Tur Market
Tur Market Agrowon
ॲग्रोमनी

Tur Market Rate : आयात तुरीचे दरही तेजीत; देशातील बाजाराला आधार, तेजी कायम राहणार

Anil Jadhao 

Tur Bajarbhav : देशात तुरीचे उत्पादन घटल्यानंतर आयात करून तुरीचा पुरवठा वाढविण्याचे उद्दीष्ट सरकारने ठेवले होते. पण निर्यातदार देशांमध्येही तुरीचे भाव तेजीत आल्याने सरकारच्या मनसुब्यावर पाणी फिरताना दिसत आहे. आयात तुरीही तेजीत असल्याने देशातील बाजाराला आधार मिळत आहे.

भारत लोकसंख्येच्या बाबतीत जगात पहिल्या क्रमांकावर पोचला. त्यामुळे अन्नधान्याची गरजही मोठी आहे. भारत आता जगातील सर्वात मोठा ग्राहक ठरला. देश काही शेतीमालाच्या उत्पादनात आत्मनिर्भर झाला. तर काही मालाची आयात करावी लागते.

देशात कडधान्याचे उत्पादन वाढले. पण ते वाढती मागणी पूर्ण करू शकत नाही. त्यामुळं भारताला कडधान्याची आयातही करावी लागते. सहाजिकच मोठा ग्राहक असल्यानं भारताची आयात वाढली की आंतरराष्ट्रीय बाजारात त्या मालाचे दर वाढतात. सध्या तुरीच्या बाबतीत हाच अनुभव येत आहे.

देशात यंदा तुरीच्या उत्पादनात मोठी घट झाली. सरकारने यंदा ३६ लाख टन तूर उत्पादनाचा अंदाज व्यक्त केला. पण उद्योगांच्या मते देशातील उत्पादन ३० लाख टनांच्या दरम्यानच आहे. बाजारातील स्थिती पाहता हा अंदाज खरा वाटतो.

मागील हंगामातील शिल्लक साठाही नगण्य पातळीवर आहे. त्यामुळे तुरीच्या दारत तेजी आहे. तुरीचे दर कमी करण्यासाठी केंद्र सरकार आयातीवर जोर देत आहे. पण भारताची गरज लक्षात घेऊन आफ्रिका आणि म्यानमारमध्येही तुरीच्या दरात वाढ झाली.

म्यानमारमधील तुरीचे भाव

म्यानमारमध्ये १ मार्च रोजी तुरीचा निर्यातीसाठीचा भाव ९५० डाॅलर प्रतिटन होता. तो एप्रिल महिन्यात १ हजार डाॅलरवर पोचला. त्यानंतर तुरीच्या दरात सतत वाढ झाली. सोमवारी म्यानमारमधून आयातीसाठी प्रतिटन १ हजार ८० डाॅलर मोजावे लागले.

भारताची गरज लक्षात घेऊन म्यानमारमधील स्टाॅकिस्ट आणि व्यापारी माल मागं ठेऊन दरवाढ करत आहेत. तसचं काही भारतीय आयातदार कंपन्याही इतर देशांमध्ये तुरीचा स्टाॅक ठेवत आहेत. परिणामी आयात तुरीचे भाव देशातील दरापेक्षा जास्तच पडत आहेत.

देशातील दरपातळी

सध्या देशात तुरीला सरासरी ८ हजार ते ९ हजार १०० रुपये भाव मिळत आहे. देशातील बााजरातील दैनंदीन आवक खूपच कमी आहे. उद्योगांना केवळ प्रक्रियेसाठी माल मिळत आहे. उद्योगांकडे तुरीचा साठाही कमी आहे.

त्यामुळे तुरीच्या दरातील तेजी पुढील काळातही कायम राहील, असा अंदाज जाणकारांनी व्यक्त केला.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Kharif Sowing : सांगली जिल्ह्यात अडीच लाख हेक्टरवर होणार खरिपाचा पेरा

Jal Jivan Mission : निधी खर्च केला, पण गावांत पाणीच नाही

Maharudra Mangnale : कडूनिंबांशी दोस्ती ! : महारुद्र

Illegal Cotton Seed : ३१ लाखांचे अवैध एचटीबीटी कापूस बियाणे जप्त

Food Safety India : एफएसएसएआयचा 'कॅल्शियम कार्बाइड'च्या वापराबाबत इशारा; वापर टाळण्याच्या केल्या सूचना

SCROLL FOR NEXT