Chana Sowing  Agrowon
ॲग्रोमनी

Chana Sowing : हरभरा पेरणीचा वेग मंदावला?

आठवडाभरात केवळ ९ लाख हेक्टरवर शेतकऱ्यांनी हरभऱ्याची पेरणी केल्याचं सरकारच्या आकडेवारीवरून स्पष्ट होते.

Team Agrowon


पुणे : देशातील हरभरा पेरणीचा (Chana Sowing) वेग मागील आठवडाभरात कमी झाला आहे. मागील आठवड्यात हरभरा पेरणी गेल्यावर्षीच्या तुलनेत साडेपाच टक्क्याने आघाडीवर होता. मात्र चालू आठवड्यातील केवळ अडीच टक्क्यांनी पेरणी जास्त आहे. आठवडाभरात केवळ ९ लाख हेक्टरवर शेतकऱ्यांनी हरभऱ्याची पेरणी केल्याचं सरकारच्या आकडेवारीवरून स्पष्ट होते.

देशातील रब्बी पेरणी सध्या जोमात सुरु आहे. मागील वर्षभर देशातील बाजारात हरभऱ्याचा दर दबावात होता. आजही हरभऱ्याला हमीभावापेक्षा ५०० ते ६०० रुपयांपर्यंत कमी दर मिळत आहे. त्यामुळे यंदा शेतकरी हरभऱ्याचा पेरा कमी करतील, असा अंदाज व्यक्त केला जात होता. त्याची प्रचितीही सध्या येत आहे. पेरणीच्या पहिल्या टप्प्यात हरभरा क्षेत्र गेल्यावर्षीपेक्षा जास्त दिसत आहे. मात्र शेवटी हरभरा पेरा कमी होण्याची शक्यता निर्माण झाली.

मागील १५ दिवसांमध्ये हरभरा पेरणीचा वेग मागीलवर्षीच्या तुलनेत जास्त होता. २ डिसेंबरपर्यंत हरभरा पेरणी मागीलवर्षी याच काळात झालेल्या लागवडीपेक्षा साडेपाच टक्क्यांनी जास्त होती. मात्र केंद्रीय कृषिमंत्रालयाने आज प्रसिध्द केलेल्या आकडेवारीनुसार हरभरा पेरणीचा वेग कमी झाला. गेल्यावर्षीच्या तुलनेत पेरणीची आघाडी आता अडीच टक्क्यांवर आली.

मध्य प्रदेशात लागवड घटली
गेल्या आठवड्यात हरभरा पेरणी क्षेत्र ८० लाख हेक्टरवर होते, ते आता ८९ लाख हेक्टरवर पोचले. म्हणजेच गेल्या आठवडाभरात देशात केवळ ९ लाख हेक्टरवर हरभरा पेरणी झाली. तर गेल्यावर्षीचं क्षेत्र ८७ लाख हेक्टर होतं. सध्या मध्य प्रदेशातील हरभरा पेरा कमी झालेला दिसत आहे. मध्य प्रदेशात मागील हंगामात याच काळात २२ लाख ५३ हजार हेक्टरवर हरभरा पीक होते. मात्र यंदा १८ लाख ६० हजार हेक्टरवरच लागवड झाली.


महाराष्ट्रातील लागवड आघाडीवर
देशात हरभरा लागवडीत राजस्थान आघाडीवर असते. सध्या राजस्थानमध्ये जवळपास २१ लाख हेक्टरवर लागवड झाली. तर मागील हंगामातील क्षेत्र १९ लाख ४० हजार हेक्टर होते. कर्नाटकातील लागवडही एक लाख हेक्टरने यंदा पुढे आहे. तर महाराष्ट्रात जवळपास ५ लाख हेक्टरने पेरणी आघाडीवर आहे. मागील हंगामात १४ लाख १९ हजार हेक्टरवर आजच्या तारखेपर्यंत लागवड झाली होती. मात्र यंदा क्षेत्र १९ लाख २७ हजार हेक्टरवर पोचली.

बाजरावर परिणाम
हरभरा पेरणीची गती लक्षात घेऊन ग्राहक बाजारात हरभरा दराला आधार मिळताना दिसत आहे. महत्वाच्या मोठ्या बाजारात हरभरा दरात मागील दोन आठवड्यांत क्विंटलमागे १०० रुपयांची सुधारणा झाली. सध्या हरभऱ्याला देशात सरासरी ४ हजार ४०० ते ४ हजार ९०० रुपये प्रतिक्विंटलचा दर मिळतोय. पुढील तीन आठवड्यांमध्ये हरभरा पेरणीचं चित्र कसं राहील, यावर हरभरा दर अवलंबून आहेत, अशी माहिती कडधान्य बाजारातील जाणकारांनी दिली.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Maharashtra Vidhan Sabha Election Results : काँग्रेसच्या दिग्गजांना मोठा धक्का, पृथ्वीराज चव्हाण, थोरात, देखमुखांसह काँग्रेसचे अनेक दिग्गज पिछाडीवर

Climate Change Issue : हवामान बदलाच्या परिणामांना सामोरे जाण्यासाठी हवे ‘हवामान वित्त’

Maharashtra Vidhansabha Result 2024 : लाडकी बहिण योजनेचा महायुतीला फायदा; सोयाबीन दराचा मुद्दा ठरला 'फेल'?

Maharashtra Assembly Election : कोल्हापूर जिल्ह्यातील डझनभर कारखानदारांचे भवितव्य ठरणार, पहिल्या ३ तासांचा काय सांगतो कल

Farmers Exploitation : कोणा सांगाव्या शेतकऱ्यांच्या व्यथा

SCROLL FOR NEXT