Soybean Market agrowon
ॲग्रोमनी

Soybean Market : सोयाबीनचा निम्मा हंगाम संपला; दर दबावातच का?

देशातील अनेक शेतकऱ्यांकडे अजूनही सोयाबीन शिल्लक आहे. पण भावपातळी अपेक्षित स्तरावर पोचली नसल्यानं शेतकरी थांबले आहेत.

Anil Jadhao 

Soybean Rate Update : देशातील अनेक शेतकऱ्यांकडे अजूनही सोयाबीन शिल्लक (Soybean Stock) आहे. पण भावपातळी अपेक्षित स्तरावर पोचली नसल्यानं शेतकरी थांबले आहेत. मागील दोन महिन्यांपासून सोयाबीनचे भाव ५ हजार ते ५ हजार ३०० रुपयांच्या दरम्यान दिसतात. काही वेळ किंचित तेजी आली होती. पण ती टिकली नाही.

देशातील बाजारात सोयाबीन दर सध्या दबावातच आहेत. आंतरराष्ट्रीय बाजारातील चढ उतार, खाद्यतेलाचे कमी झालेले दर आणि सोयाबीन बाजारातील आवक अधिक असल्यानं दरावर दबाव आहे. सध्या देशातील बाजारात दैनंदीन सरासरी २ लाख क्विंटलच्या दरम्यान आवक होतेय.

सध्या मध्य प्रदेशातील आवक अधिक असल्याचं दिसतं. मध्य प्रदेशात सध्या दैनंदीन ८० ते ९० हजार क्विंटलची आवक होतेय. तर महाराष्ट्रातील आवक ७० ते ८० हजार क्विंटलच्या दरम्यान आहे. राजस्थानमधील आवक आता बऱ्यापैकी कमी झाली.

सध्याची बाजारातील आवक गेल्यावर्षी याच काळात झालेल्या आवकेच्या तुलनेत खूपच जास्त आहे. त्यामुळं बाजावर दबाव जाणवतोय.

आंतरराष्ट्रीय बाजारात सोयाबीन आणि सोयापेंडच्या दरात सध्या नरमाई आहे. तसेच चढ उतार सुरु आहेत. खाद्येतलाचे भाव ही नरमलेले आहेत. पामतेलाचे दर गेल्या अनेक दिवसांपासून नरमलेल्या पातळीवर आहेत. याचाही दबाव सोयाबीन बाजारावर दिसतोय.

आंतरराष्ट्रीय बाजारात सोयाबीन वायद्यांमध्ये आजही नरमाई आली. वायदे सायंकाळपर्यंत १४.८९ डाॅलर प्रतिबुशेल्सवर होते. तर सोयापेंडच्या वायद्यांमध्येही घट होऊन ४४८ डाॅलर प्रतिटनाचा टप्पा गाठला होता.

अर्जेंटीनाने शेतकऱ्यांसाठी सोयाडाॅलर धोरण जाहीर केलं. त्यामुळं येथील शेतकरी मोठ्या प्रमाणात सोयाबीन विकत आहेत. याचाही दबाव आंतरराष्ट्रीय बाजारावर आहे. चीननची सोयाबीन आवक जास्त दिसत असली दरी सरासरी प्रमाण कमी दिसतं.

तसचं ब्राझीलमधील सोयाबीन काढणी आता अंतिम टप्प्यात आहे. येथील सोयाबीन बाजारात दाखल झालं. यामुळंही बाजार दबावात आहे, असं जाणकारांनी सांगितलं.

देशातील सोयाबीनच्या दरात नरमाई दिसली. बाजारांमध्ये तीन दिवसांमध्ये सोयाबीनचे दर सरासरी १०० रुपयांनी नरमले होते.

सोयाबीनला सरासरी ४ हजार ९०० ते ५ हजार ३०० रुपये भाव मिळाला. उन्हाचा कडाका वाढल्यामुळं सोयाबीनमधील ओलावा कमी झाला. प्रक्रिया प्लांट्सचे भाव आज ५ हजार ३५० ते ५ हजार ५०० रुपये होते.

देशात खाद्यतेल आयात यंदा वाढली. त्यामुळं तेलाचे साठे उपलब्ध आहेत. परिणामी खाद्यतेलाच्या दरात घटही पाहयला मिळाली. सोयातेलाचे भावही दबावात आले.

यामुळं सोयाबीनवर दबाव आहे. त्यामुळं पुढील काळात देशातून सोयापेंड निर्यातीची गती कशी राहते, यावर सर्व अवलंबून असेल, असे सोयाबीन बाजारातील अभ्यासकांनी सांगितले.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Rain Crop Damage : मुसळधारेने काही तासांत होत्याचे नव्हते

Onion Rate Crisis : कशी फुटेल कांदादर कोंडी?

Fertilizer Stock Mismatch : खत विक्री, प्रत्यक्ष साठ्यात तफावत असल्यास कारवाई

Onion Storage Rot : चाळीस टक्के कांद्याची चाळीतच नासाडी

ICAR Farmer Award : ‘आयसीएसआर’ शेतकऱ्यांच्या पाठीवर कौतुकाची थाप देणार

SCROLL FOR NEXT