soyabeen
soyabeen 
ॲग्रोमनी

ब्राझीलमधील सोयाबीन काढणी जोमात

अनिल जाधव

जगातील सोयाबीन उत्पादनात (Soyabean Production) अग्रेसर ब्राझीलमध्ये यंदा उत्पादनात घट येणारे. मात्र येथील काढणीने वेग घेतलाय. येथील सोयाबीन पिकाची संपुर्ण परिस्थिती जाणून घेऊयात.  

1. राज्यात उन्हाचा चटका वाढल्याने कमाल तापमानाचा पारा तिशी पार पोचला आहे. तर किमान तापमानात (Temperature) वाढ होत असल्याने थंडी कमी होऊ लागली आहे. उद्या राज्याच्या किमान तापमानात ३ ते ४ अंशांची वाढ होण्याची शक्यता हवामान विभागाने वर्तविली आहे. पूर्वेकडून वाहणाऱ्या वाऱ्यामुळे अंदमान बेटांजवळ असलेल्या हवेच्या कमी दाबाचा पट्ट्याचे चक्राकार वाऱ्यात रुपांतर झाले असून ही स्थिती दक्षिण अंदमान समुद्रात आहे. गुजरात आणि परिसरावर असलेची चक्राकार वाऱ्यांची स्थिती निवळून गेली आहे. राज्याच्या अनेक भागात अंशतः ढगाळ हवामान झाले होते. राज्यात मुख्यतः कोरड्या हवामानाचा अंदाज हवामान विभागाने वर्तविला आहे.

2. ब्यूनस आयर्स ग्रेन्स एक्सचेंजने अर्जेंटीनातील मका उत्पादनात  घट होण्याचा अंदाज व्यक्त केलाय. येथे यंदा ७३ लाख हेक्टवर पेरणी झालीये. तर उत्पादन ५१० लाख टनांवर पोचण्याचा अंदाज व्यक्त केलाय. उत्पादनाचा हा अंदाज गेल्यावर्षीच्या तुलनेत १५ लाख टनांनी कमीये. येथील आगाप लागवडीची काढणी सुरु झाली असून मिळणाऱ्या उत्पादकतेनुसार अंदाजात कपात करण्यात आलीये. ब्यूनस आयर्स ग्रेन्स एक्सचेंच्या मते अर्जेंटीनातील २८ टक्के पीक चांगल्या स्थितीतये. तर सर्वसाधारण पीक क्षेत्र ४७ टक्क्यांवरये. 

३. पामतेलाचे (Palm Oil) दर तेजीत असल्याने देशात आयात घटली आहे. नोव्हेंबर २०२१ ते जानेवारी २०२२ या काळात देशात ३६ लाख टन खाद्यतेल आयात झाली. मागील वर्षी याच काळातील आयातीपेक्षा एक लाख टनाने अधिकये. देशात रिफाईंड पामतेलाची आयात गेल्यावर्षीच्या १६ हजार टनांवरून २ लाख १७ हजार टनांवर पोचलीये. तर कच्च्या पाम तेलाची आयात २१ लाख टनांवरून १४ लाख टनांवर आली. तर दुसरीकडे कच्च्या सूर्यफूल तेल साडेसहा लाख टनांवर सात लाख टनांवर आयात झाले. कच्चे सोयाबीन तेल आयातही सात लाख टनांवर १२ लाख ५८ हजार टनांवर पोचली. म्हणजेच देशातील आयातदारांनी कच्च्या पामतेलाऐवजी कच्चे सोयाबीन आणि सूर्यफूल तेल आयातीला पसंती दिली, असे स्पष्ट होते.

