Chana Procurement  Agrowon
ॲग्रोमनी

Chana Procurement : हमीभावाने २ लाख ७० हजार क्विंटलवर हरभरा खरेदी

Chana Rate : राज्य सहकारी पणन महासंघ (मार्केटिंग फेडरेशन) अंतर्गत परभणी जिल्ह्यातील ८ केंद्रांवर नोंदणीकृत १८ हजार ६९५ पैकी ९ हजार ३८ शेतकऱ्यांकडून १ लाख ४१ हजार ७४ क्विंटल हरभरा खरेदी करण्यात आला.

Team Agrowon

Parbhani Chana Rate : भारतीय राष्ट्रीय कृषी सहकारी विपणन संघाची (नाफेड) यंदाच्या (२०२२-२३) हंगामातील केंद्र शासनाच्या आधारभूत किंमत (एमएसपी) खरेदी योजनेअंतर्गत हमीभावाने (प्रतिक्विंटल ५३३५ रुपये) हरभरा खरेदीची मुदत रविवारी (ता. ११) संपली.

यंदाच्या हंगामात १४ मार्च ते रविवार (ता. ११) या कालवधीत परभणी व हिंगोली जिल्ह्यांत राज्य सहकारी पणन महासंघ (मार्क.फेड.) व विदर्भ सहकारी पणन महासंघ (व्हीसीएफ) अंतर्गत १८ खरेदी केंद्रावर नोंदणी केलेल्या ३१ हजार २९१ पैकी १७ हजार ३७६ शेतकऱ्यांकडून २ लाख ७० हजार ५०६ क्विंटल हरभरा खरेदी करण्यात आला.

या हरभऱ्याची किंमत १४४ कोटी ३१ लाख ५३ हजार ३५१ रुपये आहे. आजवर १४ हजार ४२० शेतकऱ्यांना ११९ कोटी २५ लाख ५६ हजार ४२५ रुपये एवढ्या रकमचे चुकारे अदा करण्यात आले आहेत, अशी माहिती सूत्रांनी दिली.

राज्य सहकारी पणन महासंघ (मार्केटिंग फेडरेशन) अंतर्गत परभणी जिल्ह्यातील ८ केंद्रांवर नोंदणीकृत १८ हजार ६९५ पैकी ९ हजार ३८ शेतकऱ्यांकडून १ लाख ४१ हजार ७४ क्विंटल हरभरा खरेदी करण्यात आला. या हरभऱ्याची किंमत ७५ कोटी २६ लाख ३० हजार ६९६ रुपये होते.

हिंगोली जिल्ह्यातील ९ केंद्रांवर नोंदणीकृत ११ हजार ५४ पैकी ७ हजार ६८७ शेतकऱ्यांकडून १ लाख १८ हजार २७ क्विंटल हरभरा खरेदी करण्यात आला. या हरभऱ्याची एकूण किंमत ६२ कोटी ९६ लाख ७६ हजार ९७९ रुपये होते, अशी माहिती जिल्हा पणन अधिकारी कुंडलिक शेवाळे यांनी दिली.

विदर्भ सहकारी पणन महासंघाच्या गंगाखेड (जि. परभणी) येथील केंद्रावर नोंदणीकृत १ हजार ५४२ शेतकऱ्यांपैकी ६५१ शेतकऱ्यांकडून ११ हजार ४०५ क्विंटल हरभरा खरेदी करण्यात आला आहे, असे जिल्हा व्यवस्थापक भागवत सोळंके यांनी सांगितले.

११९ कोटी २५ लाखांवर चुकारे अदा...

राज्य पणन महासंघातर्फे परभणी जिल्ह्यातील खरेदी केलेल्यांपैकी १ लाख ३३ हजार ९२७ क्विंटल हरभरा वखार महामंडळाच्या गोदामात साठविण्यात आला. आजवर एकूण ७ हजार ३२७ शेतकऱ्यांना १ लाख १७ हजार ८४९ क्विंटल हरभऱ्याचे ६२ कोटी ८७ लाख २७ हजार ८२ रुपयाचे चुकारे अदा करण्यात आहे.

हिंगोली जिल्ह्यातील १ लाख ९ हजार १५७ क्विंटल हरभरा वखार महामंडळाच्या गोदामात साठविण्यात आला आहे. आजवर ६ हजार ५०६ शेतकऱ्यांना ९६ हजार ६६३ क्विंटल हरभऱ्याचे ५१ कोटी ५६ लाख ९९ हजार ७७२ रुपयाचे चुकारे अदा करण्यात आले आहेत.

विदर्भ सहकारी पणन महासंघाच्या गंगाखेड केंद्रांतर्गत ५८७ शेतकऱ्यांना ४ कोटी ८१ लाख २९ हजार ५० रुपयाचे चुकारे अदा करण्यात आले आहेत.

केंद्राचे नाव - नोंदणीकृत शेतकरी- विक्री केलेले शेतकरी- हरभरा खरेदी

परभणी - २१९८- ९९५ - १७१९४

जिंतूर - ११५७ - ४९९- ७३८९

बोरी - २२८३ - १३८४ - २२३०१

सेलू - ३११६- ११२६- १६७८३

मानवत - ३०९५- ११६१ - १७४१२

पाथरी - २८७०- १५३८ - २३७६०

सोनपेठ १५९५ - १०५४ - १६८२५

पूर्णा - २३८१- १२८१- १९४०९

गंगाखेड - १५४२- ६५१ - ११४०५

हिंगोली - २४७८- १८३९ - २७२००

कनेरगाव - ८७४ -८२१ - १३५५९

कळमनुरी- १८५० - १३०३- २०७८७

वारंगा - ९५ - ६० - ११२४

वसमत - १२२६- ५०५- ७४४८

जवळा बाजार- २८१६ - १७३३ -२४६१४

येळेगाव- २४ - १४१- २३२९

सेनगाव - १११२- ९४० - १५६००

साखरा -५७९- ३४५- ५३६३

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Cotton, Soybean Rate : कापूस, सोयाबीन, कांदा कुणाची बत्ती गूल करणार? कुणाला फायदा होणार? उद्या होणार उघड

ST Bus : एसटी महामंडळाच्या पन्नास टक्के फेऱ्या रद्द

Chana Cultivation : डहाणूत हरभरा लागवडीवर भर

La Nina Development : ला निना पुढच्या महिन्यात येणार? डिसेंबर ते फेब्रुवारीच्या दरम्यान निर्मितीचा अपेक हवामान केंद्राचा अंदाज 

Solapur Assembly Voting : वाढलेला एक टक्का कोणाच्या पारड्यात पडणार?

SCROLL FOR NEXT