Edible Oil
Edible Oil Agrowon
ॲग्रोमनी

Edible Oil : खाद्यतेलाच्या दरात मदर डेअरीकडून १४ रूपयांची कपात

टीम ॲग्रोवन

जागतिक पातळीवर खाद्यतेलाचा पुरवठा (Edible Oil Supply) विस्कळीत झाल्यामुळे दराचा भडका उडाला होता. मात्र आता जागतिक पातळीवर खाद्यतेलाचे दर (Edible Oil Rate) घसरले आहेत. त्याचा फायदा भारतीय ग्राहकांना मिळावा म्हणून केंद्र सरकारने खाद्यतेलाच्या दरात कपात करण्याचे निर्देश बुधवारी (ता.६) खाद्यतेल कंपन्यांना दिले होते. त्यानुसार मदर डेअरीने त्यांच्या धारा ब्रँडच्या खाद्यतेलाचे दर प्रति लिटर १४ रुपयांपर्यंत कमी केले आहेत. त्यामध्ये प्रामुख्याने सोयाबीन रिफाईंड (Sooybean Oil) तेल आणि राईसब्रान रिफाईंड (Rice Bran Oil) तेलाचा समावेश आहे.

"सरकारच्या हस्तक्षेपाचा फायदा ग्राहकांना झाला पाहिजे, त्यासाठी धारा सोयाबीन तेल आणि धारा राइसब्रान तेलाची एमआरपी प्रति लिटर १४ रुपयांपर्यंत कमी केली आहे. पुढील आठवड्यापसून या दराने तेल बाजारात उपलब्ध होईल," असं कंपनीच्या प्रवक्त्याने पीटीआयला सांगितले. धारा रिफाईड सोयाबीन तेलाचे दर प्रति लिटर १९४ रूपयांवरून प्रति लिटर १८० रूपये करण्यात आले. तर धारा रिफाइंड राईस ब्रान तेलाचे दर प्रति लिटर १९४ रूपयांवरून १८४ रूपयांवर आले. तसेच पुढील १५-२० दिवसांमध्ये सूर्यफुलाच्या दरांमध्ये किरकोळ कपात होण्याची अपेक्षा आहे.

१६ जून रोजी, मदर डेअरीने खाद्यतेलाचे दर प्रति लिटर १५ रुपये कमी केले होते. मदर डेअरी ही दिल्लीमधील एक प्रमुख दूध पुरवठादार संस्थांपैकी एक आहे. मदर डेअरी दुधासोबतच धारा ब्रँडने मोहरी, सूर्यफूल, राईस ब्रान आणि सोयाबीन तेलाचीही विक्री करते.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Cotton Seed : कपाशीच्या बियाण्यांसाठी तेलंगणाची वारी

Bribe Arrest : निलंबन रद्द करण्यासाठी ५० हजारांच्या लाचेची मागणी

Animal Vaccination : पावसाळ्यापूर्वी जनावरांचे लसीकरण करा

Summer Sowing : दुष्काळी छायेतही २४ हजार हेक्टरवर पेरा

Summer Sowing : यवतमाळच्या शेतकऱ्यांची उन्हाळी तिळाला पसंती

SCROLL FOR NEXT