Soybean and Cotton
Soybean and Cotton 
ॲग्रोमनी

सोयाबीन आणि कापसाचे मराठवाडा, विदर्भातील आजचे बाजारभाव

टीम ॲग्रोवन

विदर्भ सोयाबीन बाजारभाव - अकोला बाजारात सोयाबीनची आज 3122 क्विंटल आवक झाली. आवक झालेल्या सोयीबनला आज किमान 5500 रुपये तर कमाल 7250 रुपये दर मिळालाय. तर सर्वसाधारण दर 6500 हजार रुपयांवर होता. तर चिखली बाजारात सोयाबीनची 1985 क्विंटल आवक झाली असून किमान भाव 6270 रुपये होता. तर कमाल भाव 6900 रुपयांचा मिळालाय. या मालाला सर्वसाधारण 6585 चा भाव मिळालाय. त्यामुळे विदर्भातल्या मुख्य बाजारांमध्येही सोयाबीनची पडझड झाल्याचं आज दिसलं. तसंच NCDEX वरील माहितीप्रमाणे अकोला केंद्रावर FAQ दर्जाच्या सोयाबीनला आज 7,323 रुपयांचा भाव मिळालाय. तर त्याचबरोबर नागपूर केंद्रावर 7,322 रुपयांचा दर  मिळाल्याचं NCDEX च्या वेबसाईटवरून कळतं.

मराठवाडा सोयाबीन बाजारभाव -  आज लातूर बाजारात 10484 क्विंटल सोयाबीन आलं होतं. या मालाचे भाव किमान 6500 रुपये ते कमाल 7051 रुपयांच्या दरम्यान राहिले. तसंच आवक मालाचे सर्वात जास्त व्यवहार 6900 रुपयांनी झालेत. त्यामुळे सोयाबीनचे भाव इथं रिव्हर्स येत असल्याची स्थिती आहे. पुढे हिंगोली बाजारात 1400 क्विंटल सोयाबीन आवक झाली. या मालाला किमान 6250 तर कमाल 6820 रुपयांचा दर मिळालाय. इथं सर्वसाधारण दर 6535 रुपयांचा राहिलाय. दुसरीकडे अंबेजोगाई बाजारात सोयाबीनच्या आवक मालाला किमान 6380 रुपये तर कमाल 6900 रुपयांचा दर होता. तर सर्वसाधारण दर 6770 होता.

हा व्हिडिओ पाहिलात का? : 

राज्यातील कापूस बाजारभाव - आज राळेगाव बाजारात कापसाची 2800 क्विंटल आवक झाली. या मालाला किमान 8500 तर कमाल 9900 रुपयांचा दर मिळालाय. तर सर्वसाधारण दर 9800 चा होता. त्यानंतर परभणी बाजारात कापसाची फक्त 300 क्विंटल आवक झाली. आवक मालाला कमीत कमी 6400 तर जास्तीत जास्त 6900 रुपयांचा दर मिळालाय. तसंच सर्वसाधारण दर 6700 चा होता. तसंच हिंगोली बाजारात आलेल्या 60 क्विंटल कापसाला 9550 ते 9850 रुपयांचा भाव देण्यात आला. या मालाचा सर्वसाधारण भाव 9700 रुपये होता. तसंच जामनेर बाजारात फक्त 22 क्विंटल कापूस आला होता. त्याला किमान 7850 तर कमाल 9570 रुपये क्विंटलच्या दरम्यान भाव मिळाला. या मालाचे सर्वात जास्त व्यवहार 9500 रुपये क्विंटलनं झाले.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Maharashtra Rain : सोमवारपासून पुन्हा पावसाचा अंदाज; राज्यातील बहुतांशी भागात ऊन आणि उकाडा वाढण्याची शक्यता

Kharif Planning Review Meeting : आठ लाख हेक्टरवर खरीप पेरण्यांचे नियोजन

Banana Farming Management : सिंचन, खत व्यवस्थापनावर भर

Kokan Development : कोकणातील आंबा पिकासाठी स्वतंत्र मंडळ स्थापणार

Indian Agriculture : शेतातील सेंद्रिय पदार्थाचे पुनर्चक्रीकरण

SCROLL FOR NEXT