Commercial Goods Export Agrowon
ॲग्रोमनी

भारत बनला लोकल टू ग्लोबल; व्यापारी वस्तूंच्या निर्यातीचं लक्ष्य पार

चालू आर्थिक वर्षात भारतातील व्यापारी मालाची निर्यात ४१७.८ अब्ज डॉलर्सवर पोहोचली आहे. केंद्रीय वाणिज्य मंत्री पीयूष गोयल यांनी रविवारी (ता.३) ही माहिती दिली.

टीम ॲग्रोवन 

चालू आर्थिक वर्षात भारतातील व्यापारी मालाची निर्यात (Export Of Commercial Goods) ४१७.८ अब्ज डॉलर्सवर पोहोचली आहे. केंद्रीय वाणिज्य मंत्री (Union Commerce Minister) पीयूष गोयल (Piyush Gpyal) यांनी रविवारी (ता.३) ही माहिती दिली. निर्यातीचा हा आकडा नॉन-ईडीआय (Non-EDI ports) पोर्ट्समधील आकडे वगळून आहे. हा आकडा गृहीत धरल्यास निर्यात ४१८ अब्ज डॉलरच्यावर जाण्याची शक्यता आहे. जो भारताच्या निर्यात इतिहासातील आतापर्यंतचा उच्चांक आहे. त्यामुळे भारत खऱ्या अर्थाने 'लोकल टू ग्लोबल' (Local To Global) झाला आहे, असेही गोयल यावेळी म्हणाले.

भारताने मार्च २०२२ मध्ये उच्चांकी ४०.३८ अब्ज रुपयांच्यावर व्यापारी मालाची निर्यात (Commercial Goods Export) केली आहे. मागील वर्षी याच कालावधितील ३५.२६ अब्ज डॉलर्सच्या तुलनेत यंदा निर्यातीत १४.५३ टक्क्यांची वाढ झाली आहे. तर मार्च २०२० मधील २१.४९ अब्ज डॉलर्सच्या तुलनेत निर्यातीत ८७.८९ टक्क्यांची वाढ झाली आहे.

एप्रिल २०२१ ते मार्च २०२२ या आर्थिक वर्षात नॉन-पेट्रोलियम वस्तूंच्या निर्यातीतही मोठी वाढ झाल्याचे गोयल यांनी सांगितले आहे. यावर्षी नॉन-पेट्रोलियम वस्तूंची निर्यात ३५३.७६अब्ज डॉलर्सपेक्षा जास्त झाली आहे. मागील वर्षीच्या (एप्रिल २०२० ते मार्च २०२१) २६६ अब्ज डॉलर्सच्या तुलनेत निर्यात ३२.६६ टक्क्यांनी वाढली आहे.

पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) यांनी केलेल्या आवाहनाला प्रतिसाद देत भारत 'लोकल टू ग्लोबल' झाला आहे. भारत ज्या गतीने आत्मनिर्भरता (Aatmnirbhar Bharat ) साधत आहे, त्याचा प्रत्येक भारतीयाला अभिमान वाटला पाहिजे, असे गोयल म्हणाले. हे उद्दिष्ट साध्य करण्यासाठी शेतकरी, उद्योजक, एमएसएमई आणि राज्य सरकार या अर्थव्यवस्थेतील (India's Economy) प्रत्येक घटकांनी एकत्र काम केल्याचंही गोयल यांनी म्हटले आहे.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Monsoon Update : मॉन्सूनचा वेगवान प्रवास; मुंबई गाठली, विदर्भात वर्ध्यापर्यंत मजल

Livestock Fodder Management: कमी पावसाच्या परिस्थितीत शाश्‍वत चारा व्यवस्थापन

Kharif Sowing 2026 : देशात कापूस, सोयाबीन, ऊस, भात लागवड पिछाडीवर; भरडधान्य, तूर, मक्याची आघाडी

Farm Loan Waiver: कर्जमाफीचा लाभ शेतकऱ्यांच्या बँक खात्यात हस्तांतरित करण्यासाठी तयारी सुरु

Khoya Production Mechanization: खवा उत्पादनातील यांत्रिकीकरण

SCROLL FOR NEXT