Wheat Prices Agrowon
ॲग्रोमनी

Wheat Prices : विक्रमी गहू उत्पादनानंतरही भाव नियंत्रणासाठी सरकार आक्रमक का?

Anil Jadhao 

Wheat Market : केंद्र सरकारने यंदा देशात विक्रमी गहू उत्पादनाचा अंदाज जाहीर केला होता. पण तरीही बाजारात गव्हाचे भाव वाढू नये यासाठी ऐन आवकेच्या हंगामातच स्टाॅक लिमिट लावण्याची वेळ आली. तसेच जून महिन्यातच खुल्या बाजारात १५ लाख टन गहू विक्रीचा निर्णयही सरकारने घेतला.

देशातील बाजारात गव्हाच्या दरातील वाढ सरकारची डोकेदुखी ठरत आहे. महिनाभरात गव्हाच्या भावात तब्बल ८ टक्क्यांची वाढ झाली होती. देशातील अनेक बाजारात गव्हाने २ हजार ३०० रुपयांचा टप्पा गाठला होता.

ऐन हंगामातच ही दरवाढ झाली. गव्हाची काढणी झाल्यानंतर एप्रिल ते जून हे तीन महिने गहू आवकेचे मानले जातात. म्हणजेच या तीन महिन्यांमध्ये शेतकरी गहू विकत असतात. पण नेमकं याच काळात दरवाढ होत असल्यामुळे सरकारने १२ जून रोजी प्रक्रियादार, स्टाॅकीस्ट आणि व्यापाऱ्यांवर स्टाॅक लिमिट लावले.

तब्बल १६ वर्षानंतर सरकारवर स्टाॅक लिमिट लावण्याची वेळ आली. तसेच २८ जून रोजी १५ लाख टन गहू विकण्याचा निर्णयही सराकरने घेतला.

विशेष म्हणजे यंदा गव्हाचे विक्रमी १ हजार १२७ लाख टन उत्पादन झाल्याचा दावा केंद्राने केला होता. पण तरीही गव्हाच्या दरातील वाढ कायम आहे. देशात २०२४ मध्ये लोकसभा निवडणुका होत आहेत. त्यामुळे सरकारला गहू आणि तांदळासह धान्याच्या दरात होणारी वाढ डोकेदुखी ठरत आहे.

ऐन आवकेच्या काळात गव्हाचे दर वाढल्याने पुढील पीक बाजारात येईपर्यंत आणखी वाढ होण्याची शक्यता आहे. त्यामुळे यंदा विक्रमी उत्पादनाचा अंदाज व्यक्त केला तरी सरकारला दर नियंत्रणासाठी प्रयत्न करावे लागत आहेत.

सरकारने यंदा १ हजार १२७ लाख टन उत्पादनाचा अंदाज व्यक्त केला. मात्र उद्योगांच्या मते उत्पादन १ हजार २८ लाख टनांवर स्थिरावले आहे. तसेच जवलपास १३ ते १४ लाख टन पीक एप्रिल महिन्यातील पाऊस आणि गारपीटीने वाया गेले, असेही उद्योगांचे म्हणणे आहे.

देशात यंदा १ हजार टन गहू वापर होण्याची शक्यता आहे. पण अमेरिकेच्या कृषी विभागाने भारताचा गहू वापर १ हजार ८१ लाख टनांवर पोचला असे म्हटले आहे. त्यामुळे देशात यंदा तुटवडा निर्माण होणार की अतिरिक्त पुरवठा आहे, हे आताच स्पष्ट झाले नाही.

गव्हाच्या भावात होणारी सुधारणा सुरुच आहे. २९ मे रोजी गव्हाचा सरासरी भाव २ हजार २७७ रुपये प्रतिक्विंटलवर होता. तो आता २ हजार ३०० रुपयांवर पोचला. बाजारात केवळ पुरवठा कमी झाला म्हणून दरात सुधारणा झाली असे नाही. सरकारने याआधी कल्याणकारी योजनांमधून गव्हाऐवजी तांदळाचा पुरवठा करण्याचे सूचवले होते.

तसेच नागरिकांनी गव्हाऐवजी तांदळाचा वापर वाढवावा असे आवाहन केले होते. सरकारने रेशन आणि इतर योजनांसाठी तांदळाचा पुरवठा वाढवून गव्हाचा पुरवठा ७ लाख टनांनी कमी केला होता. पण रेशनवर कमी गहू मिळाल्याने लोकांनी खुल्या बाजारातून गहू घेतला. यामुळे दरवाढीला आधार मिळाला होता.

सरकार गव्हाचे भाव नियंत्रणात ठेवण्यासाठी खुल्या बाजारात गव्हाची विक्री करणार आहे. त्यासाठी सरकार २ हजार १२५ रुपये संरक्षित किंमत ठेवणार आहे. म्हणजेच किमान या किमतीला गहू विकला जाईल. पण यापुर्वी सरकारने सहा वेळा गहू विकला तेव्हा लिलावासाठी व्यापाऱ्यांनी या किमतीपेक्षा जास्तच बोली लावली होती.

म्हणजेच सरकार बाजारात आणत असलेल्या गव्हाचे भावच सध्याच्या बाजारभावाऐवढे असू शकतात. त्यामुळे सरकारच्या उद्देशालाच हादरा बसू शकतो, असे जाणकारांनी सांगितले.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Kharif Crop Damage : परतीच्या पावसाने राज्यातील ३० हजार हेक्टरवरील पिके नष्ट

Rain Update : सावंतवाडी, मडूरामध्ये १०७ मिलिमीटर पाऊस

Agrowon Exhibition 2024 : सांगलीत आजपासून ‘ॲग्रोवन’चे कृषी प्रदर्शन

Soybean Rate : भविष्यात सोयाबीनलाही मिळेल दरातील तेजीची झळाळी

Weather Forecast : राज्यात वादळी पावसाचा अंदाज कायम

SCROLL FOR NEXT