गरेजप्रमाणं खरेदी करत आहेत. मात्र आता उद्योगांकडील साठा कमी झालाय. तसंच देशातून सोयापेंड निर्यात वाढली.

यंदा ऑक्टोबर ते डिसेंबर, या तीन महिन्यांमध्ये सोयापेंड निर्यात गेल्यावर्षीपेक्षा दुपटीने वाढली. पुढील काळातही सोयापेंड निर्यातीची गती वाढण्याचा अंदाज आहे.

आंतरराष्ट्रीय बाजारात सोयापेंडचे दर वाढल्यानं भारतीय सोयापेंडला मागणी वाढली. त्यामुळं पुढील आठवडाभरात सोयाबीनच्या दरात सुधारणा होईल.

काय राहील दरपातळी?

देशातील सोयाबीनची दरपातळी पुढील काही दिवसांमध्ये ५ हजार ५०० ते ६ हजार रुपयांच्या दरम्यान पोचेल. या पातळीपर्यंत दर वाढण्यास पोषक स्थिती आहे.

त्यामुळं शेतकऱ्यांनी ५ हजार ५०० रुपयांपेक्षा कमी दरात सोयाबीन विकू नये. थोडे दिवस थांबल्यास शेतकऱ्यांना चांगला दर मिळेल.

त्यामुळं शेतकऱ्यांनी बाजाराचा आढावा घेऊन टप्प्याटप्प्यानं सोयाबीनची विक्री करावी, असं आवाहन सोयाबीन बाजारातील अभ्यासकांनी केलंय.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Swabhimani Motorcycle Rally: ऊसदरासाठी ‘स्वाभिमानी’चे शक्तिप्रदर्शन; मोटारसायकल रॅलीमध्ये हजारो शेतकऱ्यांचा सहभाग

Agriculture Drought Management: दुष्काळात पाणी बचतीसह रब्बीचे नियोजन; कृषी विभागाकडून ७ हजार हेक्टरवर चारा उत्पादनाचा प्रस्ताव

Purandar Drought Condition: पुरंदर तालुक्यात दुष्काळाचे संकट; २३ हजार ६८४ हेक्टर क्षेत्र बाधित

Kharif Crop Damage: मावळमध्ये खरीप पिकांचे मोठे नुकसान; भात, सोयाबीन, भुईमुगाला ७० ते ८० टक्के फटका

Agricultural Infrastructure: शेतीमाल मूल्यवर्धनासाठी अत्याधुनिक सुविधांवर भर; नवीन गोदामे, शीतगृहे आणि विकिरण केंद्रे उभारणार: पणनमंत्री जयकुमार रावल

SCROLL FOR NEXT