Soybean Rate Agrowon
ॲग्रोमनी

Soybean Market : शेतकऱ्यांनी सोयाबीन विक्री कमी केली; दरात काहिशी सुधारणा

आज देशातील बाजारात २ लाख ७० हजार क्विंटल सोयाबीन बाजारात आलं होतं.

Anil Jadhao 

Soybean Market Rate : यंदाच्या हंगामात सुरुवातीपासूनच शेतकऱ्यांनी सोयाबीनची विक्री कमी केली. दर नरमल्यानंतर शेतकरी बाजारातील आवकही (Soybean Arrival) कमी करत आहेत.

मागील काही दिवसांपासून सोयाबीन दर (Soybean Rate) नरमले होते. त्यामुळं शेतकऱ्यांनी बाजारातील सोयाबीन विक्रीही कमी केल्याचं दिसलं. सोयाबीन दरात अनेक बाजारांमध्ये क्विंटलमागं ५० ते १०० रुपयांची सुधारणा झाली होती.

देशातील शेतकऱ्यांनी आज सोयाबीनची विक्री काहीशी कमी केली होती. कालच्या तुलनेत आज सोयाबीनची आवक जवळपास १ लाख क्विंटलनं घटली होती. देशातील बाजारात आज २ लाख ७० हजार क्विंटल सोयाबीनची आवक झाली होती.

सोयाबीनचे भाव नरमल्यानंतर शेतकऱ्यांनी बाजारातील आवक कमी केली. चालू हंगामात अगदी सुरुवातीपासूनच शेतकरी सोयाबीन दर नरमल्यानंतर बाजारातील विक्री कमी करत आहेत.

शेतकऱ्यांनी सोयाबीन विक्री कमी केली. मात्र उद्योगांकडून जास्त सोयाबीन पुरवठा आणि कमी मागणीचं कारण देऊन दर दबावात ठेवले जात आहेत.

देशातून आत्तापर्यंत विक्रमी सोयापेंड निर्यात झाली. खाद्यतेल दरही सुधारत आहेत. मात्र तरीही उद्योगांकडून सोयाबीन दर वाढवण्यात आले नाहीत. उद्योगांनी मागील महिनाभरापासून सोयाबीन दर दबावातच ठेवले आहेत.

दर वाढवले नाही तर शेतकरी शेवटी या दरातच सोयाबीन विकतील, अशी भुमिका उद्योगांनी घेतली. त्यामुळं शेतकरी या दरात किती सोयाबीन विकतात, यावर पुढची दिशाही ठरणार आहे.

सोयाबीनला सध्या किमान ५ हजार ५०० रुपये दर मिळण्यास अनुकूल स्थिती आहे. पण यापेक्षा सध्या २०० ते ५०० रुपयाने दर कमी आहेत. 

देशातील सोयाबीन आवक

आज देशातील बाजारात २ लाख ७० हजार क्विंटल सोयाबीन बाजारात आलं होतं. महाराष्ट्रात १ लाख २० हजार क्विंटल, मध्य प्रदेशात १ लाख १० हजार क्विंटल आणि राजस्थानमध्ये २० हजार क्विंटल सोयाबीनची आवक झाली होती. बाजारातील आवक कमी झाल्यानं दरात क्विंटलमागं ५० ते १०० रुपयांची सुधारणा दिसली.

आजची भावपातळी

देशातील महत्वाच्या बाजारांमध्ये आज सोयाबीनचे भाव ५ हजार ते ५ हजार ४०० रुपयांच्या दरम्यान होते. काही बाजारांमध्ये आजही किमान भाव ५ हजारांपेक्षा कमी राहीले.

तर प्रक्रिया प्लांट्सचे भाव ५ हजार ४०० ते ५ हजार ५५० रुपयांच्या दरम्यान होते. बाजारातील आवक कमी झाल्यास किंवा जास्त वाढली नाही तर सोयाबीन दरात आणखी सुधारणा होऊ शकते, असा अंदाज अभ्यासक व्यक्त करत आहेत.

दरवाढीस अनुकूल स्थिती

भारतातून सोयापेंड निर्यात वाढली आहे. त्यामुळं सोयाबीनला मागणी आहे. शेतकऱ्यांनी सोयाबीनची विक्री मर्यादीत ठेवल्यास उद्योगांना दर वाढवावे लागतील. शेतकऱ्यांनी सध्याच्या परिस्थितीत किमान ५ हजार ५०० रुपयांचे टार्गेट ठेवण्यास हरकत नाही.

तर पुढील काळात सोयाबीन दर आणखी सुधारु शकतात. त्यामुळं शेतकऱ्यांनी बाजाराचा आढावा घेऊनच टप्प्याटप्प्यानं सोयाबीनची विक्री करावी, असं आवाहन सोयाबीन बाजारातील अभ्यासकांनी केले आहे.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Banana Crop Insurance: ‘त्या’ केळी विमाधारकांकडून खुलासे मागविणार

Banana Crop Insurance: बारड मंडळातील ३३९ केळी उत्पादकांना परतावा मंजूर

Agrowon Podcast: कांद्याचा भाव दबावातच; कापूस भाव स्थिर, मका आवक स्थिर, तूर स्थिरावली तर पपईच्या भावात उठाव

Avakali Paus: अवकाळी पावसाचा इशारा! फळबागांचे नुकसान टाळण्यासाठी करा तातडीचे व्यवस्थापन

Tapi Mega Recharge Project: तापी मेगा रिचार्ज प्रकल्पाला चालना केव्हा?

SCROLL FOR NEXT