Soybean
Soybean  Agrowon
ॲग्रोमनी

Soybean Market : सोयाबीन बाजारात अस्थिरता का?

Anil Jadhao 


अनिल जाधव
पुणेः आंतरराष्ट्रीय बाजारात सोयाबीन दरातील (Soybean Rate) चढ उतार कायम आहे. आजही सोयाबीन दरात सुधारणा पाहायला मिळाली. तर देशातील दरपातळी आजही कायम होती. सरासरी ५ हजार २०० ते ५ हजार ५०० रुपये दर मिळाला. 

आंतरराष्ट्रीय बाजारात सोयाबीन दर एकभावपातळीपेक्षा जास्त वाढताना दिसत नाहीत. मागील महिनाभरात सोयाबीन १४.९० डाॅलरच्या जवळ जाऊन पुन्हा कमी होतंय.  भारतीय रुपयात हा दर प्रतिक्विंटल ४ हजार ६०० रुपये होतो. मात्र किमान १४.३० डाॅलरच्या दरम्यान म्हणजेच ४ हजार ३०० रुपयांच्या दरम्यान सोयाबीनला आधार मिळतोय. त्यामुळं सोयाबीनचा आंतरराष्ट्रीय बाजार या दरम्यान फिरतोय. आजही सोयाबीनचे दर काहीसे वाढून १४.७६ डाॅलर म्हणजेच ४ हजार ५०० रुपयांपर्यंत पोचले.

दर देशात सोयाबीन बाजारात विशेष काही घडामोडी घडताना दिसत नाहीत. आजही सोयाबीनचा बाजार स्थिर होता. आज सोयाबीनला सरासरी ५ हजार २०० ते ५ हजार ५०० रुपये दर मिळाला. ही दरपातळी डिसेंबर महिन्यात कायम आहे. तसंच पुढील काही दिवस ही दरपातळी कायम राहू शकते.




अर्जेंटीनाकडे लक्ष
सध्या आंतरराष्ट्रीय बाजाराचे लक्ष अर्जेंटीनातील परिस्थितीकडे आहे. अर्जेंटीनात सध्या महत्वाच्या सोयाबीन उत्पादक भागात कमी पाऊस आहे. जमिनीत ओलावा कमी असल्याने सोयाबीनच्या उत्पादकतेवर परिणाम होऊ शकतो, असा अंदाज व्यक्त केला जातोय. त्यामुळं अर्जेंटीनातील काही संस्था यंदा उत्पादन कमी राहील, असं सांगत आहेत. खरंच असं घटलं किंवा शक्यता वाढली तर आंतरराष्ट्रीय बाजारात सोयाबीन दर वाढू शकतात.

देशातील बाजारातील स्थिती
मागील काही दिवसांपासून देशातून सोयापेंड निर्यात वाढली. निर्यातीचे सौदे सध्या चांगले होत आहेत. ही बाब सोयाबीन बाजाराला आधार देणारी आहे. त्यामुळं देशातील सोयाबीन दर सध्याच्या दरपातळीवरून कमी होण्याची शक्यता नाही. मात्र सोयाबीन बाजाराला आधार मिळाला तर सोयाबीनचे दर वाढू शकतात. यंदा शेतकऱ्यांना किमान सरासरी ५ हजार ते ६ हजारांच्या दरम्यान मिळू शकतो. त्यामुळं टप्प्याटप्यानं आणि बाजाराची माहिती घेऊन सोयाबीन विक्री फायदेशीर ठरेल.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Sugar Rate : वाढत्या उन्हामुळे साखरेला मागणी, दरातही वाढ

Food Security Scheme : अन्नसुरक्षा योजनेत पुरवल्या अप्रमाणित निविष्ठा

Jowar Market : पंचवीस हजार क्विंटल ज्वारीची कमी दराने विक्री

Heat Wave Maharashtra : उन्हाच्या चटक्याने राज्य होरपळले

Mahavitaran : ‘महावितरण’च्या यंत्रचालक, तंत्रज्ञांचा विशेष गौरव

SCROLL FOR NEXT