Wheat Stock
Wheat Stock Agrowon
ॲग्रोमनी

Wheat Price:हफेडकडून केली जाणार गव्हाची खुल्या बाजारात विक्री

Team Agrowon

हरियाणा स्टेट कोऑपरेटिव्ह सप्लाय अँड मार्केटिंग फेडरेशनने (Hafed- हफेड) मंगळवारी ( ९ ऑगस्ट) १ लाख टनांहून अधिक गहू खुल्या बाजारात विक्रीसाठी उपलब्ध करण्याचा निर्णय घेतला. जुलैपासून सुरु असलेली गव्हाची दरवाढ लक्षात घेता देशांतर्गत बाजारातील गव्हाचे दर नियंत्रणात आणण्यासाठी सरकारकडून प्रयत्न सुरु आहेत.

गव्हाचे दर नियंत्रणात आणण्यासाठी केंद्र सरकारवर दबाव वाढत आहे. देशांतर्गत बाजारात गव्हाचे दर (Wheat Price) वाढत असल्यामुळे प्रक्रिया उद्योगाने केंद्र सरकारकडे लॉबिंग सुरू केलेय. देशांतर्गत बाजारात गव्हाच्या दरात १० टक्क्यांची वाढ झाल्यामुळे सरकार सावध झाले आहे. गव्हाची उपलब्धता वाढावी आणि दर नियंत्रणात राहावेत, यासाठी उपाययोजना करण्याची ग्वाही सरकारने दिली आहे.

या पार्श्वभूमीवर चालू रब्बी हंगामात शेतकऱ्यांकडून हमीभावाने (MSP) खरेदी केलेला गहू खुल्या बाजारात आणण्याचा निर्णय हरियाणा स्टेट कोऑपरेटिव्ह सप्लाय अँड मार्केटिंग फेडरेशनने घेतलाय.मार्च ते एप्रिल दरम्यानच्या उष्णतेच्या लाटेमुळे गहू उत्पादनाचे अंदाज फसले. सुरुवातीला जगाची भूक भागवण्याची मनीषा बाळगणाऱ्या केंद्र सरकारने गहू निर्यातबंदीचा (Wheat Export Ban) निर्णय घेतला.

त्यानंतर जुलैपासून देशांतर्गत बाजारातील गव्हाचे दर सातत्याने वाढत आहेत. मागच्या आठवड्यात रोलर मिल्स फेडरेशन ऑफ इंडिया (RFMFI- आरएफएमएफआय) या संघटनेच्या शिष्टमंडळाने केंद्रीय अन्न मंत्रालयाचे सचिव सुधांशु पांडे यांची भेट घेतली. देशात गव्हाचे दर वाढत असल्याबद्दल शिष्टमंडळाने चिंता व्यक्त केली.

गव्हाचे दर नियंत्रणात आणण्यासाठी केंद्र सरकारवर दबाव वाढत आहे. दिवाळी आणि दसरा या सणांच्या दिवसात गव्हाच्या दरवाढीचा फटका बसण्याची शक्यता असून त्यासाठी सरकारकडून काही उपाय राबवल्या जात आहेत.दरवाढ नियंत्रणासाठी प्रयत्न करणाऱ्या केंद्र सरकारने गव्हाचे पीठ, मैदा आणि रव्याच्या निर्यातीवर मर्यादा घातली.

हफेडकडून (Hafed) दरवर्षी हमीभावाने (MSP) ५० हजार टन गहू खरेदी केला जातो. यावर्षी निर्यातीच्या उद्देशाने हफेडने २ लाख टनांहून अधिक गव्हाची खरेदी करण्याचा निर्णय घेतला होता. त्यामुळे हफेडकडे पुरेशा प्रमाणात गहू उपलब्ध आहे.

रशिया-युक्रेन युद्धामुळे (Ukraine-Russia war) निर्माण झालेल्या धान्य टंचाईच्या पार्श्वभूमीवर अनेक परदेशी व्यापाऱ्यांनी हफेडकडे गव्हाची विचारणा केली आहे. निर्यातीसाठी म्हणून हरियाणा आणि मध्य प्रदेशातून खरेदी केलेला १ लाख ४२६८ टन गहू खुल्या बाजारात विक्रीसाठी आणण्यात येणार असल्याचे हफेडच्या अधिकाऱ्यांनी म्हटले.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Soil Health : शेतीतून शाश्वत उत्पादन मिळण्यासाठी मृदा आरोग्य जपा

Natural Resource : निसर्गसंपदा वाचविण्याची अनोखी चळवळ

Goat Rearing : शेळीपालनात अभ्यासपूर्ण व्यवस्थापनाला प्राधान्य

Agriculture Corporation : महामंडळातर्फे शेतीमालाचे वितरण

Poultry Chicken Management : कोंबड्यांच्या व्यवस्थापनात बदल आवश्यक

SCROLL FOR NEXT