व्हिडाओ पाहा -  

४ . देशातील साखर कारखान्यांनी (Suger Industries) ऑक्टोबर ते जानेवारी या चार महिन्यांत ४० लाख टन साखर निर्यातीचे करार केले आहेत. यापैकी तब्बल २६ लाख ५० हजार टन साखरेची निर्यातही (Suger Export) झाली. मागील हंगामात देशातून ७० लाख टन साखर निर्यात झाली होती. सध्या कारखाने अनुदान नसतानाही साखर निर्यात करत आहेत. चालू हंगामात ५० ते ६० लाख टन साखर निर्यातीचे उद्दीष्ट आहे. हे उद्दीष्ट साध्य झाल्यास मोठा दिलासा मिळेल. शेतकऱ्यांना त्यांची देणी वेळेत मिळावी यासाठी सरकार कारखान्यांना प्रत्यक्ष किंवा अप्रत्यक्ष मदत करत आहे, असे नुकतेच केंद्रीय अन्न आणि ग्राहक संरक्षण राज्य मंत्र्यांनी सांगितले. २०२१ मध्ये आंतरराष्ट्रीय बाजारात साखरेचे दर तेजीत होते. त्यामुळे देशातून मोठी निर्यात झाली. तर देशात चालू हंगामात ३१४ लाख टन साखर उत्पादनाचा अंदाज व्यक्त केला जात आहे. 

5. ब्राझीलमध्ये (Brazil) यंदा सोयाबीन उत्पादनात घट येण्याचा अंदाज आहे. दक्षिण ब्राझीलमध्ये भयंकर दुष्काळी स्थितीये. त्यामुळे येथील उत्पादन १ हजार २८५ लाख टनांवर स्थिरावेल, असे येथील एका संस्थेने म्हटलंय.  येथील पराना आणि रिओ ग्रॅंडे डो सूल राज्यांत पिकाला सर्वाधिक फटका बसलाय. सध्या ब्राझीलमधील सोयाबीन काढणी सुरु झाली आहे. आत्तापर्यंत २५ टक्के मालाची काढणी पूर्ण झाली. मागील आठवड्यात सोयाबीन काढणी १६ टक्क्यांवर होती. तर मागील वर्षी याच काळात १०.१ टक्के सोयाबीनची काढणी झाली होती. ब्राझीलमधील महत्वाच्या सोयाबीन उत्पादक राज्य माटो ग्रासोमध्ये काढणीने जोर घेतला आहे. येथील शेतकऱ्यांनी आत्तापर्यंत ६० टक्के पीक कापणी केली. तसेच मागील आठवड्याभरापासून पाऊस सुरु आहे. मात्र पावसाने पिकाचे नुकसान होईल म्हणून शेतकऱ्यांनी काढणी थांबविली नाही. तर रिओ ग्रॅंडे डो सूल या राज्यात दुष्काळी स्थिती बिकट होत चाललीये. येथील जवळपास ७५ टक्के पीक फुलोरा आणि शेंगा लागणीच्या अवस्थेत आहे. रोंडोनिया आणि मिनास गेराइ भागात सोयाबीनमध्ये ओलावा अधिक येत आहे. पराना राज्यात ६४ टक्के सोयाबीन पीक खराब किंवा सर्वसाधारण अवस्थेत आहे. पराना राज्यात सरासरी उत्पादकता खुपच कमीये. तर पश्चिम आणि नैऋत्य भागात पाऊस आणि उष्णतेमुळे पिकाला मोठा फटका बसलाये. ब्राझीलमधील ३० टक्के पीक पक्वतेच्या अवस्थेत आहे. ३१ टक्के शेंगा धरणीच्या तर १० टक्के पीक फुलोऱ्यात आहे, असे येथील सरकारी संस्था कोनाबने सांगितले. 

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Fire In MP Forest : धुमसणाऱ्या उत्तरराखंडमुळे मध्यप्रदेश अलर्ट; थेट कारवाई करण्याचे संकेत

Uttarakhand Forest Fire : धुमस्ते उत्तराखंड!; नैनितालनंतर गढवालपासून कुमाऊंपर्यंत जंगलात ४० ठिकाणी वणवा

Dairy Record Keepnig : दुग्धव्यवसायात नोंदी ठेवण्याचे फायदे

Maharudra Mangnale : निव्वळ कोरडवाहू शेती ही शेती नाहीच! 

Indrjeet Bhalerao : तांदूळवाडी ते मेरठ : एका प्रज्ञेचा प्रवास

SCROLL FOR NEXT