Soybean Market : आंतरराष्ट्रीय बाजारात सोयाबीन दर सुधारले

Anil Jadhao 

आंतरराष्ट्रीय बाजारात आज सोयाबीन १४.६२ डाॅलर प्रतिटनाने विकले गेले. तसंच सोयाबीन तेलाने काल मागील पाच महिन्यांतील निचांकी दराचा टप्पा गाठला होता. सोयाबीन तेलाचे दर ६१.३३ सेंट प्रतिपाऊंडपर्यंत नरमले होते. त्यात आज काहीशी सुधारणा झाली होती.

आंतरराष्ट्रीय बाजारात आज सोयापेंडचे दर ४५३.५३ डाॅलर प्रतिटनावर पोचले होते. सोयाबीनच्या नव्या हंगामातील आतापर्यंतचा हा विक्रमी दर ठरला. आंतरराष्ट्रीय बाजारात सोयाबीन आणि सोयापेंडचे दर वाढले, मात्र सोयातेल अद्यापही दबावात आहेत.

आज देशात सरासरी तीन लाख क्विंटल सोयाबीनची आवक झाली होती. आजही मध्य प्रदेशातील आवक तुलनेत जास्त होती. मध्य प्रदेशात आज जवळपास सव्वालाख टन सोयाबीन विक्रीसाठी बाजारात आले होते. सोयाबीनला सरासरी ५ हजार २५० ते ५ हजार ५०० रुपये प्रतिक्विंटलचा दर मिळाला. 

राज्यात आज जवळपास एक लाख क्विंटल सोयाबीनची आवक झाली होती. सोयाबीन सरासरी ५ हजार २५० ते ५ हजार ५५० रुपयांच्या दरम्यान दर होते. तर प्रक्रिया प्लांट्सचे दर सरासरी ५ हजार ६०० ते ५ हजार ७५० रुपयांपर्यंत होते.

बाजारात दर नरमल्यानंतर शेतकऱ्यांनी सोयाबीनची विक्री कमी केली. त्यामुळे दर जास्त दबावात आले नाहीत. सोयाबीनचा भाव स्थिर नरमलेल्या पातळीवर स्थिर राहीला.

सध्या आंतरराष्ट्रीय बाजारात सोयाबीन दर सुधारण्यास अनुकूल स्थिती आहे. याचा लाभ देशातील सोयाबीन बाजारालाही होऊ शकतो, असा अंदाज सोयाबीन बाजारातील जाणकारांनी व्यक्त केला.

cta image