election result
election result 
ॲग्रोमनी

निवडणुकीचा निकाल ॲपवर पाहता येणार

अनिल जाधव

लुधियाना : विधानसभा निकालाची (Assembly Election result) माहिती नागरिकांना घरबसल्या मोबाईलवर मिळणार आहे. विजयी मिरवणुकीचा खर्च हा उमेदवाराच्या निवडणुकीच्या खर्चात सामील केला जाईल, अशी माहिती पंजाबचे मुख्य निवडणूक अधिकारी डॉ.एस करुणा राजू यांनी दिली. 

पंजाबच्या ११७ जागांसाठी २० फेब्रुवारीला मतदान (Voting) झाले आणि येत्या १० मार्चला निकाल लागणार आहेत. पंजाबचे मुख्य निवडणूक अधिकारी राजू हे जिल्ह्यातील स्ट्रॉंग रुमचा आढावा घेत आहेत. लुधियानातील स्ट्रॉंग रुमची तपासणी केल्यानंतर बचत भवन येथे आयोजित पत्रकार परिषदेत राजू म्हणाले, मतमोजणीच्या ठिकाणी सीसीटीव्ही फायर टेंडरची व्यवस्था केली गेली आहे. आयोगाच्या व्यवस्थेवर सर्व पक्ष समाधानी आहेत. मतमोजणी केंद्राच्या परिसरात कडक सुरक्षा व्यवस्था करण्यात येत असून कोणतीही अप्रिय घटना घडणार नाही, याची काळजी घेतली जात आहे. दरम्यान, लुधियाना जिल्ह्यात विधानसभेच्या चौदा जागा असून यंदा भाजप आणि अकाली दल यांची फारकत झाल्याने त्यांनी स्वतंत्र निवडणूक लढली आहे.

व्हिडाओ पाहा -  पंजाबमध्ये तीन ठिकाणी पोटनिवडणुका शक्य

पंजाब विधानसभा निवडणुकीचा निकाल दहा तारखेला लागणार असून त्यानंतर दोन लोकसभा आणि एक विधानसभा मतदारसंघाची पुन्हा पोटनिवडणूक होण्याची शक्यता आहे. शिरोमणी अकाली दलाचे नेते सुखबीर सिंग बादल, आम आदमी पक्षाचे उमेदवार भगवंत मान आणि मुख्यमंत्री चरणजितसिंग चन्नी यांच्यामुळे पोटनिवडणुका होतील. 

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Climate Change : हवामान बदलाचा फळबागेला जोरदार फटका

Indian Politics : गांधींचा वारसा, मोदींचा आरसा

Delhi Farmers' protest : शेतकरी आंदोलनाचा थर्मल प्लांटला फटका; कोळसा पुरवठा बंद, अनेक रेल्वे गाड्या रद्द

Devgad Hapus : बॉक्स देवगड हापूसचा पण आंबा कर्नाटकचा, ग्राहकांची उघड लूट

Market Trend : बाजारकलासाठी हवामान, नवीन सरकारकडे लक्ष

SCROLL FOR NEXT