soybean agrowon
ॲग्रोमनी

Soybean Market Rate : भारताने आतापर्यंत किती सोयापेंड निर्यात केली?

Soybean Bazarbhav : हंगामाच्या सुरुवातीला महत्वाच्या आयातदार देशांमध्ये सोयापेंडला चांगली मागणी होती.

Team Agrowon

Soyameal Rate : हंगामाच्या सुरुवातीला महत्वाच्या आयातदार देशांमध्ये सोयापेंडला चांगली मागणी होती. व्हीएतनाम आणि बांगलादेश हे भारताच्या सोयाबीनचे मुख्य ग्राहक आहेत. या दोन्ही देशांकडून यंदा सोयापेंड खरेदी वाढली. यामुळे भारतातून यंदा सोयापेंड निर्यातीक मोठ्या प्रमाणात वाढ झाली.

भारताने ऑक्टोबर ते एप्रिल या सात महिन्यांच्या काळात जवळपास १४ लाख टन सोयापेंड निर्यात केली. मागील हंगामात ५ लाख टनांची निर्यात केली होती. म्हणजेच यंदा भारताची सोयापेंड निर्यात १७४ लाख टनांनी वाढली होती.

देशातील सोयाबीन हंगाम यंदा सकारात्मक ठरत आहे. पण शेतकऱ्यांना अपेक्षित दर मिळत नसल्याने चिंता कायम आहे. देशात यंदा सोयाबीनचे गाळप वाढून सोयापेंड निर्मिती वाढेल, तसेच सोयापेंड निर्यातही वाढण्याचा अंदाज सोपाने व्यक्त केला.

देशातील पशुखाद्य उद्योगाकडूनही सोयापेंडला यंदा चांगली मागणी राहीली. पशुखाद्य उद्योगाकडून सोयापेंडचा वापर १२ टक्के वाढ झाली होती. यंदाच्या हंगामात पहिल्या सात महिन्यांमध्ये पशुखाद्य उद्योगाकडून ३८ लाख टनांचा वापर झाला. तर मागील हंगामात याच काळातील वापर ३४ लाख टनांवर होता.

मानवी खाद्यातही सोयापेंडचा वापर चांगला वाढला. खाद्य क्षेत्राकडून सोयापेंडचा जवळपास ६ लाख टनांचा वापर झाला. तर गेल्याहंगामात याच काळातील वापर ५ लाख टन होता. म्हणजेच मानवी आहारात सोयापेंड वापर २४ टक्क्यांनी वाढला होता.

सोयापेंडला मागणी वाढल्याने सोयापेंड निर्मितीत वाढ झाली. गेल्या हंगामात सात महिन्यांमध्ये ३९ लाख टन सोयापेंडची निर्मिती झाली होती. ती यंदा ५७ लाख ४३ हजार टनांवर पोचील. म्हणजेच सोयापेंड निर्मितीत ४७ टक्क्यांची वाढ झाली होती.

सोयापेंडसाठी सोयाबीनलाही उठाव होता. सोयाबीनची बाजारातील आवकही चांगली झाली. गेल्या हंगामात सात महिन्यांमध्ये ६६ लाख टनांची आवक झाली होती. ती यंदा ८४ लाख टनांवर पोचली.

सोयाबीन गाळपाची गती पाहता सोपाने यंदाच्या सोयाबीन गाळपाच्या अंदाजातही वाढ केली. सोपाने यापुर्वी देशात १०० लाख टनांचे गाळप होईल, असा अंदाज व्यक्त केला होता. पण आता सोयाबीन गाळप १०५ लाख टनांवर पोचेल, असा अंदाज जाहीर केला.

तसेच सोयापेंड निर्यातीच्या अंदाजातही बदल करण्यात आला. यापुर्वी सोपाने १४ लाख टन सोयापेंड निर्यातीचा अंदाज व्य्क्त केला होता. त्यात बदल करून यंदा १७ लाख टन सोयापेंड निर्यातीचा अंदाज व्यक्त करण्यात आला.

देशातून सोयापेंड निर्यात यंदा वाढणार आहे. त्यामुळे सोयाबीनचे गाळपही वाढेल, असा अंदाज आहे. सोयाबीनचे भाव देशातील बाजारात दोन महिन्यांपासून दबावात आहेत. सोयाबीनला सध्या प्रतिक्विंटल ५ हजार ते ५ हजार ३०० रुपयांचा भाव मिळतोय. सोयाबीनचे भाव पुढील काही दिवस टिकून राहतील, असा अंदाज जाणकारांनी व्यक्त केला.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Orange Crop Insurance: आंबिया बहर संत्रा फळपिकासाठी विमा योजना

Modern Fruit Farming: शेतीतच भविष्य शोधलेला‘बायोकेमिस्ट्री’चा तरुण

Minimum Support Price: आधारभूत किमतीपेक्षा कमी दराने खरेदीचा प्रश्न ऐरणीवर

Crop Damage Compensation : जालना जिल्ह्यात १८५ कोटी नुकसाभरपाईची मदत वाटप

Farmers FPO: शेतकऱ्यांचा विश्‍वास हेच भांडवल ठरलं मोलाचं !

SCROLL FOR NEXT